तालीमेरन: आर्सेनल संघाची ऑफर धुडकावणारा पहिला डॉक्टर आणि भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
‘परदेशात नोकरी’ हे भारतातील बहुतांश तरुणांचं स्वप्न असतं. आपल्या देशाप्रती अभिमान आहे. पण, दुसऱ्या देशाचं आकर्षणसुद्धा आहे, अशी भारतीय तरुणांची मानसिकता आपल्याला नेहमीच दिसून येते.
परदेशाबद्दल असलेली ‘क्रेझ’ ही केवळ मध्यमवर्गीय, नोकरी करणाऱ्या लोकांमध्येच नाही तर क्रिडा क्षेत्रात आपलं योगदान देणाऱ्या खेळाडूंमध्येसुद्धा असते.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
क्रिकेट खेळाडू जेव्हा कोणत्याच स्पर्धेत सहभागी होत नसतात, तेव्हा ते ‘काऊंटी’ क्रिकेट खेळत असतात.
फुटबॉलची लोकप्रियता ही भारतात कमी आहे. पण, भारतीय फुटबॉलपटू हे परदेशात जाऊन फूटबॉल खेळत असतात आणि त्यांना तशा संधी उपलब्ध होत असतात हे ऐकून कदाचित आपल्याला आश्चर्य वाटेल.
त्याहूनही आश्चर्याची गोष्ट आहे की, ३ भारतीय फुटबॉलपटू असेही आहेत ज्यांनी युरोपियन क्लबमधून फुटबॉल खेळण्यासाठी आलेलं बोलावणं नाकारलं होतं. कोण होते हे खेळाडू? ज्यांनी पैशांपेक्षा भारतात फुटबॉलचा प्रसार करणं पसंत केलं? जाणून घेऊयात.
युरोपियन क्लब ही फुटबॉलच्या सामन्यांचं आयोजन करणारी सर्वात मोठी संस्था आहे. जगातील सर्व फुटबॉलप्रेमींचं, खेळाडूंचं या संस्थेच्या प्रत्येक घडामोडीवर लक्ष लागून राहिलेलं असतं.
भारतीय फुटबॉलपटूंपैकी भाईचुंग भूतीया, ब्युरी, गुरूप्रीत सिंग हे युरोपियन क्लबसाठी फुटबॉल खेळले आहेत. ज्या खेळाडूंनी ही ऑफर नाकारली आहे त्यामध्ये खालील खेळाडूंचा समावेश होतो :
१. चुनी गोस्वामी :
चुनी गोस्वामी हा भारताचा माजी स्ट्रायकर फुटबॉलपटू आहे ज्याने १९६२ मध्ये जकार्ता येथे झालेल्या एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावलं होतं. शिवाय, १९६४ मध्ये झालेल्या एशिया कपमध्ये त्याने रौप्यपदकाची कमाई केली होती.
भारताच्या या गुणी फुटबॉलपटूला टोटेंहम येथील इंग्लिश क्लबने त्यांच्यासाठी खेळण्यासाठी आमंत्रण दिलं होतं. पण, चुनी गोस्वामी हे त्यावेळी भारताच्या प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ‘मोहन बागान’चं नेतृत्व करत होता.
एका भारतातील फुटबॉल स्पर्धेसाठी त्याने हे इंग्लिश क्लबचं आमंत्रण स्वीकारलं नव्हतं.
“मोहन बागानला लोकांच्या मिळणाऱ्या प्रेमाने आपण संतुष्ट आहोत आणि युरोप मध्ये जाऊन एकटं राहण्यापेक्षा मी भारतात राहणं पसंत केलं” अशी प्रतिक्रीया चुनी गोस्वामी यांनी एका मुलाखतीत दिली होती.
–
- भर मॅचमध्ये टेनिस चॅम्पियनच्या पाठीत खंजीर… करिअर कायमचं बरबाद…
- फुटबॉल वर्ल्डकप चोरीला गेला, जो एका कुत्र्याला सापडला, मग पुन्हा चोरीला गेला…! तो अजून सापडलाच नाही!
–
२. तालीमेरन एओ –
भारत स्वतंत्र झाल्यानंतर स्थापित झालेल्या पहिल्या फुटबॉल संघाचे हे एओ हे कर्णधार होते. भारतात आजवर झालेल्या फुटबॉलपटूंमध्ये तालीमेरन हे सर्वश्रेष्ठ ‘डिफेन्डर’ म्हणून ओळखले जातात. १९४८ मध्ये लंडन येथे संपन्न झालेल्या ऑलम्पिक खेळांमध्ये तामिलेरन एओ यांनी भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं.
त्यांची कामगिरी बघून आर्सेनाल येथील इंग्लिश क्लबने एक वर्षाचा करार करण्याचा प्रस्ताव समोर ठेवला होता. पण, तालीमेरन यांनी तो प्रस्ताव नाकारला आणि भारतात राहून फुटबॉल खेळणं आणि काही वर्षांनी वैद्यकीय शाखेचा अभ्यास करयायचं ठरवलं.
तालीमेरन यांनी डॉक्टर व्हावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. या इच्छेपुढे त्यांना एलिझाबेथ राणीच्या लहान बहीण मार्गारेट यांचा बकिंगहॅम पॅलेस मध्ये दिलेला प्रस्ताव सुद्धा त्यांना आकर्षित करू शकला नाही.
१९५० साली फुटबॉल मधून निवृत्ती घेऊन त्यांनी नागालँड येथील कोहिमा हॉस्पिटलमध्ये १९५३ ते १९७८ पर्यंत त्यांनी ईएनटी डिपार्टमेंट मध्ये नोकरी केली.
३.मोहम्मद सलीम –
भारतीय फुटबॉलपटूंपैकी सर्वात चांगला ‘फॉरवर्ड’ म्हणून ओळखले जाणारे मोहम्मद सलीम यांना स्वातंत्र्यपूर्व काळात युरोपियन क्लबने फुटबॉल खेळण्यासाठी आमंत्रित केलं होतं. १९३६ मध्ये मोहम्मद सलीम हे ‘स्कॉटिश जायंट्स सेलटीक’ या फुटबॉल संघाकडून दोन सामने खेळलेसुद्धा होते.
मोहम्मद सलीम यांची हॅमिल्टन एक्सिस आणि गॅलस्टन यांच्याविरुद्ध झालेल्या सामन्यात केलेल्या कामगिरीनंतर स्कॉटलंड मधील सर्व वर्तमानपत्रांनी त्यांचं कौतुक केलं होतं.
सेलटीक क्लबने त्यावेळी मोहम्मद सलीम यांना पहिला विदेशी खेळाडू म्हणून करार करण्याची विनंती केली होती. पण, मोहम्मद सलीम यांना स्कॉटलंडमध्ये असतांना भारताची खूप आठवण येत होती. इतक्याच कारणावरून त्यांनी ‘स्कॉटिश जायंट्स’ क्लबची भल्या मोठ्या पैशांची ऑफर त्यावेळी नाकारली होती.
सेलटीक क्लबने मोहम्मद सलीम यांच्यासमोर एक ‘चॅरिटी’ सामना आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण, मोहम्मद सलीम यांनी तो प्रस्ताव नाकारला आणि ते पैसे एखाद्या अनाथाश्रमाला देण्याचं त्यांनी सेलटीक क्लबला सुनावलं.
मोहम्मद सलीम हे काही दिवसांतच भारतात परतले आणि त्यांनी भारताच्या ‘मोहम्मदन स्पोर्ट्स क्लब’ कडून फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली.
आजच्या पिढीला कदाचित या तिन्ही खेळाडूंचा निर्णय हा वेडेपणा वाटू शकतो. पण, देशापासून लांब राहण्याचा अनुभव ज्या व्यक्तींनी घेतला आहे, ते या खेळाडूंच्या निर्णयाची नक्कीच प्रशंसा करतील.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: ht
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.