आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
हिंदी चित्रपटामध्ये काम करणारी प्रथम इंडो-अमेरिकन अभिनेत्री कोण आहे हे आपल्याला माहिती आहे का? ती अभिनेत्री म्हणजे दिप्ती नवल. ३ फेब्रुवारी १९५२ रोजी पंजाबमधील अमृतसर येथे दीप्ती नवलचे जन्म झाले होते.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
नंतर तिच्या वडिलांना अमेरिकेच्या विद्यापीठामध्ये प्राध्यापकाची नोकरी मिळाल्यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटूंबाला अमेरिकेमध्ये स्थायिक व्हावे लागले. यामुळे तिच्या जीवनातले सुरुवातीचे दिवस अमेरिकेमध्येच गेले आणि त्यानंतर ती पुन्हा भारतात परतली.
दिप्तीने न्यूयॉर्कमधील हंटर कॉलेजमधून ललित कला शाखेमध्ये पदवी प्राप्त केली आहे. १९७८ मध्ये तिने आपल्या पहिल्या चित्रपट अभिनयासाठी दिग्दर्शक श्याम बेनेगल यांची भेट घेतली व त्यांच्यासोबत पहिला चित्रपट साइन केला.
दिप्तीने साइन केलेला ‘जुनून’ हा चित्रपट तिच्या अप्रतिम अभिनयामुळे सुपरहिट झाला आणि परिणामस्वरूप ती तिच्या करियरच्या सुरूवातीच्या दिवसांमध्येच लोकप्रिय झाली.
दिप्ती नवल यांनी अमोल पालेकर, फारूख शेख, उत्पल दत्त, हृषिकेश मुखर्जी आणि शबाना आझमी या कलाकारांसोबत देखील काम केले आहे. यादरम्यान लोकांनी त्यांची तुलना स्मिता पाटील आणि शबाना आझमी यांच्या अभिनयाशी करायला सुरुवात केली.
या तिन्ही अभिनेत्री त्या दरम्यान सर्वाधिक लोकप्रिय होत्या. ‘चश्मेबद्दूर’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर फारुख शेख आणि दीप्ती नवल यांच्याकडे दिग्दर्शक आणि निर्माते यांची रांग लागायला सुरुवात झाली होती.
दिप्ती तीच्या खाजगी आयुष्यात होणाऱ्या अनेक घटनेमुळे सतत चर्चेमध्ये असते. १९८५ मध्ये तिने चित्रपट दिग्दर्शक प्रकाश झा सोबत लग्न केले, परंतु २००२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. याचप्रमाणे दीप्ती आणि फारुख शेख यांनी ८० च्या दशकात ‘चश्मे बद्दूर’, ‘किसी से ना कहना’, ‘साथ-साथ’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते.
या दोघांची जोडी पण बाकी कलाकारांच्या तुलनेत अधिक लोकप्रिय झाली होती. त्यादरम्यान दोघांचे ही प्रेमसंबंध होते, अशी चर्चा व्हायची. परंतु मात्र या गोष्टींमध्ये कितपत तथ्य आहे, याबाबत अजुनही काही सांगता येणार नाही.
–
- दोघांत तिसरा? नाना पाटेकरांमुळेच या जोडप्यामध्ये निर्माण झाला होता तणाव (?)
- अभिनेत्रीने केलाय अत्याचाराचा खुलासा, अभिनेत्यांसह राजकारण्यांचाही समावेश
–
याचप्रमाणे अजुन प्रकरण म्हणजे तिच्यावर सेक्स रॅकेट चालवण्याचे आरोप झाले होते. गोष्ट अशी आहे की, ” १९८१ मध्ये दिप्तीने अभिनेता फारूख शेखसोबत ‘चश्मे बद्दूर’ या चित्रपटामध्ये काम केले होते. याच्या अनेक वर्षांनंतर या चित्रपटाचा रिमेक प्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हिड धवनने रिलीज केला आणि या रिमेकमध्ये दिप्तीची भूमिका अभिनेत्री तापसी पन्नूने साकारली होती. त्यानंतर या संदर्भात काही मीडियामधले पत्रकार दिप्तीच्या घरी या रीमेक बाबत तिची मुलाखत घेण्यासाठी तिच्या घरी पोहोचले . तितक्यात तिच्या सोसायटीचे लोक मुलाखतीदरम्यान आले आणि त्यांनी तिची मुलाखत मध्येच थांबवायला लावली”.
त्या लोकांना गैरसमज झाले होते की दीप्तीच्या घरात एखाद्या सिनेमाचं शूटिंग चालू आहे. सोसायटीच्या लोकांची ही कृती बघून दिप्ती खूप निराश झाली होती या कारणामुळे तिने त्याचदिवशी ते घर सोडून दिले.
दिप्ती त्या घरात ३० वर्षांपासून राहत होती, परंतु तिच्या सोसायटी मधील लोकांना झालेल्या गैरसमजमुळे तिला ते घर सोडावे लागले.
एका मुलाखतीत दीप्तीने या संपूर्ण प्रकरणाबाबत सांगितले की, “ज्या वेळी लोकांकडे अपार्टमेंट घ्यायला पैसे नसायचे, त्यावेळी मी हा फ्लॅट विकत घेतला होता. या घरात मी अनेक सुंदर क्षण घालवले, अनेक पार्टी केल्या तसेच अनेक पत्रकारांशी खास संवाद साधले आहेत. परंतु अचानक एका दिवशी माझ्या सोसायटीचे लोक फ्लॅट मध्ये आले आणि माझ्यावर सेक्स रॅकेट चालवण्याचे आरोप लावायला लागले.”
पुढे तिने सांगितले की, “माझी चूक एवढीच होती की मी माझ्या इमारतीतील लोकांशी खुप कमी बोलायची. मी जास्तीत जास्त वेळ स्वतःच्या कामांमध्ये व्यस्त राहायची. परंतु माझ्या या कमी बोलण्यामुळे तेथील लोकांना वाटले की, मी काहीतरी चुकीची कामे करत असेल आणि मग या लोकांनी माझ्यावर सेक्स रॅकेट चालवण्याचा आरोप लावला.”
ही न्यूज सर्वप्रथम टाइम्स ऑफ इंडिया ने दिली होती आणि या बातमीचे शीर्षक होते :- ‘मी कोणतेही सेक्स रॅकेट चालवत नाहीये’. परंतु बाकीच्या मीडिया कंपनी आणि वेब पोर्टल्सनी पूर्ण बातमीची शहानिशा न करता ही बातमी पसरवली. त्यामुळे ही बातमी खोटी असल्याचे दिसते…!
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: ht
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.