Site icon InMarathi

मित्रा, नव्या वर्षात या ७ रोमँटिक गोष्टी केल्या, तर तिचं मन जिंकलस म्हणून समज…

shreyas prarthna inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कुठलंही नातं हळूहळू उलगडत जातं. त्यातूनही जर ते जोडप्यांमधलं नातं असेल तर ते नातं उलगडण्याची प्रक्रिया खूप नाजूक आणि कधीकधी गुंतागुंतीचीही असते.

आकर्षणापासून सुरू झालेल्या नात्याचा शेवट तिरस्काराने न होऊ देता त्या आकर्षणातून घट्ट मैत्री आणि हळूहळू प्रेमाचं छान वळण येणं अपेक्षित असतं. तसं ते व्हावं यासाठी थोडी काळजी आणि एकमेकांना थोडं अधिक समजून घेतलं गेलं पाहिजे, पण एकमेकांना समजून घेणे ही गोष्ट बोलायला तशी सोपी असली आणि त्या तीन जादुई शब्दांनी प्रेम व्यक्त होतं असं आपल्याला वाटत असलं तरी तितकं काही ते सोपं नसतं.

एकमेकांवर प्रेम आहे हे त्या दोघांनीही सिद्ध करून दाखवलं पाहीजे आणि सिद्ध करून दाखवीन असं ठरवून नाही तर ते आपोआप सिद्ध झालं पाहीजे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

यात एकमेकांच्या कठीण काळात एकमेकांना खंबीर साथ देणं, आपलयाला कश्याकश्याबद्दल असुरक्षित वाटतंय ते आपल्या जोडीदाराला मनमोकळेपणाने सांगता येणं आणि त्याने किंवा तिने ते समजून घेणं, कुठल्याही प्रकारे आणि कश्याहीसाठी एकमेकांवर सक्ती न करणं, एकमेकांना स्पेस देणं या गोष्टी आल्याच आणि त्या आवश्यक आहेतच, पण या तश्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या अनेक छोट्या छोट्या टप्प्यांनी बनलेल्या असतात.

 

 

या दिसताना छोट्या दिसणाऱ्या पण नात्यावर खूप मोठा परिणाम करणाऱ्या गोष्टी सांभाळता येणं, सांभाळल्या जाणं फार महत्त्वाचं असतं. मुलींचं मन जिंकायचं असेल तर तिला आता फार मोठमोठी वचनं देण्यापेक्षा जर तिचा रोजचा शीण थोडा कमी होईल याची मुलांनी थोडी काळजी घेतली, तिच्या दिसण्याकडेच आपण आकर्षित झालेलो नाही तर तिच्या एकूण व्यक्तिमत्त्वावर आपलं प्रेम आहे याची छोट्या छोट्या गोष्टींमधून तिला जाणीव करून दिलीत तर तिला तुमच्यासोबत अधिक सुरक्षित, मोकळं वाटेल.

ती तुमच्या आधीपेक्षाही अधिक प्रेमात पडेल. तुमचं नातं हे दिवसेंदिवस जसं प्रगल्भ होत जाणं महत्त्वाचं आहे तसं ते आधीपेक्षा अधिकाधिक इंटरेस्टिंगही होत जायला हवं.

आपली प्रेम व्यक्त करण्याची पद्धत कशी आहे? त्यात थोडे बदल करायला हवे आहेत का? याचा जरा नव्याने विचार करा मुलांनो. खाली दिलेल्या या ७ गोष्टी या नव्या वर्षात तिचं मन जिंकायला तुम्हाला नक्कीच फायद्याच्या ठरतील.

१. तिच्यासाठी आठवणीने फुलं घेऊन या –

 

 

इतक्या व्यस्त दिनक्रमातून तिला भेटायला जाताना जर तुम्ही तिच्यासाठी फुलं घेऊन गेलात तर तिच्या चेहऱ्यावर तुमच्या या छोट्याश्या कृतीमुळे नक्की स्मितहास्य उमटेल.

तुम्हाला काही भलामोठा गुच्छ घेऊन जायची आवश्यक्ता नाही. अगदी मोजकी फुलं न्या. तिला फुलं आवडत असतील तर तिच्या आवडीची फुलं घेऊन जा. तुम्हाला जर ती एखाद्या फुलासारखी वाटत असेल तर ते फुल तिच्यासाठी घेऊन जाऊन तिला त्या फुलाची उपमा द्या. ती १००% लाजेल.

२. फोरहेड किसेस –

 

 

प्रत्येक किसची त्याची त्याची एक खासियत, सौंदर्य आणि त्याचा त्याचा एक अर्थ असतो. जोडीदाराला, विशेषतः मुलींना आपल्या बॉयफ्रेंडकडून रोमॅंटिक भावनेव्यतिरिक्त त्याला आपली काळजीही वाटते की नाही याचीही खात्री हवी असते.

तुमचं तिच्यावर मनापासून प्रेम आहे हे दाखवण्यासाठी जरूर अधून मधून तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवा. चुंबनापेक्षाही या अशा किसेस मुळे तिचा तुमच्यावर आधीपेक्षा अधिक जीव जडेल.

३. सकाळी उठल्यावर तिच्यासाठी चहाचा कप किंवा कॉफीचा मग तयार ठेवा –

 

 

तुम्ही दोघेजण एकत्र राहात असाल, तुमचं लग्नं झालं असेल तर सकाळी उठल्याबरोबर ती उठण्याआधीच तिच्यासाठी चहाचा कप, कॉफीचा मग तयार ठेवा. शक्य झाल्यास तिला हातात आयता चहा किंवा कॉफी आणून द्या. तिच्या दिवसाची याहून सुंदर सुरुवात होणार नाही.

४. तिची आवडती गाणी अचानक तिच्यासाठी प्ले करा –

तुम्ही गप्पा मारत असताना जेव्हा जेव्हा ती तिच्या आवडत्या गाण्यांविषयी बोलेल तेव्हा तुम्हाला भलेही ती गाणी आवडत असोत किंवा नसोत ती आधी मुळात लक्षात ठेवा.

अचानक केव्हातरी दोघं छान मूडमध्ये असाल तेव्हा त्यातलं एखादं गाणं खास तिला आवडतं म्हणून प्ले करा. तुम्हाला तिच्या आवडीनिवडींचे इतके बारीकसारीक तपशील लक्षात आहेत या जाणीवेने तिला खूप भारी वाटेल.

५. तिच्यासाठी जेवण मागवा किंवा स्वतःहून काहीतरी बनवा –

 

 

दिवसभराच्या कामाने, कामाच्या तणावाने तीदेखील तुमच्यासारखीच थकलेली असते. तिने न सांगता जर तुम्ही बाहेरून काहीतरी छान ऑर्डर केलंत तर त्यामुळे तिचा शीण हलका होणारच आहे.

तुम्ही जर स्वतःहून तिने न सांगता तिच्यासाठी काही बनवलंत तर तिच्या मनात तुम्ही काही एक्स्ट्रा पॉईंट्स मिळवलेतच म्हणून समजा. तुम्ही जरी छान जेवण बनवू शकत नसलात तरी मुलींना ते चालेल. त्या तुमचा पदार्थ कसा झालाय हे न बघता त्यामागची तुमची प्रेमाची भावना बघतील.

६. तिच्यासोबत जेवायला बाहेर गेलात तर तिच्याकरता पुढे खुर्ची ओढा –

बाहेर जेवायला गेल्यानंतर प्रेयसीसाठी खुर्ची पुढे ओढून तिला आधी त्यावर बसायला सांगणे आणि मग स्वतः दुसऱ्या खुर्चीवर बसणे ही मुलींचं मन जिंकण्यासाठी मुलं करत आलेली एक गोष्ट आजही मुलींना तितकीच आवडते.

तुम्ही मुलींसाठी करत असलेल्या सगळ्या गोष्टींवर त्यांचं बारीक लक्ष असतं. तुमच्या या कृतीतून तुम्ही तुमच्या मनात तिच्याविषयी असलेला आदरही व्यक्त करत असता.

७. ती ‘तुमची’ गलफ्रेंड आहे हे चारचौघात अभिमानाने सांगा –

 

 

ती तुमची गलफ्रेंड आहे हे तुम्हाला चारचौघात अभिमानाने सांगता आले पाहीजे. ते सांगताना तुम्ही आढेवेढे घेता कामा नये. तुमची ही एका अर्थाने खूप छोटी असलेली कृती तिचा तुमच्या नात्यावर असलेला विश्वास अधिक बळकट करायला मदत करेल, पण हे करत असताना तुमच्या मनात कुठेही तिच्यावर हक्क गाजवण्याची भावना असता कामा नये नाहीतर तुमच्या टोनमधून ते तिला आणि बाकीच्यांना कळून येईल.

ती तुमच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्यासाठी तुम्ही स्वतःला भाग्यवान समजता हे तुम्ही तिच्याविषयी इतरांशी बोलताना कसे बोलता यावरून लक्षात आलं पाहीजे.

या वरच्या गोष्टी करायला तुम्हाला फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत. तुम्ही तुमच्या प्रेयसीसाठी, बायकोसाठी हे सगळं अगदी सहज करू शकता.  वरकरणी जरी या गोष्टी सोप्या वाटल्या तरी पुन्हा पुन्हा त्यांची आठवण स्वतःला आणि इतरांना करून द्यावी लागते कारण, मोठीमोठी वचनं दिलेले आपण आधी या छोट्या गोष्टींमुळे नातं किती फुलू शकतं हेच पुरेसं समजून घेतलेलं नसतं.

तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी करण्या न करण्याने एकतर तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला खुश करत असता किंवा नकळत तिला दुखावून तुम्हाला जरी दिसत नसला तरी अप्रत्यक्षपणे त्याचा तुमच्या नात्यावर परिणाम करून घेत असता. दोन पर्यायांपैकी नेमकी कशाची निवड करायची हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: ht

tps://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version