भारतातील या रहस्यमयी मंदिरात ३ वेळा शिवलिंगाचा रंग बदलतो: विज्ञान की चमत्कार?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
जगभरात अशी अनेक मंदिरे आहेत, जी अनेक रहस्यमयी गोष्टींनी भरलेले आहे. यामध्ये काही मंदिरे त्यांच्या अप्रतिम बांधकामासाठी प्रसिद्ध आहे, तर काही त्या मंदिरात होणाऱ्या विचित्र घटनांमुळे प्रसिद्ध आहे. विशेषतः भारतात अशी अनेक रहस्यमयी मंदिरे आपल्याला आढळून येतील. भारतामध्ये एवढे मंदिरे आहे की देशामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला एक तरी मंदिरे पाहायला मिळेलच.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
भारतात प्रामुख्याने आपल्याला ब्रम्हा-विष्णु-महेश, गणपती, बजरंगबली आणि विविध देवींचे तसेच संत-महात्म्यांची मंदिरे आढळून येतात. तसेच या मंदिरांमध्ये असलेले स्थापत्यकला, नक्षीकाम, वास्तु यांमध्ये देखील वैविध्य आढळून येते.
भारतातील अनेक मंदिरे असे आहेत ज्यांचे निर्माण हजारों वर्षांपूर्वी केले गेले आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मंदिराविषयी सांगणार आहोत, जिथे दिवसातून तीन वेळा शिवलिंगाचा रंग बदलतो.
हे मंदिर राजस्थानमधील धौलपूर येथे असून, चंबळ नदीच्या खोऱ्यामध्ये असलेल्या या मंदिराला ‘अचलेश्वर मंदिर’ या नावाने ओळखले जाते.
या मंदिरात असलेल्या शिवलिंगाचे दिवसातून तीन वेळा रंग बदलते, सकाळी हे लाल रंगाचे दिसते, त्यानंतर दुपारी भगवा म्हणजेच केशरी रंगाचे तर रात्री हे शिवलिंग काळ्या रंगाचे दिसते. या मंदिरामधील शिवलिंगाचे रंग बदलण्याची ही क्रिया अजुनही शास्त्रज्ञांसाठी एक कोडेच आहे.
हे मंदिर किती जुने आहे आणि या शिवलिंगाची स्थापना कधी झाली याबाबत अजुनही अधिकृत अशी माहिती उपलब्ध नाही. परंतु असे मानले जाते की हे मंदिर सुमारे १००० वर्ष तरी जुने असावे.
मागे एकदा हे शिवलिंग जमिनीमध्ये किती खोलवर आहे, हे जाणून घेण्यासाठी खोदकाम सुरु करण्यात आले होते. परंतु अनेक दिवस खोदकाम करूनही खोलीचा अंदाज न आल्याने खोदकाम बंद करण्यात आले होते.
या मंदिराविषयी लोकांची अशी श्रद्धा आहे की, जर कोणीही मनोभावे या शिवलिंगाचे दर्शन घेतले तर त्याच्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतात. सोबत जीवनात कुठलीही समस्या असू द्या या शिवलिंगाचे दर्शन घेतल्याने संपून जाते.
–
- रावण आणि त्याच्या पित्याने इथे केली होती तपस्या! तिथे आज उभं आहे शिवकालीन मंदिर
- ३३ कोटी देवांचा वास असणाऱ्या या गुहेत दडलंय विश्वाच्या अंताचं रहस्य!
–
सोबतच बऱ्याच लोकांचा विश्वास आहे की जर कोणाचे अनेक प्रयत्न करूनही लग्न होत नसेल तर त्या व्यक्तिने या शिवलिंगाला १६ सोमवार पाणी अर्पण करावे. हे केल्याने तरुण- तरुणींना त्यांचा आवडता जोडीदार मिळतो.
असेच रंग बदलणारे शिवलिंग आपल्याला भारतामध्ये पुढील ठिकाणी आढळून येतील :-
● उत्तरप्रदेशचे नर्मदेश्वर महादेव मंदिर :
नर्मदेश्वर महादेवाचे हे मंदिर उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात असून या मंदिरात असलेल्या शिवलिंगाचा देखील रंग बदलतो.
या मंदिराचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर भारतातील एकमेव असे मंदिर आहे ज्यामध्ये बेडकाची पूजा केली जाते. या मंदिरात भगवान शिव बेडकाच्या पाठीवर विराजमान आहेत.
● उत्तरप्रदेश मधील कालेश्वर महादेव मंदिर :
कालेश्वर महादेव मंदिर हे उत्तरप्रदेश मध्ये घाटमपुर तहसील मध्ये आहे. असे मानले जाते की सूर्याच्या किरणानुसार या शिवलिंगाचे रंग बदलत जाते.
● उत्तरप्रदेश मधील लिलौटी नाथ शिव मंदिर :
हे मंदिर उत्तरप्रदेश मध्ये पिलीभीत जिल्ह्यामध्ये स्थित आहे. अशी मान्यता आहे की या मंदिराची स्थापना महाभारत काळामध्ये गुरु द्रोणाचार्य यांचे पुत्र अश्वत्थामा यांनी केली होती.
हे शिवलिंग देखील दिवसातून तीन वेळा रंग बदलते , सकाळी या शिवलिंगाचा रंग काळा, दुपारी तपकिरी तर रात्री हल्का पांढरा रंग असतो. असे मानले जाते की आजही अश्वत्थामा या मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी येतात आणि जेव्हा ते या परिसरामध्ये प्रवेश करतात तेव्हा अचानक जोरजोरात वीजा चमकू लागतात.
तर ही आहे काही चमत्कारिक महादेवाची मंदिरे, ज्यामध्ये शिवलिंगाचे रंग बदललतात.
==
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: ht
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.