Site icon InMarathi

जुनी गाडी विकताय? फास्टटॅग अकाऊंट बंद करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

fastag inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

चारचाकी गाडी म्हटलं की आता सगळ्यात आधी ध्यानात येते ती बाब म्हणजे फास्टॅग! कुठेही टोल भरायचा झाला, तर आता गाडीला हा फास्टॅग असणं आवश्यक आहे. भारतात सगळीकडेच डिजिटलायझेशन करून व्यवहार सुकर करण्याचा प्रयत्न सुरु असल्याने, फास्टॅग हादेखील त्यामधील एक महत्त्वाचा भाग ठरतो. त्यामुळेच गाडीला फास्टॅग असणं अनिवार्य आहे असा कायदा करण्यात आला आहे.

एवढंच नाही, तर फास्टॅग नसणाऱ्या वाहनांकडून दंड म्हणू ज्यादा टोल आकारण्यात यावा अशीदेखील तरतूद केली गेली आहे. साहजिकपणे प्रत्येकच कार किंवा चारचाकी वाहनावर आता फास्टॅग दिसून येतो.

 

 

अर्थातच कुणीही व्यक्ती, कुठलेही वाहन कायमस्वरूपी वापरत नाही. त्यामुळे साहजिकपणे वाहन विकण्याचा निर्णय, वाहनमालकांकडून अनेकदा घेतला जातो. अशावेळी त्या गाडीशी निगडित असलेला फास्टॅग वाहनचालक तसाच ठेवणार नाही, हे नक्कीच!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

याच फास्टॅगला बँक अकाउंटसुद्धा संलग्न असल्यामुळे, हे धोक्याचं सुद्धा ठरू शकतं. मग अशावेळी, जर गाडी विकायची असेल, तर हा फास्टॅग बंद करावा लागतो. यासाठी नेमकं काय करण्यात यावं? तो बंद कसा केला जातो याची माहिती असणं कधीही उत्तम, नाही का?

 

 

फास्टॅग देणाऱ्या संस्था

सर्व बँका आणि आर्थिक व्यवहाराशी निगडित काम करणाऱ्या इतर काही कंपन्या यांनी फास्टॅगची सुविधा उपलब्ध करून देण्याची परवानगी देण्यात आली आहे. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन म्हणजेच आरएफआयडीद्वारे इलेक्ट्रॉनिक यंत्रणांचा वापर करून टोल गोळा करण्यात येतो.

हा फास्टॅग बँकांमधून अगदी सहजपणे विकत घेतला जाऊ शकतो. मात्र काम संपल्यानंतर, म्हणजेच गाडी स्क्रॅप करत असताना अथवा विकत असताना फास्टॅग अकाउंट बंद करणं अत्यंत आवश्यक आहे.

 

 

हे अकाउंट बंद झालं नसल्यास, नवा कारमालक त्याचा गैरफायदा घेऊ शकतो. या अकाउंटद्वारे टोल भरून त्याचा भूर्दंड तुमच्या नावे लावू शकतो. एवढंच नाही, तर तुम्ही गाडी ज्याला विकली आहेत, त्याला ते वाहन त्याच्या नावाने झाल्यानंतर वाहनक्रमणकाशी निगडित असा नवा फास्टॅग तयार करून घ्यावा लागेल. पहिल्या वाहनमालकाने आधीच फास्टॅग बंद न केल्यास, नव्या वाहनमालकाला ते शक्य होणार नाही. त्यामुळेच, गाडीची कागदपत्रे नव्या मालकाच्या नावे रजिस्टर झाल्यानंतर जुना फास्टॅग बंद होणं अवश्यक आहे.

अकाउंट बंद कसं कराल?

अनेक बँका किंवा पेटीएमसारख्या अन्य काही कंपन्या फास्टॅगची सर्विस देतात. फास्टॅग अकाउंट बंद करण्याची पद्धत सुद्धा प्रत्येक कंपनीनुसार वेगवेगळी आहे. ही पद्धत नेमकी काय आहे, आणि त्यासाठी काय प्रक्रिया करावी लागते हे जाणून घेणं सुद्धा फार सोपं आहे. यातले तीन पर्याय मात्र जवळपास सगळ्याच ठिकाणी सारखे आहेत. ते जाणून घेऊ.

 

१. कस्टमर केअरशी संपर्क

कस्टमर केअरशी संपर्क साधून फास्टॅग बंद करण्यासंदर्भात माहिती देणं आणि त्यानुसार पुढील प्रक्रिया पूर्ण करणं. खाली दिले गेलेले काही नंबर आहेत ज्यांनी फास्टटॅग सेवा पुरवली आहे त्या नंबरवर कॉल करून तुम्ही हे अकाउंट बंद करू शकता :

२. मोबाईल पेमेंट अप्लिकेशनचा वापर

प्रत्येक सर्विस प्रोव्हायडरच्या मोबाईल अप्लिकेशनमध्ये फास्टॅग बंद करण्याची सोय करण्यात आलेली असते. त्या पर्यायाची निवड करून अकाउंट बंद करणं अत्यंत सोपं आणि सहजशक्य असतं.

३. संबंधित बँकेचं फास्टॅग पोर्टल

बँकांच्या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून सुद्धा अकाउंट बंद करणं शक्य आहे. या पोर्टलवर सांगण्यात आलेल्या स्टेप्सनुसार पुढे गेल्यास, फास्टॅग अकाउंट बंद करणं फार कठीण जाणार नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: ht

tps://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version