Site icon InMarathi

ही १० गाणी लांबलचक असूनही सर्वांच्या “ऑल-टाईम-फेव्हरेट” लिस्ट मध्ये आहेत!

bollywood songs IM featured

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हिंदी चित्रपट आणि त्यातली गाणी हा हिर रांझा, सोनी महिवाल, झालंच तर राज सिमरन प्रकार आहे,  ते म्हणजे अतुट जोडी. गाणी नसणारा हिंदी सिनेमा म्हणजे मजाच नाही. कथानकात गरज असो नसो सिनेमात मधेच गाणं येतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

काही गाणी कथानक पुढे नेतात किंवा कथानक लिरिकली सांगतात तर काही गाणी अगदी विनाकारण येऊन जातात. प्रेक्षकांनाही या आगंतुक गाण्यांची इतकी सवय झालेली आहे की ते या रसभंगाकडे चक्क दूर्लक्ष करतात.

 

 

हिंदी चित्रपट गीतं ही फार फार तर चार ते पाच मिनिटांची असतात. मात्र काही गाण्यांनी हा नियम धुडकावून लावत लांबलचक लड लावली आहे, तरीही ही गाणी हिट आहेत आणि आजही आवडीनं ऐकली जातात.

१. हमे तो लूट लिया हुस्न वालों ने – अल हलाल- (८ मिनिटं ४१ सेकंद) –

 

 

१९५८ साली प्रदर्शित झालेल्या अल हिलाल या चित्रपटातली ही कव्वाली आजही तितकीच लोकप्रिय आहे. इस्माईल आझाद यांच्या आवजातील ही अजरामर कव्वाली आठ मिनिटांहून अधिक लांबीची आहे.

२. पिया तोसे नैना लागे रे – गाईड- (८ मिनिटं २९ सेकंद) –

 

 

१९६५ साली प्रदर्शित झालेला, हिंदी चित्रपटातला मैलाचा दगड मानला जाणारा गाईड हा चित्रपट. यातलं पिया तोसे नैना लागे रे हे गाणं आजही लोकप्रिय आहे आणि याची विविध गायकांच्या आवाजातली व्हर्जन्स येत रहातात.

हे गाणं एस.डी. बर्मन यांनी संगीतबध्द केलेलं आहे आणि याची लांबी देखिल आठ मिनिटांहून अधिक आहे.

३. आप के कमरे में कोई – यांदों की बारात – (११ मिनिटं १ सेकंद) –

 

 

१९७३ साली प्रदर्शित झालेल्या यादोंकी बारात मधील किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं आर डी बर्मन यांनी संगितबध्द केलेलं.

त्याकाळातील युवकांना आकर्षित करेल अशी गिटार धून असणारं हे गाणं दोन पिढ्यांनंतरच्या तरूणाईलाही तितकंच आवडतंय हे विशेष.

४. दीदी तेरा देवर दिवाना – हम आपके हैं कौन? (७ मिनिटं ३८ सेकंद) –

हाऊसफूल्लचे आणि व्यवसायाचे सर्व विक्रम मोडलेला नव्वदीतला हा सुपरहिट ब्लॉकबस्टर. यातलं दीदी तेरा देवर दिवाना आजही लग्न कार्यातल्या संगीत समारंभात हौसेनं वाजविलं जातं आणि त्यावर तरूणी थिरकतात.

 

 

राम लक्ष्मण यांनी संगीत दिलेलं हे गाणं लता आणि स्व. एस. पी. बालसुब्रमणियम यांनी गायलं आहे.

५. कबुतर जा जा/अंताक्षरी – मैंने प्यार किया –

ऐंशीचं दशक संपता संपता १९८९ साली आलेला मैंने प्यार किया. यातलं लोकप्रिय कबुतर जा जा हे गाणं आणि याच चित्रपटातली अंताक्षरी ही अनुक्रमे ७.७४ आणि ९.२३ मिनिटं इतक्या लांबीची होती. तेव्हा मराठमोळ्या राम लक्ष्मण यांचं या चित्रपटाला संगीत होतं.

 

६. संदेसे आते है – बॉर्डर (१० मिनिटं ४० सेकंद) –

देशभक्तीने ओतप्रेत अशा या चित्रपटाला संगीत दिलेलं अन्नू मलिक यांनी. या चित्रपटातलं हेलावून टाकणारं इमोशनल गाणं, जे आजही डोळ्यांच्या कडा ओलावतं ते म्हणजे, संदेसे आते है.

 

हे अजरामर गीत तब्बल १० मिनिटं आणि ४० सेकंद इतकं लांबलचक आहे. विशेष म्हणजे इतकं लांब असूनही हे गाणं लोकप्रिय झालं.

७. एक साथी और भी था – एल ओसी कारगील- (८ मिनिटं ४६ सेकंद) –

 

 

२००३ साली प्रदर्शित एल ओ सी कारगीलमधलं हे गाणं कारगील युध्दात हौतात्म्य पत्करलेल्या सर्व भारतीय जवानांना आदरांजली आहे. सोनू निगमच्या अजरामर गाण्यांपैकी हे एक गाणं आठ मिनिटांहून अधिक लांबीचं आहे.

८. सेंटी वाली मेंटल – शानदार – (१० मिनिटं ५ सेकंद) –

अगदी अलिकडे म्हणजे २०१५ साली प्रदर्शित आणि सुपरफ्लॉप ठरलेल्या शानदार चित्रपटातली गाणी मात्र बर्‍यापैकी गाजली.

 

 

या चित्रपटातलं सेंटी वाली मेंटल तब्बल १० मिनिटं ५ सेकंदाचं आहे. या गाण्याचं संगीत होतं सध्याच्या तरूणाईचा लाडका संगीतकार अमित त्रिवेदी याचं.

९. सुनोजी दुल्हन – हम साथ साथ है (११ मिनिटं ३६ सेकंद) –

१९९९ साली प्रदर्शित राजश्रीच्या हम साथ साथ है या चित्रपटातलं हे गाणं सर्वाधिक लांबीचं गाणं मानलं गेलं होतं. भल्या मोठ्या एकत्र कुटुंबाची गोष्ट असणार्‍या या चित्रपटात लग्न करून आलेल्या नव्या नवरीला कुटुंबातील सर्व सदस्यांची ओळख करून देणारं असं हे गाणं तब्बल अकरा मिनिटांहून जास्त लांब आहे.

 

 

हा सबंध चित्रपट म्हणजेच गाण्यांची सलग सीडी असल्यानं त्यात हे अकरा मिनिटांचं गाणंही खपून गेलं आहे आणि प्रेक्षकांनी ते सहज सहन केलं आहे.

१०. मेडली – मुझसे दोस्ती करोगी – (१२ मिनिटं ९ सेकंद) –

हम साथ साथ हैचा विक्रम २००२ साली प्रदर्शित मुझसे दोस्ती करोगे या चित्रपटातील मेडलीनं मोडला.

 

 

टिपिकल चोप्रा अवकाशगंगेतला हा चित्रपट आणि त्यातलं ह्र्तिक, करिना, राणी यांच्यावर चित्रीत ही मेडली, ज्यात अनेक हिंदी गाण्यांचं कॉकटेल बनवलं गेलं जे तब्बल बारा मिनिटांहून अधिक लांबीचं होतं. उदीत नारायण, सोनू निगम, पामेला चोप्रा, लता मंगेशकर यांनी ही बारा मिनिटांची लड लावलेली आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: ht

tps://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version