फक्त ८०० रू. कमावणाऱ्या नीता दलालला मुकेश अंबानींनी बायको म्हणून कसं निवडलं?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी या भारतातील सर्वात श्रीमंत दाम्पत्याबद्दल जाणून घ्यायला लोकांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. मुकेश सरांचं धडाडीपणे रिलायन्स उद्योग समूहाची वाटचाल करणं आणि नीता अंबानी यांचं समाजकार्यात नेहमीच असलेलं योगदान यामुळे या जोडीचं नाव नेहमीच सन्मानाने घेतलं जातं.
८ मार्च १९८५ रोजी विवाह बंधनात अडकल्यानंतर मागील ३२ वर्षात मुकेश अंबानी यांची जी भरभराट झाली आहे त्यामध्ये त्यांच्या जोडीदाराचा सुद्धा मोलाचा वाटा आहे. धीरुभाई अंबानी यांच्या मुलासाठी मुलगी शोधणं आणि ती त्यांच्या कुटुंबाच्या वातावरणाला अनुरूप असणं या दोन्ही गोष्टी नक्कीच सोप्या नसाव्यात. मुकेश अंबानी आणि लग्नाआधी भरतनाट्यम डान्सर असणाऱ्या नीता यांची जोडी कशी जमली ? सर्वात श्रीमंत अंबानी परिवाराने एका मध्यमवर्गीय घरातील मुलीला सून म्हणून का पसंत केलं असावं ? हे कुतूहल म्हणून जाणून घेऊयात.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
प्रसन्न मुद्रा असलेल्या नीता यांना सर्वप्रथम धीरूभाई अंबानी यांनी ‘बिर्ला मातोश्री’ येथील एका नवरात्रीच्या कार्यक्रमात नृत्य करतांना बघितलं होतं. धीरूभाई आणि कोकिलाबेन अंबानी हे दोघेही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
दूरदृष्टी असलेल्या धीरूभाई अंबानी यांना तेव्हाच कळलं होतं की, नीता याच आपल्या घरासाठी सून म्हणून परफेक्ट आहेत. त्यावेळी धीरूभाई अंबानी यांनी हे बघितलं नाही की, नीता या सध्या एका शाळेत शिक्षिका आहेत आणि त्यांचा पगार हा केवळ ८०० रुपये इतका आहे.
धीरूभाई अंबानी यांनी नीता यांना बघितल्यानंतर त्यांच्या घरी फोन केला जो की, नीता अंबानी यांनी तीन वेळेस ‘फेक’ कॉल म्हणून कट केला. लँडलाईन फोनच्या त्या काळात नीता यांच्या वडिलांनी तो आलेला फोन हा धीरूभाई अंबानी यांचाच आहे याची खात्री केली आणि मग या ‘अरेंज्ड मॅरेज’ची गोष्ट पुढे सरकली.
धीरूभाई अंबानी यांनी नीता यांना आपल्या ऑफिसमध्ये बोलावलं. त्यांना बरेच प्रश्न विचारले आणि नीता यांना आपला मोठा मुलगा यांना भेटण्यास विनंती केली. आपल्या साध्या राहणीने लोकांना प्रभावित करणारे मुकेश अंबानी हे नीता यांना सुद्धा प्रभावित करण्यात यशस्वी झाले होते.
जेव्हा नीता या अंबानी यांच्या घरी गेल्या तेव्हा मुकेश यांनी स्वतः त्यांचं स्वागत केलं. पांढरं शर्ट आणि काळी पॅन्ट अश्या साध्या वेशात असलेल्या मुकेश यांच्याकडे बघून नीता यांना त्यांच्यात साधेपणा दिसला आणि भावला.
लग्नाची मागणी कोणी घातली ?
नफा, तोटा, आकडे यामध्ये तरबेज असलेल्या मुकेश अंबानी यांनी इथेसुद्धा बाजी मारली आहे. नीता यांच्यासोबत झालेल्या काही भेटींनंतर मुकेश यांनासुद्धा नीता यांच्यात ‘जीवनसाथी’ दिसायला लागला होता.
आपली कार स्वतः चालवत नीता यांना मुंबई फिरवत असतांना मुकेश अंबानी यांनी शहरातील एक वर्दळीच्या ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी कार बंद केली आणि नीता यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. “हो” ऐकेपर्यंत कार बंदच राहील अशी अट त्यांनी नीता यांना सांगितली होती. नीता यांनी होकार दिला आणि त्या दोघांची गाडी सुरू झाली.
नीता यांनी हा होकार ‘अंबानी’ घराकडे न बघता केवळ मुकेश यांच्या साधेपणाकडे, ध्येयवादी स्वभावाकडे बघून दिला होता असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.
“माझ्यासारखं सामान्य माणसासारखं जगणार असाल तर मी तुमच्याशी लग्न करेल” अशी एक अट नीता यांच्यासमोर ठेवली होती. मुकेश अंबानी हे करायला सुद्धा तयार झाले आणि त्यांनी मुंबईतील डबल-डेकर बसमधून प्रवास करणे, चौपाटीवर जाऊन पाणी पुरी खाणे हे सर्व त्यांनी आवडीने केलं.
अंबानींच्या घरातला कचरा कचरापेटीत जात नाही, मग जातो कुठे? वाचून थक्क व्हाल!
हिवाळा म्हणजे लग्नाचा सीझन: बहुतेक लग्नं ही हिवाळ्यात होण्यामागे आहेत ही ६ कारणं
—
निता यांची ‘ती’ अटही मान्य झाली
“नोकरी करणं सोडणार नाही” ही अजून एक अट नीता यांनी मुकेश सरांसमोर ठेवली होती. त्यांनी ती अट सुद्धा मान्य केली. लग्नानंतरही नीता अंबानी यांनी काही वर्ष शाळेत शिक्षिकेची नोकरी सुरू ठेवली होती. गरोदरपणामुळे त्यांनी ती नोकरी सोडली.
आज नीता अंबानी या ‘धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कुल’चं व्यवस्थापन बघत आहेत.
मुकेश आणि नीता अंबानी यांनी एकमेकांना होकार दिल्यानंतर, लग्न ठरल्यानंतर या जोडीसमोर ‘वेळ’ हा सर्वात मोठा अडसर होता. मुकेश हे तेव्हा सुद्धा रोज रात्री ११ वाजेपर्यंत व्यवसाय वृद्धिंगत करण्यात व्यस्त असायचे. तेव्हा हे दोघं रात्री ११ ते १२ पर्यंत बोलायचे, भेटायचे असंही सांगितलं जातं. नीता यांना सकाळी शाळेत शिकवण्यासाठी जायचं असल्याने त्यांनी रात्री १२ ही वेळ मर्यादा पाळावी लागायची.
मुकेश अंबानी यांनी आपल्या ‘अंबानी’ असल्याचा कोणताही आव न आणता नीता यांना दिलेला मान, वागणूक, साध्या भेटवस्तू या नीता यांना जास्त आवडल्या होत्या. ‘अंबानी घराण्याची मोठी सून’ अशी केवळ ओळख न ठेवता आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी मुकेश सरांनी नीता यांना नेहमीच प्रोत्साहन दिलं आहे.
नीता आणि मुकेश अंबानी यांना अनंत, आकाश आणि ईशा हे तीन आपत्य आहेत. त्यापैकी ईशा आणि आकाश यांचे विवाह झाले आहेत.
मुकेश अंबानी यांनी नीता यांना त्यांच्या साधेपणामुळे, आपल्या मतांवर ठाम राहण्याच्या स्वभावामुळे आणि पैश्याकडे सर्वस्व म्हणून न बघण्यामुळे पसंत केलं होतं असं एका मुलाखतीत सांगितलं होतं.
“आमचं नातं हे ‘अंबानीज्’ पेक्षा श्रीमंत आहे” हे त्यांनी वापरलेलं वाक्य हे त्यांचं नातं किती दृढ आहे हे सांगण्यासाठी पुरेसं आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: ht
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.