Site icon InMarathi

सपाच्या संपर्कात येताच दारोदारी दूध विकणारा अजय चौधरी, ५०० करोडोंचा मालक कसा काय बनला?

akhi 2 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आयकर विभागाने मंगळवारी ४ जानेवारी २०२२ रोजी देशातील प्रसिद्ध बिल्डर आणि ACE रिअल इस्टेट ग्रुपचे मालक असलेल्या अजय चौधरी यांच्या दिल्ली, आग्रा आणि नोएडा तसेच इतर अनेक ठिकाणी असलेल्या ठिकाणांवर धाड टाकली.प्रख्यात बिल्डर अजय चौधरी हे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव ह्यांच्या जवळच्या संबंधातील व्यक्ती असल्याचे सांगितले जाते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आयकर विभागाने ACE ग्रुपच्या ३० ठिकाणांवर धाड टाकली आहे कारण ह्या समूहाचे अनेक प्रकल्प सध्या नोएडा आणि NCR मध्ये सुरू आहेत.

४ जानेवारी २०२२ च्या सकाळी ८ वाजल्यापासून नोएडाच्या सेक्टर १२६ कार्यालयात छापेमारी सुरू आहे. पण एकेकाळी आपल्या गावात दूध विकणाऱ्या अजय चौधरीचे नाव देशातील बड्या बिल्डर्समध्ये कसे काय सामील झाले? त्याच्या ह्या यशाचे नेमके काय रहस्य आहे?

 

 

बागपतचे रहिवासी असलेले अजय चौधरी नोएडातील बड्या बांधकाम व्यावसायिकांपैकी एक समजले जातात. १५ वर्षांपूर्वी पायी दूध विकणारा संजू नागर आज चक्क ५००० हजार कोटींचा मालक झाला आहे. याचे रहस्य म्हणजे २०१० ते २०१७ ह्या काळात राजकीय कृपेमुळे त्यांनी एवढे यश मिळवले की साधा दूधविक्रेता असलेला संजू नागर आज अजय चौधरी म्हणून ACE ग्रुपचा मालक म्हणून मिरवतो आहे.

 

 

अजय चौधरी उर्फ संजू नागर सध्या नोएडा येथे वास्तव्याला आहे. पण एकेकाळी अजय त्याच्या बागपतमध्ये असलेल्या महरामपूर गावातून दूध विकण्यासाठी ट्रेनने दिल्लीला जात असे.

स्थानिक गावकरी सांगतात की २० वर्षांपूर्वी अजयची गावातच दुधाची डेअरी होती. नंतर त्याने दिल्लीतील यमुना विहार येथे सायकलने व ट्रेनने दूध विकण्यास सुरुवात केली. कधी कधी लांबच्या अंतरासाठी तो बाइकचा वापर करत असे.

नंतर त्याने काही काळ नोएडा येथे खासगी नोकरीही केली. ह्या काळात तो सपा नेत्यांच्या संपर्कात आला. संजू नागरची तत्कालीन जिल्हा पंचायत अध्यक्ष ओंकार यादवशी भेट झाली. ओंकार यादवनेच संजूची मुलायमसिंह यादव यांच्याशी ओळख करून दिली.

यानंतर संजू नागरने मागे वळून पाहिले नाही आणि त्याच्या भरभराटीला सुरुवात झाली. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या २०१० ते २०१७ याकाळात म्हणजेच योगी सरकार सत्तेत येण्यापूर्वी संजू नागर उर्फ अजय चौधरी ह्याच्यावर लक्ष्मीची (की यादवांची) अशी कृपा झाली की तो काही वर्षांतच करोडोंच्या मालमत्तेचा मालक बनला. त्याचे नाव देशातील प्रमुख बिल्डर्सच्या यादीत घेतले जाऊ लागले.

 

 

असे म्हणतात की १२ वर्षांपूर्वी संजू गावात आला आणि त्याने संपूर्ण वस्तीच विकत घेतली आणि ४० बिघा जमिनीवर एक आलिशान वाडा बांधला. संजूच्या महालाच्या उद्घाटनासाठी खुद्द मुलायमसिंह येणार होते, मात्र मुझफ्फरनगरच्या दंगलीमुळे ते येऊ शकले नाहीत असे बोलले जाते. स्वतःच्या घराच्या/महालाच्या उद्घाटनासाठी संजूने एक कोटी रुपये खर्च केले होते.

त्याच्या गावातील छोट्याश्या घराचं एका मोठ्ठ्या फार्म हाऊसमध्ये रूपांतर झालं. त्याचे हे तीन मजली घर एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही. ह्या आलिशान घरात त्याचे कुटुंबीय आनंदाने राहतात. त्याला एक मोठा भाऊ प्रताप उर्फ सतीश,आई, पत्नी कृष्णा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्याचे काका राजेंद्र हे गावचे माजी सरपंच आहेत. अजय चौधरीच्या मालकीच्या असलेल्या २५ कंपन्यांची उलाढाल ५००० कोटींपर्यंत असल्याचे आयटी धाडींमध्ये आढळून आले आहे.

 

 

तसेच दिल्लीतील पॉश भागात असलेल्या वसंत विहारमध्येही त्याचे एक आलिशान घर आहे. मुलायम सिंह आणि अखिलेश यादव यांच्या कृपेने संजू आता अजय चौधरी या नावाने ओळखला जातो. नोएडा येथील बिसरख येथे दोन हजार बिघा जमिनीवर त्याने अनेक गगनचुंबी इमारती उभारल्या आहेत. अजय चौधरीची कंपनी ACE ग्रुपची ब्रँड अँबेसिडर बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आहे. एवढेच नाही तर बॉलिवूड स्टार शाहरुख खानची पत्नी गौरी त्याच्या फ्लॅटचे प्रमोशन करते.

 

यापूर्वी देखील सपाच्या जवळच्या संबंधातील अनेक लोक आयकर विभागाच्या धाडींमध्ये पकडले गेले आहेत. २०२१च्या डिसेंबरमध्ये आयटी अधिकार्‍यांनी आग्रा येथील मनोज यादव, लखनऊमधील नीतू यादव उर्फ जैनेंद्र यादव या सपा नेत्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या कामाच्या ठिकाणी/निवासस्थानी धाड टाकली होती.

तसेच यापूर्वी पूर्व उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यातील सहादतपुरा भागातील राजीव राय यांच्या देखील घरावर आयकर विभागाने धाड टाकली होती.

राजीव राय हे समाजवादी पक्षाचे सचिव आणि प्रवक्ते आहेत. अलीकडेच अत्तर व्यापारी पियुष जैन यांच्यावरही धाड टाकण्यात आली होती. ह्या धाडीत २८४ कोटी रुपयांची रोख रक्कम, २६ किलो सोने आणि ६०० किलो चंदन जप्त करण्यात आले. जैन हे सुद्धा समाजवादी पक्षाच्या जवळच्या संबंधातील आहेत. त्यानंतर सपाचे एमएलसी पुष्पराज जैन यांच्यावरही आयकर विभागाने धाड टाकली होती.

आयकर विभागाच्या छाप्यांमध्ये अजय चौधरीच्या मालकीच्या कंपन्यांची उलाढाल पाच हजार कोटी रुपयांच्या घरात असल्याची माहिती मिळाली आहे. अजय सुमारे तीनशे कोटींचा कर भरतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वीही अजय चौधरीच्या घरावर इन्कम टॅक्सने छापे टाकले होते, मात्र त्यादरम्यान काहीही सापडले नव्हते.

आता नोएडा सेक्टर-१२६मध्ये असलेल्या ACE ग्रुपच्या मुख्य कार्यालयासह अनेक ठिकाणी धाड टाकण्यात आली आहे. पण यावेळी ह्या धाडीत काय सापडले आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: ht

tps://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version