या १३ गोष्टी कटाक्षाने पाळल्या तर निद्रानाशाचा त्रास कधीच होणार नाही!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
शांत झोप लागणं हा एक अभ्यासाचा विषय झाला आहे. पूर्वी माणूस थकून भागून घरी आला की त्याला जेवण झाल्यावर अगदी शांत झोप लागायची. आता आपल्याला सोशल मीडियामुळे झोप येत असूनही झोपायचं नसतं पण ते आरोग्यासाठी योग्य नाही.
अपुऱ्या झोपेमुळे पुढील दिवस वाया जातोच, मात्र आरोग्याच्याही अनेक समस्या निर्माण होतात. अपचन, अॅसिडीटी, चीडचीड, डिप्रेशन यांसारखे विकार जडतात ते कायमस्वरुपी. मग औषधं, उपचार, डाएट अशा कठीण प्रसंगांना सामोरं जाण्यापेक्षा रोजची झोप महत्वाची.
शांत झोप ही आपली गरज आहे. आपली सगळी ऊर्जा आणि वेळ हा सोशल मीडिया वर जातोच तर त्याच सोशल मीडियाचा वापर करून शांत झोप लागण्यासाठी काय उपाय करावेत ते बघूया.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
शांत झोप लागण्यासाठी हे उपाय करा :
१. वेळेत जेवणे
कितीही व्यस्त असलात तरीही संध्याकाळी सातच्या दरम्यान जेवणे हे शरीरासाठी उपयुक्त आहे.जेवण झाल्यावर अर्ध्या पाऊण तासाने गार किंवा गरम दूध प्यावे. दुधामध्ये tryptophan नावाचं अमिनो ॲसिड असते ज्याने चांगली झोप लागायला मदत होते.
शिवाय रात्रीच्या जेवणानंतर शतपावली केलीत तर जेवण पचायला मदत होते आणि शांत झोपही लागते.
२. योगा करणे
शारीरिक, मानसिक स्वास्थ्यासाठी योग आवश्यक आहे. मानसिक स्वास्थ्य चांगलं असेल तर डोक्यात विचारांचा कल्लोळ होत नाही आणि चांगली झोप लागते.
३. कॅफिनचं सेवन करू नये
कॅफिन हे झोपेसाठी अतिशय हानिकारक आहे. झोपण्याच्या ३ तास आधी जर कैफिनचे सेवन केले तर झोप लागणार नाही. त्यामुळे संध्याकाळनंतर कॉफी सारख्या पेयांना नाही म्हटलेलेच बरे!
४. तेल मालीश
शरीराला किंवा डोक्याला तेल मालीश करणे हे शांत झोपेचे गुपित आहे. मालीश झाल्यावर दिवसभराचा ताण नाहीसा होतो, ताण गेला की आपोआप झोप चांगली लागेल
५. रात्री झोपण्यापूर्वी ‘हे’ खावे
बदाम, अंजीर, किवी, दलिया आणि भात ह्यापैकी पदार्थांचे सेवन केल्यास शरीर सुदृढ तर होईलच आणि झोपही चांगली लागते.
६. मोबाइलचा वापर कमी करणे
मोबाईलचा वापर ही सर्वात मोठी चूक आहे. अनेकदा आपल्या डोळ्यांवर झोप असूनही मोबाईलवरील सिनेमा, वेबसिरीज किंवा अन्य सोशल मिडीयामुळे आपण झोप लांबवतो.
मोबाईल किंवा कुठलीही स्क्रीन झोपण्याच्या अर्ध्यातासापूर्वी बंद ठेवावी. डोळ्यांना आलेला दिवसभराचा ताण कमी करावा आणि स्वच्छ चेहरा धुवून झोपावे.
७. लाईट म्युझीक किंवा इन्स्ट्रुमेंटल म्युझीक ऐकणे
आपल्याला जो गायक आवडतो त्याचं गाणं किंवा लाईट म्युझिक ऐकत झोपावे. म्युझिक ऐकूनही मन शांत होते. गाढ झोप लागते.
अर्थात हे संगीत निवडताना काळजी घ्या, रॉक म्युझिक, गोंगाट असणारं कोणतंही गाणं टाळा.
८. कम्फटर
अपुरी किंवा उशीरा लागणारी झोप यासाठी अनेकदा तुमची गादीही जबाबदार असते. त्याकडे लक्ष द्या. मऊ गादी आणि मऊ उशी असेल तर छान झोप लागते व झोप पूर्णही होते.
९. कुठल्या स्थितीत झोपावं ?
सरळ झोपून पाय जवळ घेऊन पूर्ण पाठ टेकली की चांगली झोप लागते आणि पाठ दुखीसारखे त्रासंही होत नाहीत .
१०. डोळ्यांचा मसाज
तेल किंवा आय क्रीम लावून डोळ्यांखाली हळुवार हात फिरवून मसाज करावा म्हणजे स्क्रीन बघून आलेला ताण निघून जातो आणि झोप चांगली लागते.
११. काळोख करणे
तुमच्या खोलीत एक छोटा दिवा देखील लावू नये, पूर्ण काळोख करून झोपल्यावर गाड झोप लागते, डोक्यात कमी विचार येतात.
अनेकदा खोलीत येणारा अंधुकसा प्रकाशही झोप अस्वस्थ करतो.
१२. देवाचे स्मरण
तुम्हाला जर कुठला श्लोक येत असेल तर तो मनात म्हणावा म्हणजे लवकर झोप लागते. नामस्मरण केल्यानेही शांत झोप लागते.
–
- महिलांनो, आपल्या रुपाची अशी काळजी घेऊन तुम्ही मेकअप शिवायही देखण्या दिसू शकता
- टॉयलेट मध्ये फोन कशासाठी नेताय, वाचा, या वाईट गोष्टींपासून वेळीच सावध व्हा
–
झोप लागण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत. आपल्या रोजच्या रुटीनमध्ये हे बदल केले तर कोणत्याही औषधांविना आपल्याला लवकर आणि शांत झोप लागू शकते. अर्थात त्यासाठी जागृक राहणे गरजेचे आहे.
रात्रीची पुरेशी झोप तुम्हाला नव्या दिवसात काम करण्याची उर्जा देते त्यामुळे झोपेकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: ht
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.