' पती, पत्नी और वो; संजय खानने झीनत अमानला ताजमध्ये केलेली मारहाण… – InMarathi

पती, पत्नी और वो; संजय खानने झीनत अमानला ताजमध्ये केलेली मारहाण…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

ऐंशीच्या दशकात झिनत अमान हे ग्लॅमरचं प्रतिक मानली जात असे. आपल्या मादक अदांनी आणि बोल्ड सिन्समुळे अल्पावधीतच झिनत अमान लोकप्रिय बनली होती. संजय खान हा अत्यंत तापट स्वभावाचा अभिनेता त्या काळात ‘बडे घर का बिगडा लौंढा’ म्हणून कुप्रसिध्द होता. अशा या संजय खानचं लग्न झालेलं असलं तरिही एकाचवेळेस त्याचं झिनत अमान आणि आणखिन एका पत्रकार महिलेसोबतही अफेयर रंगलं होतं. प्रेमात माणूस आंधळा होतोच मात्र संजय खान आणि झिनत सारखी माणसं क्रूरही होतात. याच क्रुरतेतून अशी एक घटना घडली जिनं झिनत अमानचं सौंदर्य हिरावून घेतलं.

 

sanjjay khan im

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

आज बॉलिवुडमधली काही कुटुंबं ही ए श्रेणीतली मानली जातात. बच्चन, कपूर्स, रोशन्स, खान्स आणि या खानांमधलं जूनं कुटुंब म्हणजे फिरोज खान कुटुंबिय. देखणा फिरोज मुंबईत करियर करायला आला आणि त्याच्या रुबाबदार, लेडिकिलर लूकमुळे अल्पावधीतच त्यानं फिल्म इंडस्ट्रीत बस्तान बसविलं.

गावाकडे त्याच्या अनेक भावंडातला एक संजय हा गावावरून ओवाळून टाकलेला, वाया गेलेला,आयुष्यात काही होऊ न शकणारा भाऊ होता. आईवडिलांना त्याला मोठ्या भावाकडे मुंबईत पाठविलं. संजय मुंबईत आला तोवर फिरोज खान या नावाचा दबदबा झाला होता अर्थातच या दबदब्याची हवा संजयच्या डोक्यात गेली. आधीच मग्रुर असणारा संजय आता जास्तच माजोरडा झाला.

 

sanjay feroz im

 

 

त्याचे आणि ऋषी कपूरच्या टशनचे अनेक किस्से इंडस्ट्रीत आजही प्रसिध्द आहेत. ऋषी कपूर हा देखिल खानदानी, तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला स्टारकिड होता आणि कोणाचीही अरेरावी सहन न करणारा होता. त्याच्या समोर जेंव्हा जेंव्हा संजय खान आला तेंव्हा तेंव्हा ऋषीनं हातचं न राखता त्याचा भरपेट अपमान केला.

संजय खानची बायको झरिन (सुझानची आई आणि ह्रतिकची सासू) ऋषी-नीतूशी मैत्री असणारी होती. अनेकदा संजयला मार खाण्यापासून तिच्या पाया पडण्यानं वाचवलं. त्याच्या या अशा गुणांमुळेच एकदा इंडस्ट्रीतून बाहेर जाण्याची नामुष्की त्याच्यावर ओढावलेली होती मात्र इथेही झरिननं अक्षरश: ऋषीचे पाय धरले आणि कशीबशी त्याची सूटका झाली.

कोणे एकेकाळी टिपू सुलतान सारखी मेगा सिरियल देणार्‍या संजय खानचं वैयक्तिक आयुष्य त्याच्या पत्नीनं अनेकांचे पाय धरण्यामुळे सावरलं होतं. पतीवरचं आंधळं प्रेम झरिनला स्वाभिमान बाजूला ठेवायला लावत असे. मात्र हाच पती जेंव्हा झिनतच्या प्रेमात पडला आणि त्यांनी चोरून लग्न केल्याच्या खात्रीशीर बातम्याही तिच्या कानावर आल्या तेंव्हा मात्र ती चवताळली.

 

zareen khan im

 

झिनतचा संजयच्या आयुष्यात शिरकाव म्हणजे आपली कायमची सुट्टी हे समजण्याइतकी ती हुशार होती. झिनत विरूद्ध तिनं घरच्यांना भडकावयला सुरवात केली. इकडे अब्दुल्लाच्या एका सिनवरून झिनत आणि संजयमधेही तणाव निर्माण झाला होता. काही सिनचं पुन्हा चित्रीकरण होणं गरजेचं होतं मात्र झिनतकडे तारखा नव्हत्या. झिनतच्या नकारानं संजय पिसाटला होता. याचा फायदा झरिननं करून घेत संजयला आणखीन भडकवायचं काम सुरू ठेवलं.

इकडे झिनतच्या कानावरही या गोष्टी येत होत्या. तिचं संजयवर खरंखुरं प्रेम होतं. तिच्या कानावर आलं की संजयच्या मनात झिनत आणि एका निर्मात्याच्या संबंधांविषयी शंका आहे. संजयचा स्वभाव ती ओळखून होती. वेळीच हा संशय दूर केला नाही तर पुढे काय परिस्थिती ओढावेल हे तिला माहीत होतं.

तिनं शुटिंग अर्ध्यात थांबवून थेट मुंबई गाठली आणि ती संजयच्या घरी जाऊन पोहोचली. इथे तिला संजय आणि खान कुटुंब ज्या पंचतारांकित हॉटेलमधे पार्टी करत होतं तिथे पाठविण्यात आलं. खान कुटुंब प्रशस्त अशा सूटमधे हसण्याखेळण्यात आणि मदिरापानात रमलं होतं इतक्यात तिथे झिनत आली. तिला बघताच संजयचा पारा चढला.

 

zeenat im

 

तिला तो सूटमधल्या लागून असणार्‍या खोलीत घेऊन गेला आणि अक्षरश: लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरवात केली. तिचे केस ओढत तिला भिंतीवर आपटत राहिला. झिनतच्या किंकाळ्या ऐकून झरिन बाजूच्या खोलीतून आली आणि शांतपणे हसत हे सगळं पहात राहिली. इतकंच नाही तर पतीला मारहाणीसाठी प्रोत्साहन देत राहिली.

ही मारहाण इतकी जबरदस्त होती की झिनतचा जबडा तुटला. शस्त्रक्रियेनंतर जबडा जरी ठीक झाला तरिही तिच्या डोळ्याला झालेली दुखापत कधीच बरी होऊ शकली नाही आणि झिनतचं सौंदर्य एका क्षणात नष्ट झालं. तिचं करियर संपुष्टात आलं.

 

zeenat sanjay im

 

या घटनेनंतरही अर्थातच संजय खान कुटुंबाचा इंडस्ट्रीतला रुबाब तोच राहिला. कारण लोकांची स्मरणशक्ती कमकुवत असते. याच झरिनचं नंतर रोशन्सची देखणी विहिण म्हणून मिडियानं कौतुक केलं. झिनतचं सौंदर्य आणि ही मारहाण मात्र काही मासिकांच्या लेखांत बंद झाली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?