‘सेल्फी में ने ले ली आज’ म्हणत पहा ढिंच्याक पूजा कसा रग्गड पैसा कमावतेय!
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
आज इंटरनेट वापरणाऱ्या प्रत्येकाला ढिंच्याक पूजाचे नाव माहित झाले आहे. बेसूर आवाज, वेडेवाकडे हातवारे आणि म्युजिक व्हिडीयोच्या नावाला कलंक लावणारी मुलगी म्हणून आज सर्वदूर तिची चर्चा आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर आजच्या इंटरनेटवरचा ती कॉमेडी टॉपिक आहे. शिव्या खाऊन चर्चेत असणाऱ्या व्यक्तींमध्ये तिचे नाव आघाडीवर आहे. तुमची देखील इंटरनेटवर या तरुणीशी कुठे ना कुठे गाठभेट झालीच असेल. तुम्ही देखील तिच्यावर हसला असाल, तिची खिल्ली उडवली असेल, मित्रांसोबत तिच्या व्हिडियोची मस्करी केली असेल. एकप्रकारे वगैरे वगैरे प्रकारे तुम्ही देखील तिचा उद्धार केला असेल. आणि याच प्रकारे संपूर्ण देशभरातील ट्रोलर्सनी तिचा जोकर केला. पण तिचा जोकर करता करता किंवा तिची मस्करी करता करत आपण हेच विसरलो की हळूहळू आपणच तिला मोठ करतोय आणि आज आपल्याच कृपेने ती प्रसिद्धीच्या शिखरावर पोचली आहे आणि सोबतच मालामाल देखील झालीये.
जेव्हा आपण तिच्या युट्युब वरील व्हिडियो वर क्लिक करून तिच्यावर हसतो, तेव्हा अनपेक्षितपणे आपण तिची कमाई वाढवत असतो. आज आम्ही तुमच्यासमोर तिची हीच कमाई उघड करणार आहोत जी पाहून तुम्हालाआश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
गूगल जाहिरातींच्या माध्यमातून युट्युबवर पूजाची प्रत्येक १००० व्हूजच्या मागे १ ते १.५ डॉलर कमाई आहे.
युटयूबमधून कमाई मोजण्याचे समीकरण असे आहे- व्हिडीओ वर क्लिक्स/१००० * १ किंवा १.५ डॉलर.
उदाहरणार्थ,
सेल्फी मैने ले ली आज” या व्हिडीओला १० दशलक्षपेक्षा जास्त व्हूज आहेत, जर आकडेमोड केली तर लक्षात येते की त्या व्हिडीयोची कमाई १०००० डॉलर ते १५००० डॉलरच्या (१० लाख रुपयांच्या आसपास) मध्ये असेल.
सोशल ब्लेड नावाचे संकेतस्थळ यूटयूब, इंस्टाग्राम आणि ट्वीटर सारख्या सोशल साईट वापरणाऱ्या लोकांच्या संख्येचा हिशोब ठेवते. ह्या व्यतिरिक्त Adsense मधील कमाई लोकेशन आणि यूजरच्या कॅटेगरी ऑफ इंटरेस्टवर पण अवलंबून असते. या हिशोबाने ढिंचॅक पूजा दर महिन्याला ५००० डॉलर पासून ८० हजार डॉलर पर्यंत म्हणजेच ३.२० लाखांपासून ५० लाख रुपयांपर्यंत कमाई करते.
ह्या व्यतिरिक्त काही अजून घटक आहेत जे यूटयूब मधून होणारी कमाई निर्धारित करतात, पण १ ते १.५ डॉलर च्या आकड्याला जास्त करून निर्णायक मानले जाते. परंतु,वाढणाऱ्या आणि कमी होणाऱ्या व्हूज मधून नेमकी कमाई सांगणे खूप कठीण आहे.
ढिंच्याक पूजाला तिच्या सेल्फी गाण्यासाठी यूटयूब जाहिरातींमधून जवळपास २.२४ लाख ते ४.९ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे.
एवढी कमाई म्हटली तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना ६-१२ महिने घाम गाळावा लागेल, तेव्हा कुठे २-५ लाख रुपये पदरात पडतील. पण ढिंच्याक पूजाने मात्र तिच्या अतरंगी व्हिडियोमधून सहज आपलाच वापर करून लाखोंची कमाई केली आहे. ढिंच्याक पूजा वाटते तेवढी मूर्ख नक्कीच नाही! कारण तिला माहिती आहे की, इंटरनेटवर हजारो असे लोक बसले आहेत जी तिच्या बेसुऱ्या गाण्याविषयी वाईट बोलून-बोलून तिला प्रसिद्ध करतील. ढिंच्याक पूजाचा ही समोरच्याच्या डोक्याला ताप देणारी शैलीच तिचा युएसपी आहे.
तुम्ही तिच्यावर हसण्यासाठी आणि तिच्याविषयी वाईट बोलण्यासाठी तिच्या व्हिडीओवर क्लिक कराल, त्याचवेळी कोणत्यातरी समांतर विश्वातून ती तुमच्या वेडेपणावर हसत असेल.
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi