उगमाचे रहस्य ते बंद असलेली गुहा: वैष्णोदेवी मंदिराची फारशी माहीत नसलेली ८ गुपितं
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
वैष्णोदेवी हे पूर्व भारतातील सर्वोच्च श्रद्धास्थान आहे. दरवर्षी भाविक हे तिथल्या यात्रेची सुरुवात कधी होणार ? दर्शनासाठी काही निर्बंध आहेत का ? याकडे लक्ष लावून असतात.
वैष्णोदेवीचा विचार जरी मनात आला की, सुप्रसिद्ध गायक चंचल यांनी गायलेलं “चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है” हे प्रत्येकाला आठवतंच. देवीवर श्रद्धा असलेले लोक हे मानतात की, तुम्ही कितीही प्लॅन करा, जोपर्यंत वैष्णोदेवी तुम्हाला तिच्या दर्शनाला “या” म्हणत नाही, तोपर्यंत तुम्ही त्या दिशेने पावलं उचलत नाहीत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
जगातील भाविक आणि पर्यटकांचं आकर्षण असलेल्या वैष्णोदेवी मंदिराबद्दल कमी प्रचलित असलेल्या काही गोष्टी या लेखात सांगत आहोत:
१. स्थापना कुठे आणि कधी झाली ?
वैष्णोदेवीचं मंदिर हे कटरा पासून १३ किलोमीटर अंतरावर आहे. जम्मू-काश्मीर मधील त्रिकुटा पर्वतावर वसलेल्या या मंदिराला दरवर्षी लाखो देशी विदेशी भाविक, पर्यटक भेट देत असतात.
नवरात्री मध्ये ही संख्या कोटींमध्ये जाते. समुद्र सपाटीवरून ५२०० फुट उंचीवर असलेलं हे मंदिर प्रशासन यात्रेकरूंची व्यवस्था ठेवू शकतं ही गोष्ट कौतुकास्पद आहे.
२. ‘गर्भाजन लेणी’ :
वैष्णोदेवीच्या मंदिराला ‘गर्भाजन लेणी’ या नावाने सुद्धा ओळखलं जातं. अशी आख्यायिका आहे की, माता वैष्णोदेवी ही तिच्याशी जबरदस्तीने विवाह करण्याच्या मनसुब्याने आलेल्या भैरवनाथापासून ९ महिने या जागेत एखाद्या गर्भाप्रमाणे सुरक्षित राहिली होती.
त्यामुळे इथलं दर्शन घेणाऱ्या महिलेला गर्भवती असतांना कमी त्रास होतो अशी स्थानिक लोकांमध्ये मान्यता आहे.
३. मंदिर कोणी बांधलं ?
वैष्णोदेवीने कालांतराने भैरव यांचा खात्मा केला आणि त्याचं धड खोलदरीत टाकून दिलं. वैष्णोदेवीने जेव्हा पंडित श्रीधर यांच्या रूपाने जन्म घेतला तेव्हा त्यांनी हे मंदिर बांधलं असा या मंदिराचा इतिहास सांगितला जातो.
वैष्णोदेवीचं मंदिर कधी बांधण्यात आलं ? हे मात्र आजही एक गूढ आहे.
४. भैरवनाथाचं मंदिर का बांधण्यात आलं ?
अशी एक आख्यायिका आहे की, भैरवनाथाला मारल्यानंतर त्याचा आत्मा त्रिकुटा पर्वतावर भटकत होता. भैरवनाथाचा आत्मा हा आपल्या दुष्कृत्याची माफी मागण्यासाठी वैष्णोदेवीची याचना करत होता. वैष्णोदेवीने मोठ्या मनाने भैरवनाथाला माफ केलं. पण, त्यामुळे तिच्या ध्यान साधनेत खंड पडला.
आपली ध्यानसाधना अखंड सुरू रहावी यासाठी देवीने स्वतःचं रूपांतर खडकामध्ये केलं. देवीचं हे रूप ज्या जागी स्थापित झालं त्या ठिकाणी मंदिर बांधण्यात आलं आणि त्याला ‘प्राचीन भैरव मंदिर’ हे नाव देण्यात आलं.
५. वैष्णोदेवी मंदिर हे बंद का होतं ?
‘शक्तीपीठ’ म्हणून ओळखलं जाणाऱ्या या जागेत ३ प्रमुख लेण्या आहेत. अतिप्राचीन असलेली लेणी ही आता सुरक्षेच्या दृष्टीने विचार करून बंद ठेवण्यात आली आहे. ही लेणी ओलांडून पलीकडे जाणं हे भाविकांना कठीण जाऊ शकतं.
इतर २ लेण्या या कृत्रिम, नंतर बांधलेल्या आहेत. या २ लेण्या तुम्हाला मुख्य मंदिरात स्थापना करण्यात आलेल्या पिंडीपर्यंत नेतात.
६. मंदिराची पूजा आणि धार्मिक महत्व:
वैष्णोदेवीच्या मंदिरात रोज सकाळी आणि संध्याकाळी मनोभावे पूजा-आर्चा, आरती होत असते. महालक्ष्मी मातेच्या या मंदिराला ‘माता राणी’चं मंदिर या नावाने सुद्धा ओळखलं जातं.
हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार मानल्या जाणाऱ्या ३३ कोटी देवी देवतांचा या जागेत आशीर्वाद आहे असं धर्म प्रचारक सांगत असतात.
७. महाभारताशी असलेला संबंध:
महाभारताचं युद्ध सुरू होण्यापूर्वी अर्जुनाला आशीर्वाद द्यायला आलेली दुर्गा माता ही वैष्णोदेवीच्या रुपाने महाभारत घडत असतांना पांडवांना उंचीवरून आशीर्वाद देत होती.
वैष्णोदेवी मंदिर हे प्रामुख्याने पाच मोठ्या दगडांनी बांधण्यात आलं आहे जे की पाच पांडवांचं प्रतीक आहे.
८. वैष्णोदेवीची इतर धर्मीयांमध्ये असलेली मान्यता:
हिंदू धर्मीय व्यक्तींशीवाय शीख धर्मीय सुद्धा वैष्णोदेवीच्या दर्शनाला आवर्जून येतात. कारण, शीख धर्मसंस्थापक गुरू गोविंदसिंग यांनी सुद्धा वैष्णोदेवीचं दर्शन घेतल्याची इथे नोंद आहे.
वैष्णोदेवी मंदिराचा हा इतिहास वाचल्यावर आपल्या मनात सुद्धा तिथे जाण्याची इच्छा निर्माण होत असेल हे नक्की. पुन्हा डोकं वर काढू पहाणाऱ्या कोरोनाचा संहार झाल्यानंतर आपण पूर्व भारताचा दौरा करून वैष्णोदेवीचं दर्शन घेऊन शकतो… तेही तिने बोलावलं तर…
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.