Site icon InMarathi

कोविडमुळे कोमात गेलेल्या रुग्णाला चक्क व्हायग्राच्या गोळीने जीवनदान दिलं!

monica almeda IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

देवाची करणी आणि नारळात पाणी, ही म्हण आपल्या पूर्वजांनी उगीच नाही बनवली. अनेक अनुभवांती ती सिद्ध झाली आहे. मित्रांनो या म्हणीचा विषय आत्ता काढण्याचे कारण ही तसेच घडले आहे, ते ही चक्क इंग्लंडमध्ये! नाही न विश्वास बसत? चला मग जाणून घेऊ ही नवलकथा.

वायग्रा हे एक औषध आहे ज्याचे खरे नाव सिल्डेनाफिल सायट्रेट आहे. व्हायग्रा हे त्याचे मूळ नाव आहे. २७ मार्च १९९८ रोजी अमेरिकन फार्मास्युटिकल कंपनी फायझरने हे औषध पहिल्यांदा बाजारात आणले. यामागे एक रंजक कथा आहे.

 

 

फायझरचे संशोधक हृदयविकाराच्या ‘अँजाइना’वर उपचार करण्यासाठी ‘सिल्डेनाफिल’ या नवीन औषधावर प्रयोग करत होते. या औषधाचा छातीत दुखणे कमी करण्यात फारसा फायदा झाला नाही, परंतु पुरुषांना त्याचे विचित्र दुष्परिणाम भोगावे लागले.

औषध खाल्ल्यानंतर अनेक पुरुषांना लिंगात ताठरता जाणवल्याची त्यांनी तक्रार केली, संशोधकांनी या दुष्परिणामांचा रीतसर अभ्यास केला आणि रिपॅकिंग नंतर ‘व्हायग्रा’ बनवले. खरी गम्मत पुढेच आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कोरोनाच्या वेगवेगळ्या रूपांनी सध्या कहर केला आहे, जो अजूनही सुरू आहे. त्यावर अद्याप कोणतेही औषध तयार झालेले नाही. अशा स्थितीत डॉक्टर वेगवेगळ्या आजारांवरील औषधांचा वापर करून रुग्णांचे प्राण वाचवत आहेत.

या गोष्टीत आणखी एक प्रयत्न यशस्वी झाल्याचे दिसून आले. त्याचे नाव आहे ‘वियाग्रा’. या औषधाने ४५ दिवसांपासून कोमात असलेल्या नर्सला परत आणण्यात मोठे यश मिळाले आहे.

 

इंग्लंडमधील ‘गेन्सबोरो लिंकनशायरमध्ये’ ४५ दिवसांपासून कोमात असलेल्या एका नर्सला व्हायग्राचा भारी डोस देण्यात आला. त्यामुळे आता ती शुद्धीवर आली आणि बरी आहे.

‘मोनिका आल्मेडा’ या कोरोना रुग्णांवर उपचार करत होती. याच दरम्यान तिला कोरोनाची लागण झाली. तेव्हा तिच्या सहकार्‍यांनी व्हायग्रा वापरुन तिच्यावर उपचार करण्याची कल्पना अमलात आणली, जी यशस्वी झाली.

मोनिका १६ नोव्हेंबरपासून कोमात होती. त्याआधी ऑक्टोबरमध्ये तिला कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे उपचारानंतर ती घरी आली होती. मात्र तिला पुन्हा श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि तिला तातडीने रुग्णालयात जावे लागले.

प्रकृतीत कोणतीही सुधारणा न झाल्याने ती कोमात गेली. ४५ दिवस कोमात राहिल्यानंतर तिच्या सहकाऱ्यांनी नवीन प्रयोग म्हणून तिला व्हायग्राचा डोस दिला. ज्याने अप्रतिम काम केले.

 

 

मोनिका पुन्हा शुद्धी येऊ लागली. तिला व्हायग्राचा हेवी डोस देण्यात आला होता. ज्यामुळे त्यांची ऑक्सिजनची पातळी राखण्यास मदत झाली. तिला आधीच अस्थमा होता, त्यामुळे तिची ऑक्सिजनची पातळी सतत घसरत होती, व्हायग्राचा वापर रक्तदाब सुधारण्यास उपयुक्त आहे.

व्हायग्रा फुफ्फुसांमध्ये फॉस्फोडीस्टेरेझ एन्झाइम तयार करून फुफ्फुसांना आराम देते. त्यामुळे ऑक्सिजनची पातळी ठीक झाली आणि मोनिकाचा जीव वाचला. आता ती पूर्णपणे बरी आहे. तिला शुद्धीवर आणण्यासाठी डॉक्टरांनी इरेक्टाइल डिसफंक्शनसाठी औषध वापरले.

मोनिका आल्मेडा या प्रयोगासाठी आणि तिचा जीव वाचवल्याबद्दल तिच्या सहकाऱ्यांची मनापासून आभार मानते.

‘द सन’ च्या रिपोर्ट्सनुसार, आता मोनिकाची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे आणि ती तिच्या घरी पुढील उपचार घेत आहे. येथे आपण हे पूर्णपणे स्पष्ट करूया की व्हायग्रा कोणत्याही प्रकारे कोरोना संसर्गाच्या उपचारासाठी किंवा प्रतिबंधासाठी लिहून दिलेली नाही.

 

 

निदान भारतात तरी हे औषध कोरोना बाधितांना देण्यास परवानगी नाही. ही बातमी केवळ एक सुप्रसिद्ध प्रकरण समोर आणते, ज्याला तूर्तास अपवाद आणि योगायोग म्हणणे चांगले नाही का?

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version