Site icon InMarathi

कानफाट्या नाव पडलं की ते कायमचं: उघड्यावर लघवी करणारा ‘आर्यन खान’ की….

aryan khan featured IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्याकडे एखाद्याचं कानफाट्या नाव पडलं की सतत त्याची टर उडवली जाते, प्रत्येक चुकीमध्ये त्यालाच जबाबदार धरलं जातं. अशीच काहीशी अवस्था सध्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची झाली आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मुंबईतल्या एका रेव्ह पार्टीमध्ये आर्यन खानला NCB ने ताब्यात घेतलं, आणि त्यानंतर तब्बल महिनाभर तरी सोशल मीडियावर त्याचाच विषय चघळला जात होता.

 

 

बॉलिवूडच्या ड्रग्स कनेक्शनपासून ते मुख्य अधिकारी समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यातली तू तू मै मै आपण सगळ्यांनीच पाहिली. एकंदरच या ड्रग्स पार्टीच्या माध्यमातून बॉलिवूडचा विद्रूप चेहेरा पुन्हा उघड झालाच पण एकंदरच या सगळ्या प्रकरणाला राजकीय रंग देऊन त्यात आणखीन भर टाकण्यात आली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

अखेर बऱ्याच दिवसांनी आर्यन खानला जामीन मिळाला खरा, पण अजूनही सोशल मीडियावर या ना त्या कारणाने त्याची चर्चा सुरूच आहेत. काही लोकं सरसकट बॉलिवूड म्हणजे ड्रग्स माफियांचा अड्डा आहे असं म्हणतायत तर काही लोकं घरच्यांच्या संस्कारांवरून शाहरुख खान, गौरी खान यांना टार्गेट करतायत!

आर्यनला अटक होताच शाहरुखचा सीम्मी गरेवालसोबतच्या मुलाखतीमधला काही भाग व्हायरल झाला होता, या मुलाखतीत शाहरुख म्हणाला की माझ्या मुलाने मुली फिरवाव्या, ड्रग्स आणि दारूचे सेवन करावे.

 

 

अर्थात या सगळ्या गोष्टी त्या मुलाखतीत मजा मस्करीमध्ये बोलल्या गेल्या पण एवढ्या जुन्या मुलाखतीला लोकांनी कशाप्रकारे व्हायरल केलं आणि काशाप्रकारे घरच्यांच्या संस्कारांत खोट असते हे सिद्ध करायचा प्रयत्न केला ते आपण पाहिलं!

असाच काहीसा प्रकार पुन्हा आर्यन खानच्या बाबतीत घडला आहे. अमेरिकेच्या एयरपोर्टवर एक मुलगा ड्रग्सच्या नशेत उघड्यावर लघवी करतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय, आणि हा दूसरा तिसरा कुणी नसून आर्यन खान असल्याचा दावा करून बऱ्याच ठिकाणी अशाच मथळ्याच्या बातम्या आपल्याला बघायला मिळतायत.

खरंतर या व्हिडिओमागचं सत्य काहीसं वेगळंच आहे. तो मुलगा जरी ड्रग्सच्या नशेत असला तरी तो आर्यन खान नसून तिथला स्थानिक मुलगा आहे. केवळ त्या व्हिडिओमध्ये त्याने ड्रग्सचे सेवन केले असल्याने आणि काही अंशी तो आर्यन खानसारखा दिसत असल्याने लोकांनी पुन्हा आर्यन खानला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

 

सोशल मीडिया आणि ट्विटरवर काही लोकांनी ‘आर्यन खान वर्जन २’ असं शेयर करत त्याची टिंगल उडवायला सुरुवात केली तर काही लोकांनी तो आर्यन खानच असल्याचं गृहीत धरून त्यावर आर्टिकलसुद्धा छापली.

जेव्हा या व्हिडिओमागचं सत्य समोर आलं तेव्हा मात्र ही एकाप्रकारचं सोशल मीडिया ट्रोलिंग होतं आणि त्यात कुठेही आर्यन खानचा संबंध नसल्याचं समोर आलं तेव्हा मात्र खरंच सोशल मीडिया किती विघातक ठरू शकतं याचा अंदाज आपल्याला आला असेलच.

आर्यन खान ही प्रकरण आता निवळलं जरी असलं तरी लोकांच्या स्मरणशक्तीमध्ये ते किती पक्क बसलंय याचा अंदाज आपल्याला आला असेलच, खरंतर याआधीसुद्धा एका मुलीसोबतच्या MMS प्रकरणात अशाच पद्धतीने आर्यन खानचं नाव गोवण्यात आलं होतं.

 

 

तो व्हिडिओसुद्धा चांगलाच चर्चेचा विषय बनला होता, तेव्हासुद्धा त्या व्हिडिओमधला मुलगा आर्यन खान नव्हता हे कालांतराने समोर आलं होतं. खरंतर सोशल मीडियाची ताकद ही आपल्या कल्पनेपलिकडची आहे, फक्त त्याचा योग्य पद्धतीने वापर करणं गरजेचं आहे.

आज हे सगळे पब्लिक फिगर आहेत त्यामुळे त्यांच्या बाबतीत आपण सहज काहीही बोलून मोकळे होतो, पण काही बोलण्याआधी किंवा शेयर करण्याआधी एक जबाबदार नागरिक म्हणून त्याची पडताळणी करणं हेसुद्धा आपलं कर्तव्य आहे.

याचा अर्थ आर्यन खान निर्दोष ठरतो असंही नाही, त्याला जामीन मिळाला असला तरी त्याची निर्दोष सुटका झालेली नाही, पण तरी केवळ टार्गेट करायला सोप्पं आहे म्हणून एखाद्याविषयी काहीही शेयर करणंदेखील योग्य नाही.

आजकाल सर्रास हे मेसेजेस किंवा व्हिडिओज whatsapp च्या माध्यमातून प्रचंड व्हायरल होतात, पण फॉरवर्ड करणाऱ्या प्रत्येक मेसेज किंवा व्हिडिओची शहानिशा करणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे, किंबहुना एक जवाबदार नागरिक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

 

 

आज ज्या प्रकारे या सेलिब्रिटीजना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो, त्या ठिकाणी स्वतःला किंवा स्वतःच्या जवळच्या माणसांना ठेवून विचार करायला हवा.

कोणतीही प्रसिद्धव्यक्ती, राजकारणी, सेलिब्रिटी यांच्याविषयी सगळेच आपली मतं उघडपणे मांडत असतात, आणि त्याचं स्वातंत्र्य आपल्या देशात आहे. पण सध्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या स्वातंत्र्याचा गैरवापर होतानाच दिसतोय आणि तो लवकरात लवकर थांबायला हवा!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version