' कधीकाळी देशाचा हिरो खेळाडू, ‘या एका’ गोष्टीमुळे ठरला व्हिलन… – InMarathi

कधीकाळी देशाचा हिरो खेळाडू, ‘या एका’ गोष्टीमुळे ठरला व्हिलन…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

‘क्रिकेट म्हणजे अनिश्चिततेचा खेळ’ असं अनेकदा म्हटलं जातं. अनेक सामन्यांमधून सुद्धा अचानक, अकल्पित अशी एखादी गोष्ट घडते आणि सामन्याचा रंगच बदलून जातो.

या अनिश्चिततेमुळेच एखाद्या खेळाडूची कारकीर्द कधी घडते, तर कधी बिघडते. एखादा खेळाडू अशाच एखाद्या अप्रतिम गोष्टीमुळे लक्षात राहतो. कधी ही आठवण हवीहवीशी असते, तर कधी अगदी पुढच्या क्षणीच विसरून जावी अशी!

दिमित्री मास्कारन्हास सारख्या खेळाडूकडून एका षटकात पाच षटकार खाणारा युवराज नंतर स्वतःच एका षटकात ६ षटकार ठोकत अविस्मरणीय आणि जादुई कामगिरी करून मोकळा होतो. हीच क्रिकेटची खरी जादू आहे.

 

cricket match in olympics inmarathi

 

भारतीय क्रिकेटमध्ये असाच एक खेळाडू होऊन गेला. ज्याने संघासाठी अनेकदा उत्तम कामगिरी केली. मात्र, हा खेळाडू आणि त्याची कारकीर्द लक्षात राहते ती त्याने कारकिर्दीत टाकलेल्या ४ चेंडूंमुळे!

एका प्रसंगात व्हिलन, तर एकाच प्रसंगात हिरो बनण्याची किमया त्याने करून दाखवली. व्हिलन ठरलाय तो प्रसंग विसरण्याचा प्रयत्न त्याने अनेकदा केला असेल; मात्र ना तो ती घटना विसरू शकलाय, ना भारतीय चाहते… नेमका कोण होता तो आणि कसा ठरला हिरो आणि व्हिलन? वाचा…

ऐन तारुण्यात पदार्पण ते लॉर्ड्सच्या बोर्डवर नाव…

३ जानेवारी १९६६ रोजी पंजाबमधील लुधियाना इथे त्याचा जन्म झाला. तो क्रिकेट खेळाडू म्हणजे भारताचा पूर्वाश्रमीचा वेगवान गोलंदाज आणि सध्याचे निवडसमिती अध्यक्ष चेतन शर्मा!

 

chetan sharma inmartahi

 

वयाच्या १७ व्या वर्षीच या उजव्या हाताच्या मध्यमगती गोलंदाजाने वनडे सामन्यांमध्ये पदार्पण केलं. एकूण ६५ सामन्यांमध्ये ६७ गडी बाद करणाऱ्या चेतन शर्माने ४५६ धावा सुद्धा केल्या आहेत.

चेतन शर्मा यांचं कसोटी पदार्पण १९८४ साली पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध झालं. २३ कसोटीत ६१ गडी बाद करण्याची कामगिरी कसोटीत सुद्धा त्यांनी पार पाडली. याच कारकिर्दीत, क्रिकेटची पंढरी असणाऱ्या लॉर्ड्सच्या मानाच्या बोर्डावर नाव पोचवणारा कामगिरी त्यांनी पार पाडली.

१९८६ साली यजमान इंग्लंडच्या संघाविरुद्ध एका डावात ५ गडी बाद करत हा मान चेतन शर्मा यांनी मिळवला आहे. लॉर्ड्सच्या या ऑनर बोर्डवर नाव असणं हा मोठा सन्मान आहे, हे वेगळं सांगण्याची गरजच नाही. हा मान मिळवणारे चेतन शर्मा हे त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीमधील दोन घटनांमुळे कायमच लक्षात राहतात.

मियांदादने लावली वाट…

 

chetan sharma inmarathi

 

क्रिकेट चाहत्यांना जावेद मियांदाद हे नाव माहित नाही असं तर होऊच शकत नाही. क्रिकेटमधील काही अविस्मरणीय घटना आणि मियांदाद यांचंही एक आगळंच नातं आहे. यातीलच एक घटना चेतन शर्माशी निगडित आहे.

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचा पराभव म्हणजे भारतीय क्रिकेट चात्यांना फारच जिव्हारी लागणारी गोष्ट! त्यातच जर शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून पाकिस्तानने हा विजय मिळवला असेल, तर मग विचारायलाच नको…

१९८६ साली झालेल्या आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अशीच एक दूरदववी घटना घडली होती. पाकिस्तानला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी ४ धावांची गरज होती. मियांदाद क्रीझव होता, आणि त्या अखेरच्या चेंडूवर त्याने एक खणखणीत षटकार ठोकला. पाकिस्तानचा विजय निश्चित करणारा हा षटकार खाणारा खेळाडू होता चेतन शर्मा!

त्या हॅट्रिकमुळे…

 

chetan sharma inmarathi1

 

त्या एका बॉलमुळे चेतन शर्मा हा भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी व्हिलन बनून गेले. भारताचा हा गुणी गोलंदाज कायमचा व्हिलन बनून जाणार असं वाटत असताना त्यांनी मात्र एक कमाल कामगिरी करून दाखवली.

१९८७ चा विश्वचषक खेळणाऱ्या चेतन शर्मा यांनी या विश्वचषक स्पर्धेत चक्क हॅटट्रिक घेतली. विश्वचषक स्पर्धेत ही अशी कामगिरी करणारा तो पहिलावहिला खेळाडू होता.

एका भारतीयाने विश्वचषक स्पर्धेतील पहिली हॅट्ट्रिक घेऊन भारताचं नाव क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं. नागपूरमधील विरुद्धच्या सामन्यात त्याने ही ऐतिहासिक कामगिरी केली. या हॅट्ट्रिकमध्ये चेतन शर्मा यांनी चक्क तिन्ही फलंदाजांना त्रिफळाचित केलं होतं.

विश्वचषक स्पर्धेत इतिहास रचलाच, याशिवाय कुठल्याही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेण्याची किमया करणारा पहिला गोलंदाज म्हणून चेतन शर्मा यांचं नाव इतिहासात लिहिलं गेलं आहे.

चार चेंडूची कारकीर्द…

चेतन शर्मा यांनी कधी भारतीय संघासाठी हिरो बनत तर कधी सुमार कामगिरीमुळे व्हिलन बनत आपली छोटेखानी कारकीर्द सजवली. नुकतीच वयाची ५६ वर्ष पूर्ण केलेल्या या गोलंदाजाच्या कारकिर्दीची आठवण मात्र चाहत्यांसाठी त्या चार चेंडूंपुरती मर्यादित आहे, असं म्हटलं तरी ते वावगं ठरत नाही.

विश्वचषकात पहिलीवहिली हॅट्ट्रिक घेऊन भारताची मान सन्मानाने उंच करणारे चेतन शर्मा यांचं नाव काढलं की सगळ्यात आधी मियांदाद यांनी फटकावलेला षटकारच भारतीय चाहत्यांना सुद्धा आठवतो, हे मात्र त्यांचं दुर्दैव आहे असंच म्हणायला हवं…

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?