Site icon InMarathi

…आणि मुख्यमंत्र्यांचा मुलगा असूनही रितेशला ‘वर्षा’वर प्रवेश नाकारला होता

riteish inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

रितेश आणि जेनेलिया हे सोशल मीडियावरचं लाडकं कपल. त्यांचे क्युट व्हिडिओज आणि रिल्स हा चाहत्यांच्या आवडीचा विषय आहे. रितेश आणि जेनेलिया यांनी १० वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

रितेश, महाराष्ट्राचे माजी मुखमंत्री विलासराव देशमुखांचा मुलगा. आता तुम्हाला असं वाटेल, की मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणजे सगळीच चंगळ आहे, पण प्रत्यक्षात मात्र चित्र थोडंसं वेगळं असतं.

रस्त्याने जाताना तुम्ही कधी कोणत्या मंत्र्याला बघितलं असेल, तर तुम्हाला १०-१५ गाड्यांचा ताफा दिसेल. कारण, नेत्यांची सुरक्षितता महत्त्वाची असतेच. दौऱ्यावर कुठेही जाताना सुरक्षा रक्षक, गाड्या यांचा लवाजमा असतोच.

महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान म्हणजेच, मुंबईतील ‘वर्षा’ बंगला. वर्षा बंगल्यावरदेखील सुरक्षा रक्षकांचा ताफा असतो. सुरक्षा हा कळीचा मुद्दा असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी इथे केली जाते.

 

 

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना, रितेशलाही वर्षावर प्रवेश नाकारला होता. हा किस्सा रितेशनेचे एका मुलाखतीत सांगितला आहे.

‘बाबा नुकतेच मुख्यमंत्री झाले होते. वर्षाच्या बाहेर जे पोलीस असतात, त्यांची शिफ्ट -ड्युटी असते, ते फिक्स नसतात. मला त्यांनी कितीतरी वेळा बाहेर थांबवलं आहे. पोलीस मला विचारायचे, ‘कशाला जायचं आहे?’ त्यावर मी त्यांना सांगायचो, की ‘मी विलासरावांचा मुलगा आहे’, त्यावर ते म्हणायचे, ‘थांबा, चेक करू द्या’

 

 

‘पहिल्या सहा महिन्यात किमान १०-१२ वेळा तरी मला त्यांनी थांबवलं आहे. ते त्यांची ड्युटी इमानइतबारे करत होते या गोष्टीचं मला कौतुक आहे.’ असं रितेश म्हणाला.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version