Site icon InMarathi

कोरोनाच्या पाठोपाठ आलाय फ्लोरोना: ‘या’ देशात सापडली जगातील पहिली रुग्ण

florona featured IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मध्यंतरी कोरोनाच्या केसेस कमी झाल्या आणि आता आपण कोरोनामुक्त होऊ असा विचार करून आपण मोकळा श्वास घेऊ पाहत होतो तोच ओमिक्रॉन हा नवा व्हेरीएन्ट आला. याचा काही तितकासा धोका नाही आणि परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येईल असं आपल्याला वाटतं होतं आणि कोरोनारुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली.

सध्या कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. ओमिक्रॉन रुग्णांचेही नवेनवे आकडे रोज समोर येत आहेत. तशात आता एका नव्या आजाराची भर पडलीये.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

‘फ्लोरोना’ असं या नव्या आजाराचं नाव असून इस्राइलमध्ये ‘फ्लोरोना’ची पहिली रुग्ण सापडली आहे. तिने इस्राइल मधल्या ‘पेटाह टिकवा’ या शहरातल्या इस्पितळात नुकताच एका बाळाला जन्म दिला आहे.

 

 

अल्फा, बीटा, डेल्टा, ओमिक्रॉन या कोरोनाच्या व्हेरीएन्टसारखा हा नवा व्हेरीएन्ट नाही तर कोरोनामुळे आणि इन्फ्लुएंझा, फ्लूच्या व्हायरसमुळे उद्बवणाऱ्या ‘डबल रेस्पिरेटरी इन्फेक्शन’मुळे ‘फ्लोरोना’ होतो. ‘येडीऑट अहोरोनॉट’ या इस्राइलमधल्या वृत्तपत्राने यासंदर्भात माहिती दिली आहे.

इन्फ्लुएंझा आणि फ्लू या दोन्हीचाही आपल्या श्वसनसंस्थेवर साधारण सारखाच परिणाम होतो. ‘डब्यूएचओ’च्या म्हणण्यानुसार पुढे दिलेली लक्षणं कुणात कमी तर कुणात जास्त प्रमाणात आढळू शकतात.

पण जरी ही लक्षणं माणसात कमी प्रमाणात दिसत असतील तरी त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नाहीतर ती घातक ठरू शकतात. ‘फ्लोरोना’ची लक्षणं पुढीलप्रमाणे आहेत : घसा खवखवणे, खोकला, सर्दी, ताप, डोकेदुखी, थकवा, अन्नाची चव न लागणे, कशाचाही वास न येणे

कोरोना आणि इन्फ्लुएंझा किंवा फ्लूची ही एकत्रित लक्षणं आहेत. कोरोना आणि इन्फ्लुएंझा किंवा फ्लू एकाच वेळी माणसाला होतो तेव्हा त्याला ‘फ्लोरोना’ हा आजार होतो. फ्लू आणि कोरोना हे दोन्ही आजार खोकण्यातून, शिंकण्यातून आणि बोलण्यातून संक्रमित होतात.

 

निरोगी मनुष्य जेव्हा श्वास घेतो आणि जिथे हे व्हायरसेस आहेत त्या ठिकाणी हात लागला तर तेव्हा श्वासावाटे मनुष्य ही लक्षणं आपल्या आत घेतो. कोरोना किंवा फ्लू झालेल्या माणसाकडून एकदा का ही लक्षणं आपल्यात संक्रमित झाली की त्यानंतर २ ते १० दिवसांमध्ये आपल्यात ही लक्षणं आढळून येतात.

आजार झाल्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये ही लक्षणं जास्त संक्रमित होण्याचा धोका असतो. सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे फ्लू आणि इन्फ्लुएंझाच्या लक्षणांनी जोर धरला आहे.

जगभर सगळीकडे कोविडचे निर्बंध कडक पाळले गेल्यामुळे आणि पूर्णच लॉकडाऊन होतं त्यामुळे तेव्हा अशा केसेस आढळल्या नाहीत. पण आता हे नियम शिथिल झाल्यामुळे फ्लू किंवा इन्फ्लुएंझा आणि कोविड या दोन्हीचा संसर्ग होत असावा असं तज्ञांना वाटतं आहे.

इस्राईलमध्येही सध्या कोविडच्या रुग्णसंख्येत वाढ होते आहे. इस्राइल स्वास्थ्य मंत्रालयाचा ‘फ्लोरोना’ संदर्भात सध्या अभ्यास सुरू आहे. कोरोना आणि फ्लू किंवा इन्फ्लुएंझा हे दोन्ही व्हायरसेस जर एकत्र आढळले तर कोरोनापेक्षाही फ्लोरोनाची समस्या अधिक गंभीर असेल का याविषयी अद्याप काही कल्पना येऊ शकत नाही.

 

 

तज्ञांच्या मतानुसार कोरोनाच्या काही रुग्णांमध्ये ‘फ्लोरोना’चे रुग्णही असू शकतील पण तपासणी अभावी त्यांना ‘फ्लोरोना’ झालाय की नाही हे कळू शकलं नसेल. कोरोनापासून बचाव होण्यासाठी बूस्टर डोस देण्यात आलेला ‘इस्राइल’ हा आतापर्यंतचा पहिला आणि एकमेव देश आहे.

इस्राइलमध्ये सद्ध्या चौथ्या डोसचं परीक्षण सुरू आहे. इस्राइलची राजधानी ‘तेल अवीव’ च्या बाहेरच्या भागात असलेल्या ‘शिबा मेडिकल सेंटर’मध्ये ऑगस्टमध्ये ज्यांनी तिसरा डोस घेतलाय अशा १५० वैद्यकीय कर्मचाऱ्यांना चौथा डोस देऊन सध्या या चौथ्या डोसचं परीक्षण करायला सुरुवात झाली आहे.

ओमिक्रॉनशी लढा देण्यासाठी कमी प्रतिकारक्षमता आहे अशांना तिसरा डोस देऊन जर चार महिने उलटून गेले असतील तर त्यांना हा चौथा डोस देण्यात येणार आहे. इस्राइलच्या स्वास्थ्य मंत्रालयाचे डायरेक्टर- जनरल ‘नचमन अश’ यांनी हे नक्की केलं आहे.

 

 

वृद्धापकाळातल्या सुविधांअंतर्गत वृद्धांनाही हे वॅक्सीन दिलं जावं असं त्यांनी म्हटलंय. ‘शिबा मेडिकल सेंटर’च्या हार्ट ट्रान्सप्लान्ट विभागाचे माजी संचालक प्राध्यापक जैकब लावी म्हणतात, “हा चौथा डोस ओमिक्रॉन पासून खरोखरच सुटका करेल अशी आशा आहे आणि हे होण्याची फार आवश्यक्ता आहे.”

कोरोनाने आधीच आपलं आयुष्य सगळ्याच पातळ्यांवर खूप आव्हानात्मक करून ठेवलंय त्यात सध्या इस्राईलपुरताच मर्यादित असलेला हा ‘फ्लोरोना’ वेळीच आटोक्यात यावा आणि त्याने हळूहळू करत जगभर थैमान घालू नये एवढीच काय ती प्रार्थना आपण सामान्य माणसं करू शकतो. काळाने यापेक्षा अधिक परीक्षा पहायला नको!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version