Site icon InMarathi

अॅलेक्साने दिलेलं चॅलेंज पडलं असतं महागात; वेळीच सावध करा आपल्या मुलांना!!

children inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

माणसाने तंत्रज्ञान विकसित केलं ते आपलं रोजचं आयुष्य सुकर करण्यासाठी. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपलं आयुष्य आधीपेक्षा सोपं झालं हे निश्चित. बसल्या बसल्या नुसत्या एका क्लिकवर किंवा बटणं दाबून कामं व्हायला लागली. या सगळ्यात माणसाचा बराच वेळ वाचू लागला. माणूस आणखी आणखी नवनवे शोध लावत गेला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आपण केवळ उपकरणाला एखादी गोष्ट विचारायची की उपकरण ती गोष्ट आपल्यासाठी करतं इथवर आपण आयुष्य आपल्यासाठी सोपं करून ठेवलंय. हल्ली घराघरात ‘ऍलेक्सा’ हे उपकरण आढळतं. हे छोटंसं उपकरण आपण जे त्या उपकरणाला विचारू त्याची उत्तरं आपल्याला देतं. अगदी आपण गाणं गायला सांगितलं तर आपल्यासाठी गाणंही म्हणतं.

 

shelly palmer

लहान मुलांमध्ये ‘ऍलेक्सा’ची विशेष लोकप्रियता आहे. कारण, आपण एखाद्या उपकरणाला काहीतरी विचारतोय आणि त्यातून आवाज येऊन ऍलेक्सा आपल्याला उत्तर देतंय ही गोष्टच लहान मुलांना फार गमतीशीर वाटते. पण या आपल्यासाठी केवळ फायदेशीरच असलेल्या नव्हे तर आपलं मनोरंजनही करणाऱ्या उपकरणामुळे आपल्याला काही धोकाही उद्भवू शकतो हा विचारही एरव्ही आपल्या मनाला शिवला नसता. पण याच ‘ऍलेक्सा’ उपकरणामुळे एक दुर्दैवी गोष्ट घडणार होती. सुदैवाने तसं काही घडलं नाही आणि ती गोष्ट घडायची टळली.

 

 

आपण विचारलेल्या प्रश्नावर ‘ऍलेक्सा’ने दिलेल्या उत्तराचे फार गंभीर परिणाम एका १० वर्षांच्या लहान मुलीला भोगावे लागले असते. पण सुदैवाने तिची आई तिथे आली आणि एक भयंकर घटना घडायची टळली.

या १० वर्षांच्या मुलीने ‘ऍलेक्सा इको अटिस्टन्ट’ला “मला एक चॅलेंज द्या.” अशी विचारणा केली होती. या उपकरणाने त्या मुलीला त्यावर जे उत्तर दिलं ते अतिशय धक्कादायक आणि धोकादायक होतं. त्या उपकरणातून आवाज आला,”चॅलेंज खूप सोपं आहे.” ऍलेक्साने मग त्या मुलीला आपल्या फोनचा चार्जर एखाद्या चालू इलेक्ट्रिक बोर्डमध्ये अर्धवट घालायला सांगितला. मग हातात एक नाणं घेऊन चार्जरच्या प्लग पिनचा जो बाहेर राहिलेला भाग होता त्यावर त्या नाण्याने स्पर्श करायला सांगितला. नशीब त्यावेळी त्या लहान मुलीची आई क्रिस्टीन लिव्हडॉल तिथे होती.

 

 

ऍलेक्साने दिलेलं इतकं धोकादायक आव्हान ऐकून भयभीत होऊन त्या म्हणाल्या, “नाही ऍलेक्सा. नाही.” क्रिस्टीन यांनी घडलेला हा सगळा प्रकार त्यांच्या ट्विटमधून लोकांसमोर आणला. हा सगळा धोकादायक प्रकार अमेझॉनपर्यंत पोहोचल्यानंतर ऍमेझॉनने तातडीने त्याबद्दल लोकांची माफी मागितली आहे.

हा असा प्रकार भविष्यात पुन्हा घडू नये याची खबरदारी घेत अमेझॉनने ‘ऍलेक्सा व्हॉइस असिस्टंट’ अपडेट केला आहे. अमेझॉनने या संदर्भात एक ट्विटही शेअर केलं आहे. अमेझॉनच्या प्रवक्त्याने असं ट्विट केलंय, की “हे अत्यंत धोकादायक ठरू शकतं. अमेरिकेच्या क्रिस्टीन लिव्हडॉल यांनी आम्हाला याबाबत सांगितलं. त्यांच्या मुलीने ऍलेक्साला असंच एक चॅलेंज मागितलं होतं. त्याच्या उत्तरादाखल ऍलेक्साने हे चॅलेंज करण्याचा सल्ला तिला दिला.

 

 

” बीबीसीला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी म्हटलंय, “आम्ही जे जे काही करतो त्या सगळ्यात ग्राहकाचा विश्वास संपादन करणे ही आमच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. ‘ ऍलेक्सा’ हे उपकरण ग्राहकांना सुयोग्य, उपकरणाकडे केलेल्या मागणीशी सुसंगत उत्तर देईल आणि ग्राहकाला उपयुक्त माहिती मिळेल या दृष्टीने तयार केलेलं आहे.

आम्हाला ही समस्या कळल्यावर लगेचच आम्ही त्यात लक्ष घालून ही समस्या सोडवलेली आहे. हे उपकरण अपडेट केलं आहे.”आता जेव्हा ”ऍलेक्सा’ला एखादं चॅलेंज विचारलं जातं तेव्हा ‘ऍलेक्सा’ सोपी उत्तरं देतं किंवा सरळ, “मला हे कळलंय याची मला खात्री नाही.”, असं उत्तर देतं.
साधारण वर्षभरापूर्वी ‘ द पेनी चॅलेंज’ या नावाने टिकटॉकवर नाण्याने सॉकेटमध्ये अर्धवट अडकवलेल्या चार्जला स्पर्श करायचा हा प्रकार चांगलाच व्हायरल झाला होता. त्यातून काही विपरीत घटनादेखील घडल्या होत्या.

या अश्या प्रकारामुळे झटका लागण्याचा आणि शॉर्ट सर्किट होण्याचाही धोका संभवतो. तज्ञांच्या मते, अशा दुर्घटनांमुळे पूर्ण हात भाजण्याची, बोटं तुटण्याची शक्यताही निर्माण होऊ शकते. अमेरिकेच्या अग्निशामक अधिकाऱ्यांनीही या चॅलेंजचा कडकडून निषेध केला आहे.

 

Resnet

यापुढे ‘ऍलेक्सा’ आपण वापरू की नाही हा प्रश्न आहेच. पण कुठल्याही तांत्रिक उपकरणाच्या बाबतीत मात्र आता आपण नक्कीच सावधगिरी बाळगून असू. तंत्रज्ञानाला वगळून आपण आयुष्य पुढे चालू शकणार नाही हे नक्की असलं तरी याच तंत्रज्ञानावर आता डोळे झाकून भरवसा ठेवता येणार नाही. आपलं आयुष्य सोपं करणारं तंत्रज्ञान आपल्यासाठी जीवघेणं ठरू नये हा इतका बोध आपल्याला या सगळ्या प्रकारातून घेता येईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version