' खाण्यात किडे, अस्वच्छतेचा कळस : भारताच्या आयफोन प्लँटमध्ये कामगारांची गैरसोय! – InMarathi

खाण्यात किडे, अस्वच्छतेचा कळस : भारताच्या आयफोन प्लँटमध्ये कामगारांची गैरसोय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

ऍपलचे नाव ऐकले की सगळ्यांच्या मनात आयफोन विषयी विचार सुरु होतात, होणार पण का नाही, आयफोन हा असा एकमेव असा फोन आहे जो जगातील प्रत्येक व्यक्तीला घ्यावासा वाटतो.

तसे तर ऍपल कंपनीद्वारे अनेक उत्पादने बनवली जातात. परंतु सगळ्यात जास्त लोकप्रिय असलेली उत्पादने म्हणजे आयफोन (iPhone) आणि लॅपटॉप मॅकबूक (Macbook).

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

ऍपलचे प्रॉडक्ट जास्त लोकप्रिय असण्याची अनेक कारणे आहेत जसे की, या कंपनीच्या प्रोडक्टमध्ये असलेले वैशिष्ट्ये इतर कंपनीच्या उत्पादनांमध्ये आपल्याला सहसा मिळणार नाही. तसेच यांच्या उत्पादनांची गुणवत्ता ही चांगली असते.

 

apple IM

 

अशातच ऍपल कंपनी ही भारतामध्ये पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. भारतामध्ये फॉक्सकॉन ही कंपनी ऍपलसाठी आयफोन (iPhone) चे पार्ट्स असेंबल करते.

या फॉक्सकॉनच्या प्लांट मध्ये जवळपास १७ हजार लोक काम करत होते, परंतु आता या प्लांटमध्ये काही मोजक्या लोकांना सोडून काळं कुत्रही दिसत नाहीये.

हे प्लांट अचानक बंद होण्यामागचे कारण म्हणजे फॉक्सकॉनच्या प्लांटमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या जेवणामध्ये निघणाऱ्या अळ्या, कमी पगार आणि त्यामधून पण काही पैसे जेवण आणि राहण्यासाठीचे भाडे म्हणून कामगारांच्याच पगारातून कापले जात होते.

तसेच शौचालमयामध्ये आणि इतर ठिकाणी पाणीची कमतरता, एकाच रूममध्ये ३०-४० कामगारांना राहायला लावणे यांसारखी अनेक कारणे आहेत. परंतु डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये अनेक लोकांना विषबाधा सुरु झाली आणि याचमुळे १७ डिसेंबरपासून हजारो कर्मचाऱ्यांनी फॉक्सकॉन आणि ऍपल कंपनीच्या विरोधात जोरदार विरोध प्रदर्शन करायला सुरुवात केळी.

 

factory IM

 

यानंतर पोलीस आणि कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या मारहाणमुळे तणाव वाढल्याने ऍपलने आपले हे प्लांट तात्पुरते बंद केले आहे. फॉक्सकॉन ही ताईवान देशाची कंपनी असून २०१९ मध्ये या कंपनीने भारतामध्ये चेन्नईजवळ श्रीपेरंबदुर येथे आपले प्लांट सुरु केले होते.

‘मेक इन इंडिया’ प्रोग्रामच्या तहत या कंपनीने २५ हजार नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. एका रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते की, ही कंपनी येणाऱ्या ३ वर्षामध्ये १ अब्ज अमेरिकन डॉलर म्हणजे ७००० कोटी रूपयांची इन्वेस्टमेंट करणार होती.

फॉक्सकॉन भारतामध्ये येण्यामागे ही एक विशेष कारण आहे ते म्हणजे, अमेरिका आणि चीनमध्ये सुरु झालेल्या तणावामुळे ऍपलला भिती होती की, त्यांचे प्रॉडक्शन थांबेल. त्यामुळे ऍपलने फॉक्सकॉनचे हे प्लांट भारतामध्ये आणले.

फॉक्सकॉनने प्लांटमधील कामगारांना कामावर ठेवण्यासाठी आणि त्यांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था करण्यासाठी एका कंत्राटदाराला जबाबदारी दिली होती. या कंत्राटदारांनी कंपनीकडून पैसे तर घेतले परंतु त्यांनी कामगारांची राहण्याची आणि खाण्याची योग्य ती व्यवस्था केली नाही.

 

foxconn IM

 

एका मुलाखतीमध्ये येथील २१ वर्षीय महिला कर्मचारीने सांगितले की, “माझे वडील शेतकरी आहेत, इतर लोकांप्रमाणे मला पण शहरात नोकरी करायची होती. त्यात मला फॉक्सकॉन विषयी माहिती मिळाली आणि त्यांचा पगार ही चांगला होता, त्यामुळे मी ही कंपनी जॉइन केली. परंतु जेव्हा मी या कंपनीच्या हॉस्टेलमध्ये राहायला आले तेव्हा लक्षात आले की हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काही ना काही ऍलर्जी आहे. आधी तर आम्ही याकडे दुर्लक्ष केले परंतु आता ऍलर्जी आणि विषबाधा होण्याची समस्या अनेक लोकांमध्ये वारंवार आढळून येत आहे”.

या प्लांटमध्ये काम करणारे कर्मचारी १८ ते २५ वयोगटामधील असून त्यातही महिलांचे प्रमाण अधिक आहे. या लोकांना पगारही जेवढा मिळायला पाहिजे त्याच्या फक्त एक तृतीयांश एवढाच पगार दिला जातो. तसेच कंपनीमध्ये कुठलेही यूनियन बनू नये म्हणून महिलांना नोकरीसाठी प्राधान्य दिले जाते.

थिरुव्वर जिल्ह्याचे वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी जगदीशचंद्र बोस यांनी सांगितले की, “जेव्हा आम्ही या प्लांटला भेट दिली तेव्हा तेथील वस्तीगृहाच्या स्वयंपाकघरामध्ये उंदीर, घाण वास आणि सोबतच ड्रेनेजची व्यवस्था नसल्याचे आढळले. तसेच त्या वस्तीगृहाच्या स्वयंपाकघरामधून आम्ही काही अन्नाचे नमूने घेतले होते आणि हे सर्व नमूने सुरक्षेच्या निकषांवर खरे उतरले नाही.

 

foxconn 2 IM

 

स्थानिक प्रशासनाने माहिती दिली की, या प्लांट मध्ये २५० लोकांना विषबाधा झाली होती त्यातून १५९ लोकांना दवाखान्यामध्ये भरती करावे लागले. सोबतच वस्तीगृहामध्ये कोविड-प्रोटोकॉलचे एकही नियम पाळले जात नव्हते.

या सगळ्या प्रकरणावर ऍपल आणि फॉक्सकॉन ने त्यांची चूक स्विकारली आहे, तसेच त्यांनी सांगितले की, जोपर्यंत वस्तीगृह आणि त्याच्या स्वयंपाकघराची योग्य ती साफ-सफाई आणि सुरक्षेच्या निकषांच्या मानाने योग्य ते पावलं उचलली जात नाही, तोपर्यंत कंपनी तर सुरु होणार नाही परंतु कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार भेटत राहणार.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?