' ‘तुझ्यावर खर्च केलेले पैसे परत दे’, ब्रेकअपनंतर मीनल शहाच्या Ex बॉयफ्रेंडचे कडवे शब्द – InMarathi

‘तुझ्यावर खर्च केलेले पैसे परत दे’, ब्रेकअपनंतर मीनल शहाच्या Ex बॉयफ्रेंडचे कडवे शब्द

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

टेलिव्हिजन विश्वातील सगळ्यात लोकप्रिय रिऍलिटी शो म्हणजे बिग बॉस. हिंदीत हा शो लोकप्रिय होताच, पण मराठीतही चाहत्यांनी या शो ला तितकीच लोकप्रियता दर्शवली. बिग बॉस मराठीचं यंदाचं हे तिसरं पर्व होतं. हे पर्व चांगलंच गाजलं.

बिग बॉसचं घर म्हटलं, की भांडणं, मैत्री, संवाद- वाद या गोष्टी आल्याच. यंदाचं पर्व सुद्धा याच गोष्टींमुळे गाजलं. बिग बॉसच्या घरात येणाऱ्या प्रत्येक सदस्याचं एक वैशिष्ट्य असतं. प्रत्येकाची एक गोष्ट असते.

मीनल शहाचा प्रवासही असाच आहे. बिग बॉस मराठी ३ मधील सगळ्यात स्ट्रॉंग स्पर्धक अशी मीनलला ओळख मिळाली, पण या तिच्या खंबीर असण्यामागे तिने अनेक संकटांचा सामना केला आहे.

मीनल लहान असताना तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला, तरीही हिंमत न हारता तिच्या आईने खंबीर मनाने दोन्ही मुलांना वाढवलं. आईच्या माहेरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती, पण घरात होते नव्हते तेवढे सगळे दागिने विकून मीनलच्या आईने पोरांचा सांभाळ केला.

 

meenal shah inmarathi

 

मीनलला लहानपणापासूनच डान्सची आवड होती, दहावी झाल्यानंतर ती डान्सचे क्लासेस घ्यायची आणि त्यातून मिळणाऱ्या पैशांनी तिने स्वतःचं उच्च शिक्षण पूर्ण केलं. इतकंच नाही, तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने आपल्या आईला सगळे दागिने परत घेऊन दिले.

फक्त एवढंच नाही, तर वडिलांच्या जाण्यानंतर मीनलच्या आयुष्यात एक मुलगा देखील होता, जवळपास महिने ते रिलेशनशिपमध्ये होते, परंतु त्यांचं ब्रेकअप झाल्यानंतर मात्र मीनल पूर्णपणे हताश झाली होती, हा सगळा प्रसंग तिने रोडीज शो च्या ऑडिशनमध्ये सांगितला आहे.

‘वडील गेल्यानंतर माझ्या आयुष्यात एक मुलगा आला. कौटुंबिक भांडणं पाहिल्यानंतर मी प्रेमात पडेन की नाही हे मला माहित नव्हतं, पण मला तो आवडत होता. त्याने मला बरीच मदत पण केली. आम्ही वर्ष एकत्र होतो. त्याने ब्रेकअप केलं तेव्हा माझी परीक्षा चालू होती. रात्री मी घराखाली जाऊन खूप रडले. माझ्याबाबतीतच हे का घडलं याचा विचार मी करत होते. यापुढे कोणावरच विश्वास ठेवायचा नाही, असं मी मनाशी पक्क ठरवलं.’ असं ती म्हणाली.

 

meenal shah inmarathi1

 

‘मला सगळ्यात जास्त वाईट या गोष्टीचं वाटलं, की त्याने माझ्याकडे माझ्यावर खर्च केलेले पैसे मागितले. माझ्यासाठी तू कोणीच नाहीयेस, त्यामुळे मी आतापर्यंत तुझ्यावर जेवढे पैसे खर्च केले आहेत, तेवढे मला परत दे असं तो म्हणाला.’

‘या दिवशी मी ठरवलं, की कोणीही इतक्या सहजासहजी मला दुखवू शकत नाही. मला खूप स्ट्रॉंग राहायचं आहे.’ मीनलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?