Site icon InMarathi

बॉलिवूडमध्ये एन्ट्री तर काहींवर पोलिसात तक्रार : २०२१ मध्ये चर्चेत असलेले युट्यूबर्स

youtubers IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘युट्युबर’ होणे म्हणजे यशाची हमखास गॅरेंटी अशी कित्येक लोकांची धारणा आहे. भारतात २०२० पासून युट्युब हे एकमेव उत्पन्नाचं साधन असणाऱ्या लोकांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

यापैकी किती लोक खरंच यशस्वी होतात आणि कित्येक लोक हे काम नंतर कंटाळून सोडून देतात हा एक वेगळा विषय आहे. पण, एक मात्र नक्कीच म्हणता येईल की, सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्म प्रमाणे युट्युब चॅनल हे सुद्धा फक्त चांगला कंटेंट असेल तर यशस्वी होतं हे आता लोकांना कळलं आहे.

 

 

आजचा युट्युबर हा या क्षेत्राचा पूर्ण अभ्यास करून मगच या क्षेत्राकडे वळतो.

२०२१ हे वर्ष अशा काही ‘युट्युबर’ लोकांनी गाजवलं ज्यांनी आपलं चॅनल सतत चर्चेत रहावं, लोकांना नवीन कंटेंट देता यावा यासाठी प्रचंड मेहनत घेतली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

काही युट्युबर लोकांनी आपल्या लोकप्रियतेचा फायदा घेत बॉलीवूडमध्ये, वेबसिरीज मध्ये काम मिळवलं. तर काही युट्युबरने अतिउत्साही होऊन लोकांच्या भावना दुखावल्या, काहींनी कायद्याचं उल्लंघन केलं ज्यामुळे त्यांना जेलची हवा देखील खावी लागली.

एकंदरीत २०२१ हे वर्ष ‘युट्युबर’ मंडळींसाठी कसं होतं? कोण यशस्वी झालं आणि का? कोणी आपल्या कामात काय चूक केली? याचा युट्युबने जाहीर केलेल्या माहितीनुसार एक आढावा घेऊयात.

१. अजय नागर –

 

 

‘कॅरीमिनती’ या नावाने युट्युब चॅनल चालवणाऱ्या अजय नागरला ३.३ कोटी लोक फॉलो करतात. २०२१ मध्ये या युट्युबरने ‘डिस्ने + हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘मी, बॉस अँड लॉकडाऊन’ नावाची एक सिरीज प्रदर्शित केली होती. त्याशिवाय, अजय नागरने २०२१ मध्ये अजय देवगण सोबत ‘रनवे-३४’ या सिनेमात काम सुद्धा मिळवलं आहे.

२०२२ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होईल. पण, वादाने त्याचा पाठलाग सोडलेला नाहीये. बोलतांना शिव्या देतच बोलणाऱ्या या युट्युबरवर यावर्षी एका प्रेक्षकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे, ज्यावर पोलिस एफआयआर तयार करून चौकशी करत आहेत.

२. आशिष चंचलानी –

 

 

‘आशिष चंचलानी वाईन्स’ या नावाने २.७ कोटी फॉलोवर असलेल्या या युट्युबरने २०२१ मध्ये ‘द लोन स्कैम’ नावाने एक कॉमेडी शो तयार केला ज्याला ‘अमेझॉन मिनी टीव्ही’वर प्रदर्शित करण्यात आलं होतं.

आपल्या मित्रांसोबत विडिओ तयार करून नेहमीच चर्चेत असलेल्या हा युट्युबरसाठी २०२१ हे वर्ष अजून लोकप्रियता वाढवणारं ठरलं.

३. भुवन बाम –

 

 

‘बीबी के विन्स’ या नावाने विनोदी विडिओ तयार करून २.५ कोटी लोकांच्या मोबाईलमध्ये पोहोचलेल्या या युट्युबरने यावर्षी ‘धिंढोरा’ नावाची एक वेबसिरीज यावर्षी तयार केली जी बराच काळ चर्चेत होती. भुवन बाम ने स्वतः या सिरीजच्या थीम सॉंगमध्ये काम केलं.

भुवन सोबतच अनेक युट्युबरला सुद्धा त्या गाण्यात समाविष्ट करण्यात आलं होतं. त्या व्यतिरिक्त, भुवन स्वतःच्या कित्येक म्युझिक अल्बममध्ये सुद्धा वर्षभर दिसत राहिला.

४. अमित भडाना –

 

 

‘अमित भडाना’ या युट्युबरकडे २.३ कोटी फॉलोवर्स आहेत. २०२१ मध्ये त्यांनी ‘फादर साब’ नावाचा एक म्युझिक अल्बम तयार केला होता ज्याला ३ कोटींपेक्षा अधिक लोकांनी बघितलं होतं. हे गाणं कित्येक दिवस डिजिटल जगतात चर्चेत होतं.

५. हर्ष बेनिवाल –

 

आपल्या नावाने युट्युब चॅनल चालवणाऱ्या या युट्युबरला जवळपास १.४ कोटी लोक फॉलो करतात. ‘स्टुडन्ट ऑफ द इअर २’ या सिनेमात हर्ष प्रेक्षकांना दिसला होता.

‘कॅम्पस डायरीज’ या नावाने त्याची वेबसिरीज येत्या ७ जानेवारी पासून एमएक्स प्लेयरवर प्रदर्शित होणार आहे. या सिरीजमध्ये ‘दंगल’ सिनेमात काम केलेला ऋत्विक शौरी सुद्धा काम करणार आहे.

६. प्राजक्ता कोळी –

 

 

‘मोस्टली सेन’ या नावाने युट्युब चॅनल चालवणाऱ्या या मराठी मुलीला ६४ लाख लोक फॉलो करतात. विनोदी व्हिडिओसाठी प्रसिद्ध असलेल्या प्राजक्ता कोळीने २०२१ मध्ये ‘मिस मॅच’ ही सिरीज तयार केली ज्याला नेटफलिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आलं होतं.

२०२२ मध्ये ही युट्युबर प्रेक्षकांना ‘जुग जुग जियो’ या सिनेमात वरुण धवन आणि कियारा अडवाणी यांच्यासोबत सुद्धा बघायला मिळणार आहे.

७. सलोनी गौर –

 

 

‘सलोनी’ या नावाने सुरू केलेल्या युट्युब चॅनलला १७ लाख लोक नियमितपणे भेट देत असतात. ‘आपा’ आणि ‘कंगना’ या नावाने तयार होणाऱ्या सलोनी यांचे व्हिडिओ हे नेहमीच व्हायरल होत असतात.

२०२१ मध्ये ‘अनकॉमन सेन्स’ नावाचा एक शो त्यांनी तयार केला होता. ‘टीव्हीएफ’ आणि ‘फिल्टर कॉपी’सारख्या सिरीज मध्ये प्रेक्षकांना त्या दिसल्या होत्या. ‘कॅम्पस डायरीज’ मध्ये सुद्धा सलोनी गौर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

८. तन्मय भट –

 

 

३६ लाख फॉलोवर्स असलेल्या या युट्युबर २०२१ मध्ये नेटफलिक्सवरील ‘कॉमेडी प्रीमियर लीग’मधून प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या सिरीजमध्ये तन्मय यांच्यासोबत इतरही विनोदी कलाकारांना काम मिळालं होतं.

९. मुनव्वर फारुकी –

 

 

१६ लाख फॉलोवर असलेला हा युट्युबर एक स्टँडअप कॉमेडियन आहे. विनोदी कंटेंट अपलोड, सादर करणाऱ्या या युट्युबरचे कित्येक शो २०२१ मध्ये भारतात आयोजित करण्यात आले होते. त्यातील बहुतांश शो हे वादग्रस्त कंटेंटमुळे रद्द करण्यात आले होते.

१०. वीर दास –

 

 

विनोदी कंटेंट देणाऱ्या या युट्युबरकडे आज ७ लाख ८० हजार फॉलोवर्स आहेत. वॉशिंग्टन डिसीमध्ये कॅनेडी सेंटर येथे झालेल्या कार्यक्रमात त्याने ‘टू इंडियाज्’ ही कविता सादर केली आणि त्यानंतर तो प्रसिद्धीस आला होता. आगामी वर्षात वीर दास हा ‘फॉक्स स्टुडिओ’च्या ‘कंट्री ईस्टर्न’ मध्ये काम करणार आहे.

हिंदी भाषेवर प्रभुत्व आणि लोकांच्या मानसिकतेचा योग्य अभ्यासाच्या जोरावर या युट्युबर मंडळींनी मिळवलेलं यश हे कौतुकास्पद आहे. गरज आहे ती त्यांनी आपल्या भाषेवर नियंत्रण ठेवण्याची, ते जमलं तर ‘युट्युब’ ही काही वर्षात एक इंडस्ट्री म्हणून घोषित होऊ शकते हे नक्की.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version