Site icon InMarathi

सैनिक हो तुमच्यासाठी : सैनिकांचा त्रास कमी व्हावा यासाठी दोन तरुणांनी शोधलीये एक भन्नाट आयडिया

udchalo final inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतीय लष्करामध्ये सैनिकांना तसे तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, अशीच एक सगळ्यात मोठी समस्या म्हणजे, सशस्त्र सैन्यामधील सैनिकांना काहीवेळा सुट्टी अगदी वेळेवर मिळते. अगदी वेळेवर मिळणाऱ्या या सुट्टींमुळे अनेकदा ट्रेनमध्ये रिझर्व्हेशनच्या सीट मिळत नाही तर दुसरीकडे विमानाचे तिकीट आणि प्राइवेट गाड्यांचे भाडे पण खुप जास्त असतात.

त्यामुळे अशा या समस्येवर पुण्यातील दोन लोकांनी उडचलो (udChalo) या नावाचे स्टार्टअप सुरु केले आहे. ही स्टार्टअप कंपनी सशस्त्र दलामधील सैनिकांना अगदी कमी किमतीमध्ये विमानाचे तिकीट उपलब्ध करून देते.

 

 

ही स्टार्टअप कंपनी रवी कुमार आणि वरुण जैन यांनी सुरु केली असून,या दोघांनी आर्मी इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, पुणे या कॉलेज मधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. या कंपनीची सुरुवात २०१५ मध्ये झाली होती. पहिल्याच वर्षी या कंपनीने १२०० सैनिकांना स्वस्त दरामध्ये विमानाचे तिकीट उपलब्ध करून दिले होते. तर आज ही कंपनी दरवर्षी १६ लाख पेक्षा अधिक सैनिकांना स्वस्त दरामध्ये तिकीट उपलब्ध करून देत आहे.

 

 

या कंपनी द्वारे इंडियन आर्म्ड फ़ोर्स मधील सर्विसमैन, पैरामिलिट्री, वेटरन्स आणि डिपेंडेंट्स म्हणजे युद्धामध्ये जखमी झालेले सैनिक इत्यादींना स्वस्त तिकीटची सेवा पुरवली जाते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

ही स्टार्टअप कंपनी सुरु होण्यामागे देखील एक विशेष कारण आहे. रवी कुमार आणि वरुन जैन या दोघांचीही कौटुंबिक पार्श्वभूमी सशस्त्र सैन्यदलाचीच आहे. त्यामुळे त्यांना सैनिकांना होणाऱ्या या समस्येची जाणीव होती. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की प्रत्येक फ्लाइट मध्ये काही ना काही सीट्स शिल्लक असतात.

 

त्यामुळे जर रिकाम्या असणाऱ्या या सीट्स सवलतीच्या दरामध्ये लष्करातील जवानांना दिली तर त्यांच्यासाठी हे अधिक सोईचे ठरेल आणि फ्लाइट कंपनीला देखील नुकसान होणार नाही. याच कल्पनेतून या स्टार्टअप ची सुरुवात झाली होती, सध्या वरुण जैन हे प्रॉडक्ट टेक चे अध्यक्ष असून, रवी कुमार हे सीईओ आहेत.

 

NEW DELHI,INDIA MAY 20: Air Hostess inside the Aeroplane during the launch of Air Asia flight at IGI AirportT3, New Delhi.(Photo by Chandradeep Kumar/India Today Group/Getty Images)

 

या स्टार्टअप कंपनीने मुख्यतः नॉन ऑफिसर्स सैनिकांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. कारण मोठे अधिकारी तर महागडे तिकीट घेऊ शकतात, परंतु रँक ने कमी असलेल्या सैनिकांना महागडे तिकीट घेणे शक्य होत नाही. त्यामुळे या स्टार्टअपच्या सहाय्याने यांनी ट्रेन आणि विमानाच्या तिकीट मध्ये अगदी कमी अंतर राहील या दरामध्ये तिकीट उपलब्ध करून दिल्या आहेत. या कंपनीला एयरलाइन्स कडून बोनस मिळतो, तसेच प्रत्येक तिकीट वर ते त्यांचे शुल्क पण घेतात. यामधूनच त्यांच्या कंपनीचा नफा होतो.

या स्टार्टअपचे ब्रीदवाक्य सर्विसेज फॉर सर्विस (सेवेसाठी सेवा) हे आहे. तसेच ही कंपनी फाइनेंशियल सर्विसेस, ग्रुप हाऊसिंग, कंज्यूमर प्रोडक्ट्स, सर्विसेस आणि यूटिलिटी बिल पेमेंट इत्यादी प्रकारच्या सेवा देते. या कंपनीची सेवा तब्बल २.८ दशलक्ष लोक घेतात. या कंपनीची ५० टक्के कार्यालय उरी आणि इंफाळ अशा ठिकाणी आहे. या कंपनीच्या आऊटरीच सेंटर वर शहिद सैनिकांची पत्नी आणि सेवानिवृत्त सैनिक काम करतात.

 

 

या स्टार्टअप कंपनीने इंडिगो (Indigo), स्पाइसजेट (Spicejet), गो एयर (Go air), एयर एशिया (Air Asia) आणि विस्तारा (Vistara) या कंपन्यांसोबत पार्टनरशिप केली आहे. तसेच कुठे बाहेरगावी राहण्याची व्यवस्था करण्यासाठी यांनी ओयो (OYO) आणि फॅबहोटल्स ( Chahiye) सोबत देखील पार्टनरशिप केली आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version