Site icon InMarathi

राजीव गांधींनी भाजपची खिल्ली उडवली, म्हणून वाजपेयी संन्यास घ्यायला निघाले होते!!

bajpayee and gandhi IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे एक युगपुरुष होते. एकदम वेगळे व्यक्तिमत्व. आपल्या शब्दांनी मंत्रमुग्ध करणारा अवलिया. प्रासंगिक भाषणाने विरोधकांना थक्क करण्याच्या कलेत माहिर. मात्र, भाषेच्या मर्यादा त्यांनी कधीच ओलांडल्या नाहीत.

खचाखच भरलेल्या संसदेत भाजपची खिल्ली उडवली गेली त्या दिवशीही नाही. भाजपचा दारुण पराभव झाला होता. आपल्या शब्दांच्या बाणांनी विरोधकांना भोसकणारा ‘अर्जुन’ आज एकदम शांत होता. तोही युद्धात पराभूत होऊन ‘गांडिव’ (अर्जुनाच्या धनुष्यबाणचं नाव ‘) ठेवण्याचा विचार करत होता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

ही गोष्ट आहे १९८४ सालची. त्याच वर्षी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती. लोकांना आपला आवडता पंतप्रधान गमावल्याचे दुःख झाले. तेंव्हा काँग्रेसचे वादळ होते.

 

 

त्या वर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकांनी देशातील सर्वात जुन्या पक्षाला बिनदिक्कतपणे मतदान केले. टक्कर झाली नाही. काँग्रेस प्रचंड बहुमताने परतली. लोकसभेत त्यांचे ४२६ सदस्य होते आणि भाजपचे फक्त दोन.

१९८४ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या लाटेत भाजपाचे दोन खासदार विजयी झाले होते. त्यातील एक होते डॉ. एके पटेल आणि दुसरे होते चंदुपतला जंग रेड्डी. पटेल हे गुजरातमधील मेहसाणामधून विजयी झाले होते. तर आंध्र प्रदेशातील हनमकोंडा येथून चंदुतला रेड्डी यांनी विजयी पताका रोवली होती.

अटल यांचाही निवडणुकीत पराभव झाला –

वाजपेयी ग्वाल्हेरच्या गोरखी शाळेत शिकले होते. त्यानंतर त्यांनी व्हिक्टोरिया कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केले. आता ते कॉलेज महाराणी लक्ष्मीबाई कॉलेज म्हणून ओळखले जाते.

वाजपेयी यांचा जन्मही याच शहरात २५ डिसेंबर १९२४ रोजी झाला. १९७१ मध्ये त्यांनी जनसंघाचे उमेदवार म्हणून ग्वाल्हेर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला.

 

 

मात्र, १९८४ मध्ये काँग्रेसच्या झंझावातामध्ये माधवराव सिंधिया यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. ग्वाल्हेरमधून सिंधिया राजघराण्यातून आलेल्या माधवरावांचा पराभव करणे जवळजवळ अशक्य होते.

राजीव यांच्या सांगण्यावरून सिंधिया उभे राहिले –

निवडणुकीत वाजपेयींसमोर उभे राहिलेल्या सिंधियाची कहाणीही खूप रंजक आहे. माधवराव सिंधिया ग्वाल्हेरमधून निवडणूक लढवत असल्याची बातमी अचानक आली. यामुळे वाजपेयी आश्चर्यचकित झाले. सिंधिया यांनी अगदी शेवटच्या दिवशी ग्वाल्हेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सांगण्यावरून सिंधिया यांनी हे केल्याचे बोलले जाते. याआधी तिथून वाजपेयींचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता.

 

ग्वाल्हेरच्या महाराणी राजमाता विजय राजे या सिंधिया वाजपेयींना पाठिंबा देत होत्या. मात्र, काँग्रेसने राजमाता यांचे पुत्र माधवराव यांना ग्वाल्हेरमधून उमेदवारी दिली. हे पाहता वाजपेयींनी शेजारच्या भिंडमधून उमेदवारी अर्ज सादर करण्याचा प्रयत्न केला.

त्यासाठी ते कारने तिथे गेलेही होते. मात्र, तोपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ निघून गेली होती. माधवराव यांनी वाजपेयींचा १.६५ लाख मतांनी पराभव केला.

राजीव गांधींनी एक विनोद केला –

काँग्रेसच्या ४२६ सदस्यांसमोर भाजपचे २ सदस्य होते. त्या काळात कुटुंब नियोजनाचा नारा होता – हम दो हमारे दो. ही घोषणा राजीव गांधींनी भाजपची खिल्ली उडवण्यासाठी वापरली होती. मग संसदेत हास्यकल्लोळ झाला. वाजपेयींना लाज वाटली. तेव्हा ते पक्षाचे अध्यक्ष होते.

या पराभवामुळे ते अस्वस्थ झाले. यात त्यांच्याच पराभवाने जखमेवर जळजळीत मीठ टाकण्याचे काम केले. त्यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, त्यांचा राजीनामा फेटाळण्यात आला.

 

 

१९८४ च्या पराभवानंतर वाजपेयी ग्वाल्हेरमधून कधीही लढले नाहीत. १९९१ मध्ये त्यांनी मध्य प्रदेशातील विदिशा आणि उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथून लोकसभा निवडणूक लढवली. त्यांनी दोन्ही जागा जिंकल्या.

तथापि, त्यांनी विदिशाचे खासदार म्हणून जागा सोडली आणि लखनऊच्या जागेवर स्विच केले. त्यानंतर सलग पाचवेळा त्यांनी या जागेवरून विजय मिळवला. त्यांच्या संघर्षाची झलक वाजपेयींच्या कवितेत दिसून येते जेव्हा ते लिहितात –

‘मी हार मानणार नाही, नवा निर्णय घेईन. मी काळाच्या कवटीचे लिखाण पुसून टाकेन.’

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version