' ना तणाव, ना बॉसची चिंता, आणि भरपूर पैसा! जाणून घ्या जगातील ह्या अमेझिंग जॉब्स बद्दल… – InMarathi

ना तणाव, ना बॉसची चिंता, आणि भरपूर पैसा! जाणून घ्या जगातील ह्या अमेझिंग जॉब्स बद्दल…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आज आम्ही तुम्हाला काही अश्या नोकऱ्यांबाबत सांगणार आहोत, ज्यांच्याबद्दल कदाचित तुम्ही कधीही ऐकले नसेल. या नोकऱ्यांमध्ये ना आहे कोणता तणाव ना आहे बॉसची चिंता…!

भाडेतत्वावर प्रियकर आणि प्रेयसी

 

amazing-jobs-marathipizza01

 

मानवी स्पर्शाला सर्वात मोठी हिलिंग शक्ती मानली जाते. जर तुमच्या जवळ असे कोणी नाही आहे, जो तुम्हाला प्रेमाचा स्पर्श देऊ शकेल तर तुम्ही भाड्याने गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड घेऊ शकता आणि त्यांच्यासोबत वेळ व्यतीत करू शकता. ८ हजार रुपये प्रत्येक तासाला देऊन ही सेवा कितीतरी कंपन्या देतात.

एक परफेक्ट जॉब म्हणून देखील गेल्या काही काळापासून तरुणवर्ग या नोकरीकडे पाहू लागला आहे.

 

शॅम्पेन फेशियल स्पेशलिस्ट

 

amazing-jobs-marathipizza02

 

ही अतिशय मजेशीर नोकरी आहे. लोक यामध्ये आपले करियर सुद्धा घडवतात. यात पार्टीमध्ये जाऊन मुलींना शॅम्पेन फेशियल द्यायचे असते.

नॉर्थ अमेरिकेच्या क्लबमध्ये क्रिरील बिचुतकस्की नावाचा फोटोग्राफर आहे, ज्याने हे शॅम्पेन फेशियल सुरु केले होते. ह्यासाठी त्याला चांगली मोठी रक्कम दिली जाते.

 

प्रोफेशनल ब्राइडमेड्स

 

amaazing-jobs-marathipizza03

 

जर तुम्ही फोटोमध्ये चांगली पोज देण्यासाठी परिपूर्ण आहात, तर तुम्ही ही नोकरी करू शकता. यासाठी २० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत मानधन दिले जाते.

==

हे ही वाचा : डिग्री नाही, फिकर नॉट! नोकरीचे असेही पर्याय…५ वा आणि ९ वा पर्याय माहिती हवाच!

==

प्रोफेशनल लाइन स्टँडर

 

amazing-jobs-marathipizza04

 

जर तुम्हाला रांगेमध्ये उभे राहण्याचा कंटाळा येत नसेल, तर ही नोकरी तुमच्यासाठीच आहे. यामध्ये फक्त तुम्हाला रांगेमध्ये उभे राहून वाट बघायची आहे.

त्यासाठी तुम्हाला आठवड्याला ६७ हजार रुपये दिले जातील. अॅपल उपकरणांच्या लाँच वेळी रांगेमध्ये उभे राहणे किंवा कोणत्यातरी चित्रपटाचे तिकीट मिळवण्यासठी रांग लावणे अशा नोकऱ्या यामध्ये समाविष्ट आहेत.

 

कंडोम टेस्टर

 

amazing-jobs-marathipizza05

 

ऑस्ट्रेलियामध्ये डयूरेक्स कंपनी कंडोम टेस्टरसाठी २०० पेक्षा जास्त जागांची भरती काढते. यामध्ये एका कंडोमच्या टेस्ट साठी ४०२८ रुपये दिले जातात. यामध्ये तुम्हाला कंडोमचा वापर करून दाखवायचा आहे.

==

हे ही  वाचा : काहीतरी ‘हटके’ करियर करायचंय, पण कळत नाहीये? हे १० बेस्ट करियर ऑप्शन्स बघाच

==

आइसक्रीम टेस्टर

 

amazing-jobs-marathipizza06

 

जर तुम्ही आइसक्रीमसाठी वेडे असाल, तर ही नोकरी फक्त तुमच्यासाठीच आहे. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या आइसक्रीमची चव घेऊन त्यांना नावे द्यावी लागतात .कित्येक कंपन्या अश्या नोकऱ्या ऑफर करतात.

 

प्रोफेशनल स्लीपर

 

amazing-jobs-marathipizza07

 

जर तुम्हाला झोपण्यासाठीही पैसे दिले गेले तर ह्यापेक्षा चांगली नोकरी कोणती असू शकेल बरं? बरोबर ना!

नासा प्रोफेशनल स्लीपर्सना हायर करते. या लोकांवर नासा वैज्ञानिक प्रयोग करते. याच्यासाठी यांना मोठा पगार दिला जातो. वर्षाला ४० लाख रुपये फी फक्त त्यांना झोपण्यासाठी दिली जाते.

 

जलपरी

 

amazing-jobs-marathipizza08

 

जलपरी बनायला कोणाला नाही आवडणार आणि त्यासाठी तुम्हाला पैसे देण्यात आले तर तुम्ही रोजच जलपरी बनून राहण्यास तयार व्हाल.

काही देशात यासाठी ट्रेनिंग पण दिली जाते. ज्यामध्ये तुम्ही फिन बरोबर पोहायला शिकता. मरमेड पार्टी स्विमिंग मध्ये प्रोफेशनल जलपरींना हायर केले जाते.

 

नेल पॉलिशचे नाव ठरवणे

 

amazing-jobs-marathipizza09

 

या नोकरीत तुम्हाला नेल पॉलिशला नावे द्यायची असतात. यामध्ये नवीन-नवीन नेल पॉलिशच्या रंगाच्या हिशोबाने नावे देऊन तुम्ही या क्षेत्रात यशस्वी होऊ शकता.

काय आहेत की नाही हे जॉब्स अमेझिंग…!!!

अर्थात, हे सगळे गमतीशीर जॉब्स भारताबाहेर उपलब्ध आहेत. अजूनही भारतीय संस्कृतीमध्ये या अशाप्रकारच्या नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध नाहीत.

सध्यातरी, लॉकडाऊन नंतरच्या काळात, या पोस्ट कोरोना जगात बरेच बदल घडून आले आहेत. देशातील अनेकजणांच्या जीवनमानावर आणि नोकऱ्यांवर याचे अनिष्ट परिणाम झाले आहेत.

या मजेशीर जॉब्सबद्दल जाणून घेणं, हा तर एक मनोरंजनाचा भाग झाला. मात्र या मनोरंजनाच्या बरोबरीनेच, ही कठीण परिस्थिती लवकर दूर व्हावी आणि सारं काही सुरळीत होऊन सगळ्यांना उत्तम आणि मनाजोगत्या नोकरीची संधी निर्माण व्हावी, अशी अशा करूयात!

==

हे ही  वाचा : कॉर्पोरेट सेक्टरमधील जॉबचे आकर्षण असले तरी ही “वस्तुस्थिती” लक्षात असू द्या…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?