' “पुष्पा, आय हेट बीअर” : राजस्थान पोलीस असं का बरं म्हणतायत? – InMarathi

“पुष्पा, आय हेट बीअर” : राजस्थान पोलीस असं का बरं म्हणतायत?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या सर्वत्र ‘न्यू इयर सेलिब्रेशन’चा माहोल आहे. सरकारच्या सूचनांचं लोक कितपत पालन करतील याची शाश्वती नाही. त्यामुळे दारू पिऊन पार्टीत धिंगाणा घालणे, दारू पिऊन गाडी चालवणे हे प्रकार यंदाही हमखास घडू शकतात.

दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे होणाऱ्या अपघातांच्या घटना काही आपल्यासाठी नव्या नाहीत आणि आता पार्ट्यांच्या निमित्ताने किंवा नववर्षाच्या स्वागताच्या बाकी प्लॅन्सच्या निमित्ताने दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे होणाऱ्या या अपघातांचं प्रमाण वाढू शकतं.

 

31 party IM

 

सेलिब्रेशनच्या नादात लोकांना कशाचंही भान राहत नाही आणि हे असे जीवघेणे प्रकार होऊन बसतात. याच धर्तीवर वाहनचालकांना दारू पिऊन गाडी चालवण्यापासून परावृत्त करण्यासाठी राजस्थान पोलिसांनी ट्विटरवर अतिशय कल्पक मोहीम राबवली आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

चित्रपटातल्या संवादांचा आपल्यावर फार प्रभाव असतो. हीच बाब लक्षात घेऊन त्यांनी चित्रपटातले गाजलेले संवाद, प्रसिद्ध शायरीतल्या ओळी वापरून दारू पिऊन गाडी चालवण्याविरोधातलया या मोहिमेचे ट्विट्स ट्विटरवर केलेले आहेत. हा ट्रेंड ट्विटरवर सध्या चांगलाच धुमाकूळ घालतोय.

राजेश खन्ना यांचा “पुष्पा, आय हेट टिअर्स” हा संवाद कुणाला माहीत नाही! याच लक्षवेधी संवादाचा वापर राजस्थान पोलिसांनी त्यांच्या एका ट्विट मध्ये फार चतुराईने केला आहे. राजस्थान पोलिसांच्या या ‘धिस न्यू इअर – डोन्ट ड्रिंक अँड ड्राइव्ह’ मोहिमेच्या एका ट्विटमध्ये त्यांनी या वरच्या संवादात एक सूक्ष्म पण परिणामकारक बदल करून “पुष्पा, आय हेट ‘बीअर'” असं ट्विट केलं आहे.

 

pushpa i hate beet IM

लोकांनी या ट्विटकडे अधिक आकर्षित व्हावं म्हणून त्यांनी या ट्विटसोबत राजेश खन्ना यांचा एक फोटोही शेअर केला आहे.

अभिनेते राज कुमार यांच्या ‘वक्त’ या चित्रपटातला “जानी ये बच्चों के खेलने की चीज नहीं! हाथ कट जाए तो खून निकल आता है” या संवादाचाही राजस्थान पोलिसांनी त्याच्या या मोहीमेसाठीच्या एका ट्विटमध्ये वापर केला होता.

 

rahat indori IM

 

राजस्थान पोलीस केवळ बॉलिवूडच्या या लोकांच्या मनात घर केलेल्या संवादांवरच थांबले नाहीत. त्यांनी ही मोहीम यशस्वीरित्या फत्ते व्हावी म्हणून अगदी शायरीचाही आधार घेतला आहे.

राहत इंदौरी यांची सुप्रसिद्ध शायरी “बुलाती है मगर जाने का नहीं” त्यांनी याकरता वापरली आहे. यातही अगदी थोडासा बदल करून “बुलाती है मगर जाने का नहीं, पीकर गाडी चलाने का नहीं” असं ट्विट राजस्थान पोलिसांनी केलं.

आणखी एका ट्विटमधून राजस्थान पोलिसांनी “कॅबचं ऍडव्हान्स बुकिंग करा आणि पिऊन गाडी चालवू नका.”, असं लोकांना सांगितलं आहे.

 

rajasthan police IM

 

चित्रपटांच्या संवादांना लोकांनी डोक्यावर उचलून घेतलेलं असतं. लोकांचा असा हळवा कोपरा हेरून त्यांच्याचसाठी धोक्याच्या ठरणाऱ्या गोष्टी करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करणं यासाठी शक्कल लढवावी लागते . अशी ट्विट पाहून तरी लोकांनी दारू पिऊन गाडी चालवू नये अशी आशा बाळगायला हवी.

दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे घडणाऱ्या अपघातांचं प्रमाण यंदाच्या वर्षी तरी कमी होईल की नाही हे येणारा काळच ठरवेल पण राजस्थान पोलिसांची ही मोहीम स्तुत्य आहे यात मात्र दुमत नाही.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?