Site icon InMarathi

चिन्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारने नेमणूक केलेले विक्रम मिस्रि आहेत तरी कोण?

misri 1 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

चीन हा देश कधीच शांतपणे जगणार नाही आणि इतरांनाही जगू देणार नाही हे जगजाहीर आहे. जगातील इतर देशांना गरजेचं आहे ते चीन पासून सतर्क राहणं, आपल्या संरक्षक भिंती अजून मजबूत करणं हे नेहमीच आवश्यक असणार आहे.

भारताने हे साध्य करण्यासाठी नुकतंच चीनची खडा न् खडा माहिती असलेल्या विक्रम मिस्रि यांना भारतीय सुरक्षक समिती (एनएसए) मध्ये उपाध्यक्ष पदावरून नियुक्त करून एक मोठं पाऊल उचललं आहे.

विक्रम मिस्रि हे एनएसए चीफ अजित डोवाल यांना रिपोर्टिंग करणार आहेत. ही नियुक्ती का महत्वाची मानली जात आहे ? विक्रम मिस्रि हे कोण आहेत ? जाणून घेऊयात.

 

starsunfolded.com

चीन मध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केलेले विक्रम मिस्रि हे १९८९ च्या बॅचचे इंडियन फॉरेन सर्व्हिसेस (आयएफएस) चे ते ऑफिसर आहेत. विक्रम मिस्रि यांच्या आधी पंकज सरन हे भारतीय सुरक्षा समितीच्या उपाध्यक्षपदी कार्यभार सांभाळत होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

३१ डिसेंबर २०२१ रोजी पंकज सरन यांचा कार्यकाळ संपत असल्याने विक्रम मिस्रि यांची या पदावर नियुक्ती करण्यात येत आहे. पंकज सरन हे भारतीय सुरक्षा समिती सोबत काम करण्यापूर्वी रशिया मध्ये भारताचे राजदूत म्हणून काम बघायचे.

विक्रम मिस्रि यांनी म्यानमार आणि स्पेनसाठी भारतीय राजदूत, माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल, मनमोहन सिंग आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक सल्लागार सारखी जबाबदारीची पदं यथार्थ भूषवली आहेत.

 

 

२०१९ मध्ये बीजिंग मध्ये झालेल्या बैठकीत विक्रम मिस्रि यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्याशिवाय, जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर चीन सोबत बोलणी करण्यासाठी विक्रम मिस्रि यांनाच पाचारण करण्यात आलं होतं. विक्रम मिस्रि यांनीच सप्टेंबर २०२० मध्ये चौथ्या ‘हाय लेव्हल मीटिंग’ मध्ये चीनला आपल्या चुकांची जाणीव करून दिली होती आणि परिस्थिती निवळली होती.

विक्रम मिस्रि हे मूळचे श्रीनगरचे आहेत. त्यांचा जन्म १९६४ मध्ये झाला होता. आपलं शालेय शिक्षण त्यांनी श्रीनगर, ग्वाल्हेर येथून पूर्ण केलं. ‘इतिहास’ या विषयावर पदवीचं शिक्षण त्यांनी दिल्लीच्या प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘हिंदू कॉलेज’ मधून घेतलं होतं.

विक्रम मिस्रि यांनी एमबीएचं पव्युत्तर शिक्षण हे जमशेदपूर येथून घेऊन त्यांनी जाहिरात क्षेत्रात सुद्धा त्यांनी काही वर्ष काम केलं आहे. फॉरेन सर्व्हिसेस मध्ये जाण्याची इच्छा असल्याने विक्रम मिस्रि यांनी फ्रेंच भाषेचं शिक्षण सुद्धा घेतलं होतं.

 

१९८९ पासून विक्रम मिस्रि यांनी आपल्या सिव्हिल सर्विस करिअरला सुरुवात केली. विक्रम मिस्रि यांनी आपल्या कार्यकाळात १९९१ ते १९९३ मध्ये ब्रुसेल्स येथे आणि १९९३ ते १९९६ मध्ये ट्युनिस येथे भारतीय एम्बेसीमध्ये सल्लागार म्हणून काम केलं होतं.

२०२० च्या कोरोना काळात भारत आणि चीन या दोन देशांमधील तणाव वाढू नये यासाठी विक्रम मिस्रि हे नेहमीच आपलं योगदान द्यायचे. विक्रम मिस्रि यांनी इस्लामाबाद, वॉशिंग्टन, जर्मनी, श्रीलंका सारख्या देशांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आपल्या कामातली चुणूक ही जगाला दाखवून दिली आहे.

 

econreview.edu

 

काश्मीरचे प्रश्न आणि चीनच्या वागणुकीची पूर्ण कल्पना असलेल्या विक्रम मिस्रि यांची नियुक्ती ही त्यांच्या विदेश मंत्रालयातील योगदानासाठी सुद्धा महत्वपूर्ण मानली जात आहे. अजित डोवाल यांना विक्रम मिस्रि यांच्या नेमणुकीने संरक्षणाचे योग्य निर्णय घेण्यास मदत होईल अशी आशा करून या निर्णयाचं स्वागत करूयात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version