Site icon InMarathi

सिंहस्थ कुंभमेळ्यामधील १३ आखाडे आणि त्यांच्यातील महत्त्वाचा फरक ही रंजक बाब तुम्हाला नक्कीच ठाऊन नसेल

kumbh mela InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सिंहस्थ महाकुंभमेळ्याबद्दल आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल. या मेळ्याचे विशेष महत्व म्हणजे येथे येणारे वेगवेगळ्या आखाड्यांचे साधू-संत होय. मुख्य असे मान्यता प्राप्त १३ आखाडे या सोहळ्याला हजेरी लावतात.

या आखाड्यांबद्दल तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाच्या मनात नेहमीच कुतूहल राहिले आहे. या १३ आखाड्यांमध्ये ७ शैव, ३ वैष्णव आणि ३ उदासीन आखाड्यांचा समावेश होतो.

वरकरणी पाहता हे सर्व आखाडे एकसारखेच दिसतात परंतु त्यांची परंपरा, पूजा यांच्या पद्धती मध्ये काही न काही वेगळेपण आहे. आज आम्ही तुम्हाला याच आखाड्यांविषयी माहिती सांगणार आहोत.

१) जुना आखाडा

indiamike.com

मान्यतेनुसार हा सर्वात जुना आखाडा आहे, यासाठी याला जुना आखाडा असे नाव दिले गेले आहे. सध्या सर्वात जास्त महामंडलेश्वर (२७५) याच आखाड्यातील आहेत. यात विदेशी आणि महिला महामंडलेश्वर ही त्यात आहेत.

 

२) अटल आखाडा

freepressjournal.in

या आखाड्यात फक्त ब्राम्हण, क्षत्रिय आणि वैश्य यांनाच दीक्षा दिली जाते. याव्यतिरिक्त इतर वर्गांना या आखाड्यात जाण्यास मनाई आहे.

 

३) आवाहन आखाडा

yooniqimages.com

इतर आखाड्यांमध्ये महिला स्वाधींना दीक्षा दिली जाते. परंतु या आवाहन मध्ये महिला साधूंची कोणतीच परंपरा नाही.

 

४) निरंजनी आखाडा

rademakers.org

या आखाड्यात जवळपास ५० महामंडलेश्वर आहेत. सर्वात जास्त उच्च शिक्षित महामंडलेश्वर याच आखाड्यात आहेत.

 

५) अग्नी आखाडा

patrika.com

या आखाड्यात फक्त ब्राम्हणांना दीक्षा दिली जाते. पण या आखाड्यातील प्रत्येक दीक्षा घेणारा ब्राम्हण हा ब्रम्हचारी असलाच पाहिजे.

 

६) महानिर्वाणी आखाडा

oneindia.com

महालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या पुजेची जबाबदारी या आखाड्यावर आहे. हि परंपरा खूप वर्षांपासून चालत आली आहे.

 

७) आनंद आखाडा

kalamkranti.com

या शैव आखाड्यात आज पर्यंत एकही महामंडलेश्वर नेमले गेलेले नाही. या आखाड्यात आचार्याचे पद प्रमुख असते.

 

८) दिगंबर अणि आखाडा

samacharline.com

या आखाड्यात सर्वात जास्त खालसा (४३१) आहेत. वैष्णव संप्रदायच्या आखाड्यात या आखाड्याला राजा संबोधले जाते.

 

९) निर्मोही अणि आखाडा

ujjainsimhast.com

वैष्णव संप्रदायचे तिन्ही आखाड्यांपेक्षा सर्वात जास्त आखाडे यात आहेत. त्यांची संख्या ९ आहे.

 

१०) निर्वाणी अणि आखाडा

amitaba.net

या आखाड्यातील कितीतरी संत ख्याती असलेले पैलवान होते. कुस्ती या आखाड्याच्या जीवनातील एक भाग आहे.

 

११) मोठा उदासीन आखाडा

freepressjournal.in

या आखाड्याचे ध्येय सेवा करणे आहे. या आखाड्याचे ४ महंत आहेत जे कधीही निवृत्त होत नाहीत.

 

१२) नवीन उदासीन आखाडा

seattlepi.com

या आखाड्यात त्यांनाच प्रवेश आहे, ज्यांना दाढी आणि मिशी आलेली नसते म्हणजे ८ ते १२ वर्षापर्यंतची मुले!

 

१३) निर्मल आखाडा

oah.in

या आखाड्यात धूम्रपानाला पूर्णपणे बंदी आहे.या आखाड्यातील सर्व केंद्रांच्या गेटवर याची सूचना दिली आहे.

अशी आहेत प्रत्येक आखाड्याची वैशिष्ट्ये आणि त्यांचे महत्त्व!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version