आपल्याच पत्नीचं न्यूड पेंटिंग काढणारे फिल्म इंडस्ट्रीचे पहिले व्हिलन म्हणजे दादा मुनी!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सुपरस्टार अशोक कुमार यांच्याबद्दल आजही रसिकांच्या मनात वेगळं स्थान आहे. खर तर भारतीय सिनेसृष्टीतील सुरवातीच्या बोलपटांवर रंगमंचाची छाप असल्याने ते फारच नाटकी वाटतं परंतु अशोक कुमारांनी आपल्या नैसर्गिक अभिनयाने रसिकांवर भुरळ घातली.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
अशोक कुमार यांचं खरं नाव कुमुदलाल गांगुली, लोक त्यांना ‘ दादामुनी’ अशी सुद्धा हाक मारत. कुमुदलाल गांगुली हे सिनेसृष्टीत मध्ये खरतर टेक्निशयन म्हणून काम करण्यासाठी आले होते. त्या काळात चेहऱ्याला रंग रंगोटी करून मंचावर काम करणे हे कमी दर्जाचे समजले जायचे.
बॉम्बे टॉकीजमध्ये त्यांनी सुमारे पाच वर्ष तंत्रज्ञ म्हणून काम करण्यास सुरवात केली. पुरेसा पगार मिळत असल्याने दादामुनी आपल्या कामात समाधानी होते. परंतु नंतर बॉम्बे टॉकीजमध्ये एका सिनेमाच्या शूटिंग दरम्यान झालेल्या नाट्यमय घडामोडीमुळे त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला अनिच्छेने सुरुवात केली.
त्यावेळी त्यांनी आपली खरी ओळख लपविण्यासाठी ‘अशोक कुमार ‘ हे नाव धारण केलं. देविका राणी सोबतचा त्यांचा अछुत कन्या, त्याच वर्षीचा चित्रपट हिंदी चित्रपटांच्या सुरुवातीच्या ब्लॉकबस्टर्सपैकी एक होता.
त्या काळातील अनेक चित्रपटांप्रमाणे, अछुत कन्या हा एक सुधारणावादी चित्रपट होता ज्यामध्ये भारतीय समाजातील तथाकथित अस्पृश्यांपैकी एका मुलीच्या प्रेमात पडणारा ब्राह्मण मुलगा अशोक कुमार यांनी साकारला होता.
अछूत कन्याच्या यशाने अशोक कुमार आणि देविका राणी यांना त्या काळातील सर्वात लोकप्रिय ऑन-स्क्रीन जोडपे म्हणून सिद्ध केले. पुढे त्यांनी देविका राणी, लीना चिटणीस, मधुबाला अशा अनेक अभिनेत्रीं बरोबर काम केले.
ग्यान मुखर्जी दिग्दर्शित १९४३ मधील किस्मत हा चित्रपट, ज्यामध्ये अशोक कुमार भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला अँटी-हिरो होते, त्यांनी सर्व विद्यमान बॉक्स ऑफिस रेकॉर्ड तोडले, तो सिनेमा बॉक्स ऑफिसवर १ कोटी कमावणारा पहिला हिंदी चित्रपट ठरला.
किस्मतच्या यशामुळे अशोक कुमार हे भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार बनले. त्यावेळी त्यांची लोकप्रियता इतकी होती की, मंटोच्या शब्दात, “अशोकची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच गेली. तो क्वचितच बाहेर पडायचा, पण जिथे तो दिसला तिथे त्याच्यावर झडप टाकली जायची. वाहतूक ठप्प व्हायची आणि अनेकदा पोलिसांचा ताफा असायचा. त्याच्या चाहत्यांना पांगवण्यासाठी लाठ्यांचा वापर करावा लागे.”
–
- चित्रपटसृष्टीतल्या दादामुनींनी ‘त्या’ घटनेनंतर कधीच स्वतःचा वाढदिवस साजरा केला नाही!
- प्रेमात वय म्हणजे फक्त एक आकडा असतो हे ह्या ८ जोडप्यांकडे बघून समजतं!
–
अशोक कुमार यांनी १९५८ च्या क्लासिक हावडा ब्रिजचा अपवाद वगळता अधिक परिपक्व भूमिकांकडे वळले, ज्यामध्ये त्यांनी मधुबालासोबत काम केले. देव आनंद, दिलीप कुमार आणि राज कपूर यांसारख्या तरुण हिरोंची मंदियाळी दाखल झालेली असतानाही अशोक कुमार हे अफसाना, नौ बहार, परिणीता, बंदिश यांसारख्या हिट चित्रपटांसह त्या काळातील स्टार्सपैकी एक राहिले.
दादामुनी यांचं अभिनय आणि संगीतातील योगदान सगळ्यांना माहीतच आहे. परंतु दादामुनी हे एक उत्कृष्ट पेंटर होते हे फारच कमी जणांना माहीत आहे. तेलापासून, चारकोल म्हणजेच कोळसा आणि ऑइलपेंटपर्यंतच्या सर्व माध्यमांत चित्र काढण्याची कला त्यांना अवगत होती.
दिवंगत दादा मुनींच्या खासगी आयुष्यातील एक रहस्य म्हणजेच त्यांना न्यूड चित्रे काढण्याची आवड होती. त्यासाठी त्यांनी आपल्या बाथरूमची जागा राखीव ठेवली होती. जेव्हा नग्न आकृत्या रंगवल्या जायच्या तेंव्हा त्यांच्या अंगावर कोणतेही कपडे नसायचे.
“त्यांनी सकाळची वेळ स्वतःसाठी ठेवली होती, ज्यामध्ये ते चित्र काढायचे आणि वाचायचे आणि कोणालाही त्रास देण्याची परवानगी नव्हती,” असं दादामोनी यांची मुलगी भारती जाफरी सांगते, जी आता अशोक कुमार फाउंडेशन चालवते.
जाफरी हिने अशोक कुमारांच्या चित्रांची अनेक प्रदर्शने भरवली आहेत. असा एक किस्सा सांगितला जातो की दादामुनींनी आपल्या पत्नीचं देखिल न्यूड चित्र रेखाटलं होतं.
अशा कलेमध्ये स्वतःला झोकून देणाऱ्या झक्कास अभिनेत्याने १० डिसेंबर २००१ रोजी जगाचा निरोप घेतला, दादा मुनींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.