Site icon InMarathi

डिलिव्हरी बॉय नव्हे तर एका पोस्टमुळे झोमॅटोचे यावर्षी झाले मोठे नुकसान

zomato final inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मागच्या वर्षी लोकांना कधी एकदा २०२० संपतंय असं झालं होत कारण कोरोनाने जे काही थैमान घातले होते त्यातून लोकांची अशी अपेक्षा होती की निदान नवे वर्ष तरी आनंदात जावे, मात्र कोरोनाची दुसरी लाट आली आणि पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत झाले.

२०२२ अगदी तोंडावर आले असताना या नव्या वर्षाकडून अनेकांना अपेक्षा आहेत मात्र ओमिक्रोनचे सावट आहेच, सरकारने देखील नव्या वर्षाचे स्वागत साध्या पद्धतीने करा असे बजावले आहे, ३१ निमित्ताने होणाऱ्या पार्ट्यांवर देखील निर्बंध लादले आहेत.

 

 

वर्ष सरत आलं अनेकांचे नव्या वर्षासाठी काही प्लॅन्स ठरले असतील, या वर्षी केलेल्या चुका पुढच्या वर्षी टाळल्या गेल्या पाहिजेत. असच प्रत्येकाला वाटत असेल, फूड डिलीव्हरी करणाऱ्या झोमॅटोसारख्या कंपनीने देखील कानाला खडा लावला आहे, यंदा केलेली चूक पुन्हा एकदा घडणार नाही, नेमकी कोणती चूक त्यांनी केली आहे चला तर मग जाणून घेऊयात…

 

 

झोमॅटोची वर्षातील सर्वात मोठी चूक :

यावर्षी झोमॅटो चर्चेत आलं ते म्हणजे एका मुलीने केलेल्या व्हिडिओवरून, ज्यात ती असं म्हणत होती की झोमॅटोच्या डिलीव्हरी बॉयने तिला मारहाण केली, यावरून बरीच उलटसुलट चर्चा झाली. कंपनीने तातडीने त्या माणसाची हकालपट्टी केली. मात्र या केसने खरं तर एक नंतर वेगळेच वळण घेतले..

 

 

कंपनीच्या डिलिव्हरी बॉयमुळे नव्हे तर त्यांच्याच एका पोस्टमुळे कंपनीला चांगलंच तोटा सहन करावा लागला होता. झालं असं की आज जसे अनेक कंपन्या आपल्या ग्राहकांशी  सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात राहतात त्याचपद्धतीने झोमॅटोने  वर्षाच्या सुरवातीला आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट टाकली ती अशी होती की तुमच्याकडे शुक्रवारी रात्रीचा कोणता प्लॅन नसल्यास या पोस्टवर कॉमेंट्स करा, ज्या कॉमेंट्सवर कुशीत जास्त लाईक येतील त्या कॉमेंट करणाऱ्या व्यक्तीला मिळणार फुकटात जेवण…

 

या पोस्टवर अक्षरशः कॉमेंट्सचा पाऊस पडला, यात बाजी मारली ती मि. बाहेती यांनी. झोमॅटोने त्यांनी केलेल्या महाकाय ऑर्डर्सचे स्क्रीनशॉट सुद्धा टाकले आहेत. झोमॅटोने जेव्हा बाहेती यांच्याशी संपर्क केला तेव्हा त्यांनी अशी ऑर्डर दिली, २ प्लेट पनीर टिक्का, दोन प्लेट दही कबाब, व्हेज मंचुरियन, ५ पनीर बटर मसाला, दोन व्हेज सुप्रीम पिझ्झा, चार तंदुरी पराठे, तीन बटर पाव, पाच तंदुरी रोटी १ जिरा राईस आणि १२ पराठे

अशी भलीमोठी ऑर्डर करून देखील महाशय थांबले नाहीत तर मस्करीत झोमॅटोला रिप्लाय दिला की कृपया ब्लॉक करू नका आणि लगेचच आणखीन दोन गोष्टींची ऑर्डर दिली.

 

 

विजेत्याला ही भलीमोठी ऑर्डर तर द्यावी लागली मात्र कंपनीच्या फायनान्स टीमने भविष्यात अशा प्रकराची कोणतीही स्पर्धा न घेण्याचे आदेश दिले आहेत.

 

 

आज भारतासारख्या देशात लोकांची मानसिकता ही खर्च करण्यापेक्षा फुकटात जितकं मिळेल याकडे जास्त असते. जशी लोकांची मानसिकता तशी कंपन्यांची ग्राहकांना आकर्षित करण्याची स्ट्रॅटजी, मात्र हीच स्ट्रॅटजी कधी कधी आपल्याच महागात पडू शकते हे झोमॅटोला चांगेलच लक्षात आले असेल, भविष्यात ते आता नक्कीच याचा विचार करतील.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version