' चक्क मुंग्यांनी शोधला देशातील सगळ्यात मोठा सोन्याचा साठा, अशी झाली कमाल – InMarathi

चक्क मुंग्यांनी शोधला देशातील सगळ्यात मोठा सोन्याचा साठा, अशी झाली कमाल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

एक असतो हत्ती आणि एक असते मुंगी… लहानपणी ऐकलेला हा विनोद आठवतोय? लहानग्या मुंगीची आणि भल्यामोठ्या हत्तीच्या अनेक गोष्टी, विनोद आपण ऐकले आहेत. छोटीशी मुंगीसुद्धा आपल्या सामर्थ्याने हत्तीला सळो की पळो करून सोडते.

आपलचं उदाहरण बघा, एखादी मुंगी जर चावली, तर आपल्याला भरपूर वेळ त्रास होत राहतो. मुंग्यांकडून शिस्त, चिकाटी शिकण्यासारखी आहे हे आपण वाचलंच असेल. याच मुंग्यांनी भारतात कमाल घडवलीये..

मुंग्यांनी आपल्या देशातला सर्वांत मोठा सुवर्णसाठा शोधून काढला आहे. बिहारमधल्या जमुई  जिल्ह्यातल्या ललमटिया – करमटिया या भागांमध्ये देशातला सर्वांत मोठा सोन्याचा साठा असल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे.

 

gold 1 inmarathi

 

काही दिवसांपूर्वीचं केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी संसदेत याबाबत माहिती दिली. देशाच्या एकूण सुवर्ण साठ्यापैकी ४४ टक्के साठा या भागात सापडला आहे आणि तो कोणत्या उत्खनन विभागाने नव्हे, तर मुंग्यांनी शोधून काढलाय.

आता तुम्ही म्हणाल, की मुंग्यांनी कसा बरं शोध लावला, पण ही गोष्ट खरी आहे. न्यूज 18च्या एका रिपोर्टमध्ये त्यांनी याबाबत खुलासा केला आहे. त्यांनी सोन्याबाबत जेव्हा स्थानिक लोकांशी चर्चा केली, तेव्हा अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या.

त्यांच्या म्हणण्यानुसार, ४० वर्षांपूर्वी काही मेंढपाळ उन्हापासून रक्षण करण्यासाठी एका वादाच्या झाडाखाली बसत, तेव्हा तिथे काही मुंग्या वारूळ बनवत होत्या. या वारुळात दिसणारी माती वेगळ्या प्रकारची होती, कारण ती उन्हात चमकत होती. या गोष्टीची भयंकर चर्चा झाली.

 

ants inmarathi

 

गावात एखादी घटना घडली, की संपूर्ण गावाला ती खबर काही वेळात मिळते, त्याचप्रमाणे सोन्याच्या मातीची गोष्ट गावभर पसरली आणि मग पुरातत्त्व विभागाला बोलवण्यात आलं आणि मग इथे सोन्याचा साठा आहे ही गोष्ट समजली. या ठिकाणी 223 दशलक्ष टन सोनं असल्याचा अंदाज आहे.

आपण मुंगीला इवलासा जीव म्हणून भाव पण देत नाही, समोर दिसल्या तर हाताने- पायाने लगेच चिरडून टाकतो. पण आज याच मुंग्यांनी देशाला सगळ्यात मोठा सुवर्णसाठा मिळवून दिला आहे.

जसं कोणतंही काम लहान मोठं नसतं, तसा कोणताही जीव लहान मोठा नसतो. प्रत्येक जीव निसर्गात आपलं अमूल्य योगदान देत असतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?