“ही” आहेत गर्भश्रीमंत माणसांची जगातील सर्वात मोठी आणि महागडी घरं!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
घर म्हणजे काय हो? तर २-४ जणांच्या कुटुंबाला राहायला पुरेशी असेल एवढी जागा!
आता कुठे घर जास्त स्पेशियस असावं म्हणून लोक 1-2 बीएचकेची घरं खरेदी करायला लागलीत. नाही तर पूर्वी एका खोलीत ४-५ जण आरामात रहायची.
हे झालं तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाचं, पण जर तुमची गणती जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये होत असेल तर 1 काय 2 काय आणि 3 बीएचके काय, तुम्हाला भलामोठा बंगला देखील कमी पडेल. अश्या श्रीमंत लोकांचे असतात भलेमोठे, कित्येक एकरामध्ये पसरलेले राजवाडे. जेथे कितीतरी बेडरूम, स्विमिंग पूल, प्रत्येक फाईव्हस्टार सुविधा आणि अजून काय काय असतं.
आज आम्ही तुम्हाला जगातील अश्याच काही श्रीमंत व्यक्तींची अवाढव्य घरं दाखवणार आहोत, जी घरं जगातील सर्वात मोठी घरं म्हणून ओळखली जातात.
इस्ताना नुरुल इमान पॅलेस – २ कोटी १५ लाख स्क्वेअर फूट
ब्रुनेईचे सुलतान हसनल बोल्किया यांचे हे घर जगातील सर्वात मोठे घर आहे. या घरामध्ये तब्बल 1,788 खोल्या आणि 257 बाथरूम आहेत. त्याचबरोबर या महालामध्ये पाच स्विमिंग पूल आहेत. तसेच 110 कारसाठी एक गॅरेजही आहे.
200 घोड्यांसाठी तबेला तसेच बँक्वेट हॉल आणि घरातच मशीदही आहे. याठिकाणी दीड हजार लोक एकावेळी नमाजपठन करू शकतात. 1984 मध्ये लिओनार्दो व्ही लोकसीन यांनी या पॅलेसचे डिझाइन तयार केले होते.
या घराची किंमत एक अब्ज चाळीस कोटी डॉलरच्या सुमारास आहे.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
अँटिला – ४,००,००० स्क्वेअर फूट
जर तुम्ही मुंबईत असाल आणि तुम्हाला 27 मजले असलेली एक भव्य बिल्डींग दिसली असेले तर ते जगातील दुसरे सर्वात मोठे घर आहे हे समजून घ्या.
जवळपास दोन अब्ज डॉलर खर्च करून बांधलेले अँटिला हे उद्योजक मुकेश आणि नीता अंबानी यांचे घर आहे. जगातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या पाचात असलेल्या अंबानींची निव्वळ मालमत्ता 43 अब्ज रुपयांच्या जवळपास आहे.
चार वर्षांच्या बांधकामानंतर हे 550 फूट उंचीचे घर तयार करण्यात आले आहे. या घरात सहा मजली पार्किंग आहे. खास कार्यक्रमांसाठी बॉलरूमही तयार करण्यात आले आहे.
घरात बार एरिया, स्विमिंग पूल, योगा स्टुडिओ, आइस रूम, चारमजली ओपन गार्डन, थिएटर, वाईन रूम आण कुटुंबातील प्रत्येकासाठी स्वतंत्र बेडरूम आहे.
फेअरफिल्ड पाँड – १.१०,००० स्क्वेअर फूट
अमेरिकेतील अनेक श्रीमंतांना हॅम्पटन हे त्यांचे दुसरे घर असल्याचे वाटते. पण ते फार महागडे आणि तरही हवे तसे मिळत नाही. त्यामुळे अमेरिकेतील गुंतवणूकदार असलेले इरा रेनर्ट यांनी फेअरफिल्ज पाँड याठिकाणी घर तयार केले.
यापैकी 66 हजार स्क्वेअर फुटात निवासी व्यवस्था आहे. त्यात 29 बेडरूम्स आणि 39 बाथरूम्स आहेत. तसेच घरात बास्केटबॉल कोर्ट, बोलिंग अॅली, दोन टेनिस कोर्ट, दोन स्क्वॅश कोर्ट आणि हॉट टबही आहे. या घराचे मूल्य 17 कोटी डॉलर एवढे आहे. हॅम्पटनमधील हे सर्वात महागडे घर आहे.
व्हर्सेलीज – ९०,००० स्क्वेअर फूट
–
- ऐकून आश्चर्य वाटेल पण मुंबईमध्ये आहे जगातील एक महागडा रस्ता
- या सोप्या आणि स्मार्ट उपायांसह घर सजविले तर ते एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलहूनही सुंदर दिसेल…
–
हे घर अमेरिकेतील सर्वात मोठ्या घरांपैकी एक घर आहेत. फ्लोरीडामधील या घराचे काम अनेकदा थांबवण्यात आले. जागतिक मंदीमुळे वेस्टगेट रिसॉर्टचे सीईओ डेव्हीड सिगल आणि त्यांची पत्नी जॅकलीन यांना त्यांच्या या स्वप्नातील महालाचे काम थांबवावे लागले होते.
त्यानंतर काही वर्षांनी पुन्हा जम बसल्यानंतर त्यांनी साडे सात कोटी डॉलर जमवून पुन्हा या घराचे काम सुरू केले आहे. या घरात सुमारे 8,000 स्क्वेअर फुटाचे दोन थिएटर आहेत. मुख्य निवासात 30 बाथरूम, 15 बेडरूम, 11 स्वयंपाकघरे, सहा पूल आणि ३० कारचे गॅरेज आहे.
ला रिव्हेरी – ८४,६२६ स्क्वेअर फूट
फ्लोरिडामधील पाम बीचवर अमेरिकेतील अनेक धनाढ्य लोकांची घरे आहेत. पण येथील सर्वात मोठे घर असण्याचा मान सिडेल मिलर यांच्याकडे आहे. मॅट्रीक्स इसेंशिअलचे सहसंस्थापक असलेल्या मिलर यांनी 1995 मध्ये पाच कोटी डॉलरमध्ये हे घर खरेदी केले होते.
मिलर हे घर राहण्यासाठी आणि काही सामाजिक उपक्रमांसाठीही वापरतात.
द पेन्समोर मेन्शन – ७२,००० स्क्वेअर फूट
मिसोरीजवळ असणारे हे घर प्रसिद्ध उद्योजक आणि इंजिनिअर स्टीव्ह हफ यांचे आहे. पूर्णपणे तयार झाल्यानंतर हे घर कोण्याताही प्रकारच्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटामध्ये सुरक्षित राहण्यास सक्षम असेल. हफ यांनी एका कंपनीत भागीदारी केली आहे. ही कंपनी सुरक्षित घरे बनवते.
एक्सॅनाडू 2.0 – ६६,००० स्क्वेअर फूट
मायक्रोसॉफ्टचे संथापक आणि अमेरिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले बिल गेट्स यांनी अत्याधुिनक तंत्रज्ञानाने युक्त अशा या घरासाठी आठ कोटी पंधरा लाख डॉलरचा खर्च केला आहे.
विशेष म्हणजे घरात जेवढा अधिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे तेवढेच हे घर पर्यावरण पूरकही आहे. घराच्या आजुनाजूला असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा अत्यंत योग्य असा वापर याठिकाणी करण्यात आला आहे. झाडांचा वापर करून गर्मी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
हे घर बांधण्यासाठी सात वर्षे आणि सुमारे साडेसहा कोटी डॉलर खर्च झाले. येथे ऑटोमॅटीक गाणी सुरू होतात. तसेच एका बटनावर भिंतीवरील डिझाईन बदलले जाते.
पाहुण्यांसाठी 2,100 स्क्वेअर फुटातील लायब्ररी आहे. घरात आलेल्या पाहुण्यांना आतील तापमानाशी आणि प्रकाशयोजनेशी जुळवून घेण्यासाठी एक पिन दिला जातो. तेही पुरेसे नसल्यास पाहुण्यांना याठिकाणी तयार केलेल्या नदीमध्ये सनबाथचा आनंद घेता येतो. या घराची किंमत एक सव्वा अब्ज डॉलरच्या सुमारास आहे.
मेसन डी अॅमिटी – ६०,००० स्क्वेअर फूट
डोनाल्ड ट्रम्प यांनी 2004 मध्ये 4 कोटी 10 लाख डॉलरमध्ये हे घर खरेदी केले. ट्रम्प यांनी केवळ सहा वर्षे हे घर स्वतःजवळ ठेवले. 2005 मध्ये त्यांनी अडीच कोटी डॉलर खर्च करत या घराचे रिनोव्हेशन केले. त्यावेळी अनेक ठिकाणी सोने-हिरे वापरण्यात आले.
2010 मध्ये रशियाचे अब्जाधीश दिमित्री रिबोलोलेव्ह यांना साडे नऊ कोटी डॉलरमध्ये त्यांनी हे घर विकले.
द मनोर – ५६,५०० स्क्वेअर फूट
जगातील आणखी एक मोठे घर असलेल्या मनोरचे मालक आहेत कँडी आणि आरोन स्पेलिंग. कॅलिफोर्नियातील हाँबी हिल्सवर हे घर तयार करण्यात आले आहे. सात एकरातील या घरात सात बेडरूम आहेत. त्यापैकी एकामध्ये ब्रिटनचे राजकुमार चार्ल्स गे लॉस एंजल्सच्या दौऱ्यादरम्यान थांबले होते.
गॉन विथ द वाईं़ड चित्रपटातील पायऱ्यांप्रमाणे याठिकाणी भव्य महालातील पायऱ्यांप्रमाणे तयार केलेल्या पायऱ्या प्रसिद्ध आहेत. आरोन यांच्या मृत्यूनंतर कँडी स्पेलिंग यांनी पेट्रा एक्लेस्टोन यांना साडे आठ कोटी डॉलरमध्ये हे घर विकले. पेट्रा फॉर्म्युला वनचे माजी सीईओ बर्निक एक्लेस्टोन यांची मुलगी आहे.
हाला रँच – ५६,००० स्क्वेअर फूट
फंड मॅनेजर असलेल्या जॉन पॉलसन यांनी सौदीचे राजकुमार प्रिन्स बंदर बिन सुलतान यांच्याकडून 4 कोटी 90 लाख डॉलरमध्ये हाला रँच हे घर खरेदी केले होते. जगातील सर्वात मोठ्या घरांच्या यादीत हे दहाव्या स्थानी आहे.
आस्पेन येथे 95 एकरात पसरलेले हे घर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहत असलेल्या व्हाइट हाऊसपेक्षाही मोठे आहे. त्यात 15 बेडरूम आणि 27 बाथरूम आहेत. मासेमारीसाठी तळे, स्विमिंग पूल. टेनिस कोर्ट, रॅकेटबॉल कोर्ट आणि स्किइंग ट्रेल अशा सुविधा या घरात आहेत.
घरातच कार वॉशिंग सेंटर, गॅस पंप आणि गॅरेजही आहे. कारण पॉलसन यांच्याकडे अनेक गाड्या आहेत. एवढेच नव्हे तर घराच्या आवारातच मलनिःसारण प्रकल्पही आहे.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.