Site icon InMarathi

ना नागरिकत्व, ना हाती पैसा, पाण्यातच राहणारी एक रहस्यमयी जमात

sama bajau inmarathi feature

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

विज्ञान-तंत्रज्ञानामध्ये झालेल्या नवनवीन शोधामुळे संपूर्ण जग हे आता एकप्रकारे ‘ग्लोबल-व्हिलेज’ झालेले आहे. अनेक मेसेजिंग आणि सोशल नेटवर्किंग साईट/ऍप्स मुळे जगातील प्रत्येक व्यक्ती एकमेकासोबत जोडली गेलेली आहे, परंतु या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये देखील जगामध्ये अनेक अशा जमाती आहेत, ज्यांनी स्वतःला जगापासून अलिप्त ठेवले आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

या लोकांचे स्वतःचे एक वेगळे जग आहे, जे दिसायला तर रोमांचक दिसते, परंतु ते तितकेच धोकादायक देखील असते. अशीच एक जमात आहे ती म्हणजे ‘सामा बजाऊ’. ही जमात संपूर्ण आयुष्य समुद्राच्या मधोमध घालवते. संपूर्ण जीवन समुद्राच्या मधोमध घालवणे ही कोणत्याही मानवासाठी काही सोपी गोष्ट नाही, पण मलेशिया आणि फिलीपिन्सच्या आसपासच्या समुद्रात राहणाऱ्या ‘सामा बजाऊ’ या आदिवासी जमातीचे लोक असेच जगतात.

हे लोक जगण्यासाठी पूर्णपणे समुद्रावर अवलंबून आहेत आणि एखादे महत्त्वाचे काम असेल तरच हे लोक जमिनीवर येतात. ही लोक एकमेकांना सम, समा आणि समल या नावांनी ओळखतात तर बाहेरची लोक यांना बजाऊ, बडजाह या नावांनी ओळखतात.

 

 

अनेक वर्षांपूर्वी या जमाती मधील लोकांना मलेशियन सरकारने आपल्या देशामध्ये राहायला बंदी घातली होती, त्यानंतर या लोकांनी इंडोनेशिया आणि फिलीपीन्स या देशांच्या समुद्रकिनाऱ्यावर पाण्यामध्ये बांबूचे खांब उभारुन त्यावर घरे बांधली तर काही लोकांनी बोटींवर आपली घरे बांधली.

तसे बघितले तर या जमातीमधील लोकांकडे कुठल्याही देशाची नागरिकता नाहीये, परंतु ही लोक फिलीपिंस, इंडोनेशिया या देशांचे निर्वासित म्हणून ओळखले जातात. काही वर्षांपूर्वी फोटोग्राफर एनजी चू कि याने या लोकांसोबत बराच वेळ घालवला होता आणि त्यानंतर त्याने या लोकांवर आधारित फोटोंची एक संपूर्ण मालिका जारी केली होती.

 

या लोकांचे राहणीमान अत्यंत साधे आणि सरळ असून, या लोकांकडे ना कुठलीही चलन व्यवस्था अस्तित्वात आहे ना कुठली बँक. तसेच अन्नासाठी हे लोक समुद्रामध्ये भाजी पिकवतात आणि सोबतच मासेमारी पण करतात. त्याचप्रमाणे कुठलेही ऑक्सीजन सिलिंडर न वापरता, समुद्राच्या ५० ते ६० फूट खोल पाण्यामध्ये १०-१५ मिनिटांसाठी या जमातीमधील लोक सहज पोहू शकतात.

मासेमारी करण्यासाठी या लोकांना कुठल्याही आधुनिक यंत्राची गरज पडत नाही. अनेक मोठ-मोठे मांसे देखील हे लोक सहजतेने पकडून घेतात. यावरून दिसून येईल, की या लोकांचा आपल्या शरीरावर आणि श्वसननावर पूर्णपणे ताबा आहे.

 

 

या जमातीमधील अनुभवी लोक येणाऱ्या नवीन पिढीला पाण्यामध्ये जास्त वेळ कसे पोहता येईल याचे प्रशिक्षण देतात. सततच्या अनुभव आणि प्रशिक्षणामुळे पाण्याच्या आतमध्ये राहण्याची यांची क्षमता वाढतच जाते, परंतु मागे एका रिसर्च मध्ये दिसून आले की, यांच्यामध्ये पोहण्याचे आणि बाकीचे जे इतर गुण आहेत, ते त्यांच्यामागे अनुवांशिकदृष्ट्या मिळतात.

ही लोक जमिनीवर काही महत्त्वाचे काम असेल तरच येतात, जसे की एखाद्याचे अंतिम संस्कार करणे किंवा एखादी नवीन बोट तयार करणे. परंतु आता या लोकांची जीवनशैली लोप पावत आहे. तेथील स्थानिक सरकार या लोकांसाठी अनेक योजना चालवत आहे ज्यामुळे ही लोक आता मुख्य प्रवाहासोबत जोडल्या जात आहे.

 

 

तसेच हे लोक ज्या झाडांच्या लाकडापासून नौका (Houseboat) बनवायचे, ते झाड देखील आता लुप्त होत आहे. त्यामुळे आता या लोकांना वजनाने जड असलेल्या लाकूड वापरावे लागत आहे, परंतु याचा खर्च अधिक असतो. त्यामुळे ही लोक आता जमीनीशी जोडल्या जात आहे.

तुम्हालाही असे जगण्याची संधी मिळाली तर तुमचे आयुष्य कसे असेल याची कल्पना करा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version