Site icon InMarathi

सावधान, सतत मॉश्चरायझर वापरणं आजचं थांबवलं नाहीत तर…

cream 1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

थंडीचा ऋतू सुरू झालाय, हळूहळू हवेमध्ये गारठा वाढत आहे. वाढणाऱ्या गारव्यामुळे त्वचा रुखरुखीत होण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. थंडीमुळे होणारी ड्राय स्किन आणि त्यामुळे पडणाऱ्या भेगा यांपासून संरक्षण मिळवायचं असेल तर मॉइस्चरायइजरला पर्याय नाही.

 

 

मॉइस्चराइजर आपल्या त्वचेला हवा असलेला ओलावा देऊन त्वचा कोमल आणि मुलायम बनवतो. सुकलेल्या चेहऱ्याला तजेला द्यायचं काम मॉइस्चराइजर करतो. परंतु कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच! मॉइस्चराइजचा वापर करताना अनेक लोक चूका करतात त्यामुळे चेहऱ्याचं भारी नुकसान होऊ शकतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

बॉडी लोशन चेहऱ्याला लावणे 

चेहऱ्यासाठी वेगळ्या प्रतीचं मॉइस्चराइजर बाजारात उपलब्ध आहेत. परंतु काही लोक बॉडी लोशन आणि मॉइस्चराइजर यामध्ये गल्लत करून तेच चेहऱ्यावर लावतात. बॉडी लोशनचा फॉर्म्युला हा मॉइस्चराइजर पेक्षा वेगळा असतो त्यामुळे चेहऱ्याची छिद्र ब्लॉक होऊन जातात.

 

happy knits

 

चेहऱ्याला पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने चेहऱ्यावर पुरळ , डाग येण्याचा धोका अधिक असतो. तसेच बॉडी लोशनमध्ये सुगंधासाठी मिसळलेल्या विशिष्ट द्रव्यांमुळे अलर्जी होण्याची शक्यता असते. त्यामुळे चेहऱ्यासाठी खास तुमच्या स्किनला सुट होईल असं मॉइस्चराइजर निवडा.

अति प्रमाणात वापरणे 

दिवसांतून अनेक वेळा चेहऱ्यावर मॉइस्चराइजरचा वापर केल्याने देखील त्वचेला हानी होते. याला ‘ ओव्हर मॉइस्चराईजिंग ‘ म्हणतात. यामुळे चेहरा चिपचीपित म्हणजेच तेलकट होऊन चेहऱ्याची नैसर्गिक चमक नाहीशी होते.

 

 

ओव्हर मॉइस्चराईजिंगमुळे चेहऱ्याची रोम छिद्र बंद होऊन पुरळ येण्यासाठी कारणीभूत होतं.

सवय टाळा

मॉश्चरायजर हा केवळ एक उपाय आहे. यामुळे शंभर टक्के त्वचा नितळ, गोरी होत नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे मॉश्चरायजरची सवय लावून घेऊ नका. अनेकदा व्यसन लागल्याप्रमाणे मॉश्चरायजरचा वापर करणे गैर आहे. यामुळे त्वचा अधिक खराब होण्याची भिती असते.

मॉइस्चराइजरचा चुकीचा वापर 

तळहातांवर मटार दाण्याच्या आकाराची क्रीम घेऊन हाताच्या उष्णेतेने गरम करा. त्यानंतर गालांवर गोलाकार फिरवत लावून घ्या.

मानेवर आणि चेहऱ्याच्या बाकी भागांवर वरच्या बाजूने हलके स्ट्रोक्स द्यावेत.

 

 

सकाळी आंघोळीनंतर एकदा आणि रात्री झोपी जाण्यापूर्वी एकदा चेहऱ्याला मॉइस्चराइजर लावल्याने चेहरा कोमल आणि तजेलदार होतो. ज्यांच्या त्वचेचा पोत रुक्ष आहे त्यांनी गरजेनुसार आपल्या स्किनला मॉइस्चराइज करावे. मात्र तेलकट त्वचा असणाऱ्या लोकांनी मॉइस्चराइजरचा वापर करताना विशेष काळजी घ्यावी.

मॉइस्चराइजरचा वापर कमी कसा करावा

जर नियमित निगा राखली नाही तर त्वचेवर मृत पेशींचा एक थर जमा होतो. त्यामुळे त्वचा मॉइस्चराइजर नीट शोषून घेत नाही आणि जास्त प्रमाणात मॉइस्चराइजर लावलं जातं. यावर उपाय म्हणून स्क्रबिंग किंवा अन्य उपायांनी डेड स्किन काढून टाका. यामुळे त्वचेची रोम छिद्रे उघडून मॉइस्चराइजर नीट शोषून घेतलं जाईल आणि त्याचा वापर कमी प्रमाणात होईल.

वरील सर्व उपायांनी तुमची त्वचा नेहमी सतेज आणि चिरतरुण राहील.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version