आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
असं म्हणतात, प्रेम जर खरं असेल तर ते सगळे अडथळे पार करतं. दोन माणसं एकमेकांच्या प्रेमात पडण्याचा काळ हा खूप सुंदर असतो. पण जसाजसा काळ पुढे जातो आणि प्रेमातलं सुरुवातीचं नावीन्य कमी होत जातं तसेतसे त्या दोघांना एकमेकांमधले दोष दिसू लागतात.
त्यांच्यात खटके उडायला सुरुवात होते. आपलं खरंच एकमेकांवर प्रेम आहे की हे नुसतंच आकर्षण आहे असा प्रश्न पडू लागतो. आपलं एकमेकांवर प्रेम आहे असं व्यक्त करून रिलेशनशीप मध्ये आलेल्या कुणाचीच खरंतर त्या नात्याचा शेवट व्हावा अशी इच्छा नसते. मग ते नातं अगदी केवळ आकर्षणातून निर्माण झालेलं असलं तरीदेखील.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
काही जोडप्यांच्या बाबतीत मात्र एकमेकांपासून वेगळं झाल्यानंतरही परत एकत्र येण्याचं भाग्य लिहिलेलं असतं. असं एकदा नात्याला अलविदा म्हटल्यानंतर पुन्हा एकत्र आलेली जोडपी सहसा त्यानंतर कधीच पुन्हा वेगळी झाल्याचं पहायला मिळत नाही.
बॉलिवूडमध्येही अशी जोडपी आहेत ज्यांचं नातं पूर्वी एकदा तुटल्यानंतर पुन्हा ती जोडपी नव्याने एकत्र आली. ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमारच्या नात्याची रंजक गोष्ट ही अशीच काहीशी आहे. त्यांनी दोनदा साखरपुडा केलाय. पहिला साखरपुडा मोडल्यानंतर ते काही काळ एकमेकांपासून वेगळे झाले होते. पण वेगळं झाल्यानंतरही त्यांच्यातलं प्रेम अखेर जिंकलं आणि ते पुन्हा एकत्र आले.
बॉलिवूडचा पहिलावहिला सुपरस्टार असं ज्या अभिनेत्याला म्हटलं जातं ते दिवंगत अभिनेते राजेश खन्ना आणि अभिनेत्री डिम्पल कपाडिया यांचं ट्विंकल खन्ना हे कन्यारत्न. अभिनय क्षेत्रात घवघवीत कारकीर्द असलेल्या आईबाबांच्या पोटी जन्माला आलेली ट्विंकल आज एक यशस्वी लेखिका म्हणून ओळखली जाते.
ट्विंकल खन्ना पूर्वी अभिनेत्री होती. तिने ‘बादशाह’, ‘जब प्यार किसी से होता है’, ‘बरसात’, ‘इतिहास’ या गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘लव्ह के लिये कुछ भी करेगा’ हा तिची भूमिका असलेला शेवटचा चित्रपट, पण अक्षय कुमारशी लग्न केल्यानंतर तिने ही इंडस्ट्री सोडली कारण अभिनय हे आपलं क्षेत्रं नाही, अभिनय करायला आपल्याला मजा येत नाही असं तोवर तिच्या लक्षात आलं होतं.
—
- अक्षय कुमार कॅनडाचा नागरिक असूनही, आयकर भारतात भरण्यामागचं खरं कारण
- या लोकप्रिय १८ सेलिब्रिटींच्या लग्नाचे फोटो तुम्हाला नक्की आवडतील!
—
‘इंटिरिअर डिझायनिंग’ ही आपली खरी आवड आहे असं तिच्या लक्षात आलं. मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट मध्ये तिचं आणि तिची मैत्रीण गुरलीन मंचंदा हिचं ‘द व्हाईट विंडो’ नावाचं इंटिरिअर डिझाईन स्टोअर आहे. त्यांच्या या स्टोअरला ‘एली डेकॉर मॅगझीन’च्या भारतातल्या आवृत्तीतर्फे ‘एली डेकॉर इंटरनॅशनल डिझाईन अवॉर्ड’ हा मानाचा पुरस्कारही मिळाला आहे.
ट्विंकल खन्ना याखेरीज एक यशस्वी लेखिका म्हणूनही ओळखली जाते. ‘मिसेस फनीबोन्स’, ‘द लेजेंड्स ऑफ लक्ष्मी प्रसाद’ आणि ‘पैजामाज आर फर्गिविंग’ ही तिची आजवर प्रकाशित झालेली पुस्तके. ती एक उत्तम स्तंभलेखिकाही आहे.
इतके वेगवेगळे गुण असलेली ट्विंकल आणि अक्षय कुमार लग्न करण्यापूर्वी ३-४ वर्षे एकेमकांबरोबर रिलेशनशीप मध्ये होते. अक्षय कुमारने जेव्हा ट्विंकल खन्नाला लग्नासाठी मागणी घातली तेव्हा तिचा ‘मेला’ हा चित्रपट प्रदर्शित व्हायचा बाकी होता. ‘मेला’ चालला नाही तर मी तुझ्याबरोबर लग्न करेन आणि जर ‘मेला’ हा चित्रपट गाजला तर आपल्याला लग्नासाठी थांबावं लागेल अशी विचित्र अट ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारला घातली होती.
‘मेला’ चित्रपट बॉक्स ऑफिस वर दणकून आपटला आणि अशा प्रकारे ट्विंकल आणि अक्षय विवाहबंधनात अडकले, पण २००१ मध्ये लग्न होण्यापूर्वी ट्विंकल आणि अक्षयचा साखरपुडा एकदा मोडला होता. अक्षय कुमारची सहअभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्याबरोबरची त्याची वाढती जवळीक हे त्यामागचं कारण होतं.
ट्विंकलबरोबर एकदा साखरपुडा झाल्यानंतर हे घडलं होतं. अक्षय आणि शिल्पाच्या अफेअरच्या चर्चाही त्यावेळी चांगल्याच रंगल्या होत्या. ट्विंकल खन्नाला जेव्हा हे कळलं तेव्हा शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमारच्या नात्यात खटके उडायला सुरुवात झाली. ट्विंकलने अक्षयला त्याच्या या गैरवर्तनापासून परावृत्त करायचा प्रयत्न केला तरीही अक्षय काही त्याला बधेना.
अखेरीस रागाने ट्विंकलने अक्षयबरोबरचा साखरपुडा मोडला. या सगळ्या प्रकारामुळे तेव्हा ट्विंकल डिप्रेशनमध्येही गेली होती, पण ज्यांना एकत्र यायचं असतं ते सगळी खडतर वळणं पार करून एकत्र येतातच. तसे त्यानंतर काही काळाने अक्षय आणि ट्विंकल पुन्हा एकत्र आले.
अक्षयने शिल्पासोबतचे सगळे संबंध तोडले.आपली चूक झाल्याची कबुली त्याने ट्विंकलला दिली आणि तिची माफी मागितली. ट्विंकलने त्याला माफ केलं आणि पुन्हा त्यांचा दुसऱ्यांदा साखरपुडा झाला.
ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार हे दोघेजण एकमेकांपेक्षा अतिशय भिन्न आहेत. ट्विंकल सगळं काही थेट बोलते तर अक्षय कुमार फार डिप्लोमॅटिक आहे, पण त्यांचं एकमेकांपेक्षा फार भिन्न असणंच त्यांचं नातं अधिक सुंदर करत आलंय.
एका मुलाखतीत अक्षय कुमार म्हणाला होता की, “आम्ही दोघे दोन टोकं आहोत आणि हीच आमच्या नात्यातली सगळ्यात उत्तम गोष्ट आहे.”
कधीकाळी साखरपुडा मोडलेले हे दोघेजण आता दोन मुलांचे आईबाप आहेत. सगळ्यांनाच ट्विंकल-अक्षयची जोडी फार आवडते. त्यामुळे त्यांचं पुन्हा एकत्र येणं ही केवळ त्या दोघांसाठीच नाही तर आपल्या सगळ्यांसाठीच आनंदाची गोष्ट आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.