चीनच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी अमेरिकेचा डाव; तिबेट प्रश्न चर्चेसाठी केली या व्यक्तीची निवड
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपला देश व आपला शेजारी चीन या देशांमध्ये सीमेवरून व तिबेटवरून बराच जुना वाद सुरु आहे हे तर सर्वांनाच माहित आहे. चीन-भारत सीमा विवाद हा चीन आणि भारत यांच्यातील दोन तुलनेने मोठ्या, आणि अनेक लहान, विभक्त प्रदेशांच्या सार्वभौमत्वावर चालू असलेला प्रादेशिक वाद आहे.
आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये अमेरिका कायम मध्यस्ती करते हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. चीन व अमेरिकेचे एकमेकांशी किती पटते हे देखील सगळ्या जगाला ठाऊक आहे. आता चीनला डिवचण्यासाठी अमेरिकेने पुन्हा एकदा तिबेटच्या मुद्द्याला हवा दिली आहे.
राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी भारतीय वंशाच्या मुत्सद्दी उजरा झेया यांची तिबेट प्रकरणांसाठी विशेष समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. यूएस रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक खासदारांचा एक प्रभावशाली गट आधीच बिडेन प्रशासनावर तिबेट प्रश्नात हस्तक्षेप करण्यासाठी आणि दलाई लामा यांच्याशी चर्चा करण्यासाठी अनेक दिवसांपासून दबाव आणत होता.
तिबेटची वेगळी राजकीय, वांशिक, सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख ओळखणारे धोरण अमेरिकेने तयार करावे, अशी मागणी खासदारांनी केली होती. यूएस संसदेने यापूर्वीच तिबेटवर २००२ चा तिबेट धोरण कायदा आणि २०२० चा तिबेटवर अमेरिकन धोरण आणि समर्थन कायदा लागू केला आहे. म्हणून आता बायडेन प्रशासनाने तिबेटच्या करारासाठी चीन आणि दलाई लामा अथवा त्यांचे प्रतिनिधी यांच्यात ठोस चर्चा घडवून आणण्यासाठी मुत्सद्दी उजरा झेया ह्यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. उजरा झेया या मूळच्या भारतीय वंशाच्या आहेत हे विशेष!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
झेया यांना हे पद मिळावे म्हणून संबंधित सुनावणीदरम्यान खासदारांना सांगितले होते की झेया यांचे आजोबा भारतातील स्वातंत्र्यसैनिक होते. झेया यांनी जॉर्जटाउन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ फॉरेन सर्व्हिसमधून पदवी प्राप्त केली. त्यांच्या राजनैतिक कारकिर्दीत नवी दिल्लीमध्ये तैनात असलेल्या झेया यांनी २०१८ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध परराष्ट्र सेवेचा राजीनामा दिला होता. त्या सिव्हिल डिफेन्स, डेमोक्रसी आणि ह्युमन राइट्सच्या अवर सेक्रेटरी देखील आहेत.
तिबेटचे अध्यात्मिक गुरु दलाई लामा यांनी उजरा झेयायांची तिबेटी समस्यांसाठी अमेरिकेचे विशेष समन्वयक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे पत्र पाठवून अभिनंदन केले आहे. तिबेटी लोकांची स्थिती सुधारण्यासाठी त्या महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतील, अशी आशा दलाई लामा यांनी या पत्रात व्यक्त केली आहे.
आपल्या पत्रात दलाई लामा ह्यांनी अमेरिकेच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. या पत्रात दलाई लामा यांनी पुढे असेही म्हटले आहे की, “आमच्या स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठेच्या शांततापूर्ण लढ्यात तिबेटींना अमेरिकेचे सततचे समर्थन हे खूप प्रोत्साहन देणारे ठरले आहे.
जरी मी निवडून आलेल्या तिबेटी नेतृत्वाकडे राजकीय अधिकार सोपवले असले तरीही मला तिबेटची ओळख, आमच्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, आमचा ऐतिहासिक वारसा आणि तिबेटच्या नाजूक नैसर्गिक वातावरणाच्या संरक्षणाची काळजी आहे. मला हे पाहून आनंद झाला की तुम्ही तुमच्या पहिल्या टिप्पणीमध्ये या सर्व गोष्टींना तुमचे प्राधान्य असेल असे नमूद केले आहे.”
या पत्रात दलाई लामा पुढे म्हणातात की, “तुम्हाला माहिती आहेच की तिबेटी लोकांच्या शांततापूर्ण लढ्याला व्यापक आंतरराष्ट्रीय स्वारस्य आणि समर्थन आहे. कारण तिबेटी लोकांच्या अहिंसा आणि करुणेच्या समृद्ध संस्कृतीत जगाला योगदान देण्याची क्षमता आहे.
मला विश्वास आहे की येणाऱ्या काळात फक्त सत्याची शक्तीच विजयी होईल. मी तुम्हाला भेटण्यासाठी आणि तुमच्या समर्थनाचा आणि पुढाकाराचा फायदा होऊ शकेल अशा मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करण्यास उत्सुक आहे. मला खात्री आहे की तुम्ही आमच्या निवडून आलेल्या तिबेटी नेतृत्वाच्या संपर्कात राहाल.”
–
- चीनच्या नवीन हायपरसॉनिक मिसाईल्समुळे अमेरिका आणि भारतावरही संकट?
- चीनची इस्लामविरोधी कडवी नीति; प्रत्येक भारतीयाने समजून घेतली पाहिजे.
–
तिबेटमधील सांस्कृतिक आणि धार्मिक स्वातंत्र्य दडपल्याचा चीनवर आरोप आहे. चीनने मात्र हे आरोप वारंवार फेटाळून लावले आहेत. चीनचे प्रतिनिधी आणि दलाई लामा यांच्यात अलिकडच्या वर्षांत तिबेट प्रश्नावर चर्चा झालेली नाही. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी २०१३ मध्ये पदभार स्वीकारल्यापासून तिबेटवरील सुरक्षा नियंत्रणे वाढवण्यासाठी कठोर धोरण स्वीकारले आहे.
चीनने अनेकदा बौद्ध भिख्खू आणि दलाई लामा यांच्या अनुयायांवर कारवाई केली आहे. दलाई लामा तिबेटमधून निर्वासित असूनही तिबेटमधील एक प्रमुख आध्यात्मिक गुरु व नेते आहेत. चीन ८६ वर्षीय दलाई लामा यांना फुटीरतावादी मानतो.
चीनला १५ वे दलाई लामा म्हणून अश्या व्यक्तीची नेमणूक करण्याची इच्छा आहे जो त्यांना पाठिंबा देईल , जेणेकरून चीनला तिबेटवरील आपली पकड मजबूत करता येईल. तर तिबेटी संस्कृतीच्या दडपशाहीबाबत अमेरिका सातत्याने आवाज उठवत आहे. अशा स्थितीत अमेरिकेने केलेल्या या नव्या नियुक्तीमुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.