आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
श्रीरामाचं नाव प्रत्येकाच्या मुखी असतं. दाम्पत्यांना राम-सितेची उपमा दिली जाते, तर श्रीरामाचा गजर केल्याशिवाय अनेकांचा दिवस सुरु होत नाही, पण तुम्ही ज्या रामाची भक्ती करता त्यांचं नाव तुम्हाला शरीरावर गोंदविण्यास सांगितलं तर?
आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे.
आपल्या संपूर्ण शरीरावर श्री रामाचे नाव लिहिणाऱ्या या समाजाबद्दल फारच कमी लोकांना ठावूक आहे. पण गेल्या १०० वर्षांपेक्षाही आधीपासून छत्तीसगढच्या रामनामी समाजामध्ये ही आगळी वेगळी परंपरा चालत आली आहे.
ह्या समाजाचे लोक पूर्ण शरीरावर रामाचे नाव गोंदवतात, परंतु हे लोक मंदिरात जात नाहीत आणि मूर्तीची पूजा ही करत नाहीत.
असे संपूर्ण शरीरभर रामाचे नाव गोंदवण्यामागे त्यांची भक्ती आहे आणि याद्वारे ते एका गोष्टीचा सामाजिक विरोध देखील करतात, चला तर जाणून घेऊया रामाचे नाव गोंदण्याच्या मागील विरोधाची गोष्ट!
असं म्हटलं जातं, की १०० वर्षापूर्वी गावातील हिंदूंच्या वरिष्ठ जातीच्या लोकांनी या समाजातील लोकांना मंदिरात जाण्यास मनाई केली. ह्यानंतरच या लोकांनी विरोध करण्यासठी चेहऱ्यासकट संपूर्ण शरीरावर रामाच्या नावाचे गोंदण करण्यास सुरुवात केली.
रामनामी समाजाला रामरमिहा नावाने ही ओळखले जाते. जमगाहन गावाचे महेतर राम टंडन या परंपरेला गेल्या ५० वर्षांपासून चालवत आले आहेत.
जमगाहन छत्तीसगढ मधील सर्वात गरीब आणि मागासलेल्या भागापैकी एक आहे. राम टंडन म्हणतात की,
ज्यादिवशी मी संपूर्ण शरीरावर रामाचे नाव गोंदवले त्यादिवशी माझा नवीन जन्म झाला.
एवढ्या वर्षानंतर त्यांच्या शरीरावरील गोंदण काहीसे अंधुक झाले आहे, परंतु त्यांच्या विश्वासात काहीच कमीपणा आलेला नाही.
जवळच्याच गोरबा गावातील ७५ वर्षाची पुनई बाईदेखील ही परंपरा पुढे नेण्यात अग्रेसर होत्या.
पुनई बाईच्या शरीरावर केलेले राम नामाचे गोंदण ‘देव हा कोणत्याही विशिष्ट जातीचा नसून सगळ्यांचा आहे असे प्रतीत करते.’ गोंदण्याच्या व्यतिरिक्त रामाचे नाव लिहिलेले कपडेही हे लोक घालतात.
नवीन पिढीने मात्र स्वत:ला या परंपरेपासून लांब ठेवले आहे.
रामनामी जातीच्या लोकांची संख्या जवळपास एक लाख आहे आणि छत्तीसगढच्या चार जिल्ह्यांमध्ये ह्यांची संख्या जास्त आहे. या समाजामध्ये सर्वांगावर गोंदवून घेणे एक सामान्य गोष्ट आहे.
आता काळानुसार गोंदण्याची प्रथा थोडी कमी झाली आहे. रामनामी जातीच्या नवीन पिढीच्या लोकांना शिक्षणासाठी दुसऱ्या शहरांमध्ये जावे लागते. त्यामुळे ही नवीन पिढी शरीरावर गोंदवून घेणे पसंत करत नाहीत.
ह्या बाबतीत राम टंडन म्हणतात, कीआताची पिढी ह्या प्रकारचे गोंदण करत नाहीत,पण असे बिलकुल नाही की त्यांचा ह्यावर विश्वास नाही.
संपूर्ण शरीरावर नाही,त र शरीराच्या कोणत्याही भागावर राम-राम लिहून ते आपली संस्कृती पुढे चालवत आहेत.
समाजाचे काही नियम
ह्या समाजात जन्मलेल्या लोकांना शरीरातील कोणत्यातरी भागावर रामनाम गोंदवणे अनिवार्य असते. राम नामाचे गोंदण करून घेतलेल्या लोकांना दारू पिण्यास मनाई असतेच पण सोबतच त्यांनी दरोरोज राम नाम बोलणे ही अपेक्षित असते.
बहुतांश रामनामी लोकांच्या घरांच्या भिंतीवर राम-राम लिहिलेले असते.
ह्या समाजातील लोकांमध्ये राम-राम लिहिलेले कपडे वापरण्याचीही प्रथा आहे आणि हे लोक आपापसात एक दुसऱ्यांना राम-राम नावानेच हाक मारतात.
समाजाच्या काही रंजक गोष्टी
शरीरावरील कोणत्याही भागावर राम-राम लिहिणाऱ्यांना रामनाम, माथ्यावर राम लिहिणाऱ्यांना शिरोमणी आणि संपूर्ण डोक्यावर राम लिहिणाऱ्यांना सर्वांग रामनामी आणि संपूर्ण शरीरावर राम लिहिणाऱ्यांना नखशिख रामनामी म्हटले जाते.
रामनामी समाजाची कायद्याने नोंदणी केलेली आहे आणि लोकशाही नुसार त्यांच्या निवडणुका प्रत्येक ५ वर्षांसाठी घेतल्या जातात.
आज कायद्याच्या बदलाने समाजातील वरिष्ठ-कनिष्ठ जातीत भेदभाव मिटवला आहे आणि या सर्वांमध्ये रामनामी समाजाने बरोबरी मिळवण्याची आशा सोडलेली नाही.
प्रत्येक समाजाला स्वतःचं वैशिष्ठ्य असतं, या समाजाचं वेगळेपण इतरांपेक्षा अनोखं आहे. काळानुसार या समाजातील तरुणांनी ही प्रथा पूर्णपणे पाळली नसली तरी त्याला विरोधही केला जात नाही.
—
- भूक लागल्यावर हे १० पदार्थ वाट्टेल ते खाल्लेत, तरीही वजन वाढीची चिंता सतावणार नाही
- अमूल, McDचे लाल-पिवळे तर टाटा, SBI चे निळे: हे रंग तुम्हाला “अपेक्षित” कृती करायला भाग पाडतात!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.