आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
साप, नाग असे प्राणी पाहिले की कोणीही सामान्य माणूस घाबरतोच, कारण आपल्या मनात एक भीती बसलेली असते की त्यांच्या दंशाने आपला जीवही जाऊ शकतो.
त्यामुळे आपण नेहमी त्यांच्यापासून चार हात लांबच राहतो, त्यांच्या जवळ जाण्याचे कधीही धाडस करत नाही.
पण असे काही व्यक्ती असतात, ज्यांना या प्राण्यांचा सहवास हवाहवासा वाटतो, ज्यांना आपण सर्प मित्र म्हणून ओळखतो.
त्यांना सापाशी वा नागाशी चक्क खेळताना पाहून आपल्याला आश्चर्य वाटल्याखेरीज राहत नाही. तुम्ही देखील विषारी साप, नाग हाताळणारे सर्पमित्र पाहिले असतील.
पण काय हो, चक्क किंग कोब्राला हाताळणारा आणि त्याच्याशी खेळणारा व्यक्ती तुम्हाला माहित आहे का?
चला जाणून घेऊया जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रजातीला हाताळणाऱ्या अवलियाबद्दल!
–
- लहानपणी “नागराज” कॉमिक्स वाचलंय? भेटा नाग-मानवांना
- नागपंचमी हा सण कोट्यवधी सर्प भस्मसात झाल्यानंतर सुरू झालाय – हे आपल्याला माहितीच नसतं…!
–
वावा सुरेश असं या अवलीयाचं नाव, या मनुष्याने किंग कोब्रा, कोब्रा आणि वायपर यांसारख्या प्राणघातक सापांशी सहज दोस्ती केली आहे.
केरळच्या या वन्यजीव संरक्षणकर्त्याने आतापर्यंत ११३ किंग कोब्र्यांना वाचवले आहे, किंग कोब्रा हा पृथ्वीवरील सर्वात घातक सापांपैकी एक साप मानला जातो.
या प्रजातीच्या संरक्षणामध्ये सुरेश यांचा मोलाचा वाटा आहे. ४६ वर्षे वय असलेल्या सुरेशने मोठ्या जोखमीची जाणीव असून सुद्धा हे काम आजही सुरु ठेवले आहे. जणू त्याच्या जीवनाचे हे एक मिशनच झाले आहे.
सुरेशची भीती चेपण्यामागचे कारण म्हणजे त्याला अनेक सापांनी ३८८३ वेळा दंश केला आले, त्यापैकी ३८७ साप हे खूपच प्राणघातक होते.
सुरेश याने आपल्या २८ वर्षाच्या कारकीर्दीमध्ये अनेकदा मृत्यूशी झुंज दिली आहे, त्या बदल्यात अनेक वेळा त्याला आयसीयू मध्ये देखील दाखल करण्यात आले होते.
पण आजही एखाद्या सापाची माहिती मिळताच तितक्याच जोमाने तेथे हजर होऊन सुरेश आपले काम चोख बजावतो हे विशेष! त्याच्या या कामामुळेच स्थानिक लोक त्याला ‘स्नेक मॅन’ संबोधतात.
सुरेशने शाळेत असताना सगळ्यात पहिल्यांदा एक कोब्रा पकडला होता.
त्याच्या घरच्यांना त्याचे हे काम बिलकुल आवडले नाही, पण सुरेशला मात्र त्यात भरपूर रस वाटु लागला.
पुढे शाळा पूर्ण झाल्यावर त्याने कोणालाही न जुमानता हे काम सुरु ठेवले आणि आपले संपूर्ण जीवन सापांसाठीच अर्पण केले. आता तर त्याचे कुटुंबिय सुद्धा निश्चिंत आहेत आणि त्याला या कामात पूर्ण पाठींबा देतात.
–
- जगातील या आठ अत्यंत धोकादायक तरीदेखील सुंदर सापांच्या जाती….जाणून घ्या
- सर्पदंशामुळे झाला अभिनेत्रीचा मृत्यू: असा कराल सर्पदंशाचा सामना
–
ज्या सापांना सुरेश सोडवतो, त्यांना तो अश्या ठिकाणी जंगलात सोडतो जिथे मानवी अस्तित्व नाही, जेणेकरून साप आणि मानव दोन्ही सुरक्षित राहू शकतील.
सापाला मारून टाकणे वगैरे गोष्टीला सुरेशचा तीव्र विरोध आहे. तो स्वत: कोणत्याही सर्पाला इजा पोचवत नाही की इतरांनाही पोचवू देत नाही.
सध्या लोकांना भेटून त्यांच्याशी परिसंवाद आयोजित करून सापांच्या जागरूकतेविषयी तो माहिती पुरवण्याचे काम करतो.
संपूर्ण केरळ राज्यामधून दिवसाला किमान २०० फोन त्याला येतात, ज्यात काही जण सापांविषयी असलेली शंका विचारतात, तर काही जण त्याच्या बरोबर काम करायचे आहे वगैरे इच्छा व्यक्त करतात.
सुरेशच्या मते,
“सापांचे विष हे जोवर शरीराबाहेर आहे तोवर ते धोकादायक नसते. त्यामध्ये खरे पाहता ९५ प्रथिने असतात. जर सापाचे विष रक्तामध्ये पोहचले तरच ते धोकादायक असते. जगभरामध्ये काही ठिकाणी सापांचे विष हे औषध म्हणून वापरले सुद्धा जाते.”
“पर्यावरणातील समतोल राखण्यासाठी साप हे खूप महत्त्वाचे असतात, त्यामुळे लोकांच्या मनात त्यांच्याविषयी जागरुकता निर्माण होणे गरजेचे आहे.”
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.