आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आजही आपल्याकडे थाटामाटात लग्नसोहळे पार पडतात. तुमचं लग्नघर असेल तर लग्नात होणारी एकूणच सगळी दमछाक हीदेखील पर्यायाने असतेच, पण ते मंतरलेले दिवस आपल्याकडून सगळं काही व्यवस्थित पार पाडून घेतात.
सध्या अगदी बॉलिवूडच्या सेलिब्रिटीजपासून आपल्यासारख्या सामान्य माणसांपर्यंत सर्वत्र लग्नाचा माहौल आहे. हिवाळा हा आपल्याकडे लग्नाचा सिझन समजला जातो. आपल्यापैकी अनेकांचा हिवाळा हा असाही लाडका ऋतू असतोच.
हा गुलाबी थंडीचा ऋतू प्रेमिकांसाठी काकणभर अधिकच सुखद असतो. पावसाळ्यात लग्नांचे फार मुहूर्तही नसतात आणि तुळशीच्या लग्नानंतर लग्नांच्या मुहूर्तांना सुरुवात होते. त्यामुळे हिवाळ्यात जर मोठ्या प्रमाणावर लग्नं होत असतील तर आश्चर्य वाटायला नको.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर लग्न होण्यामागे हे एवढंच कारण नाही. ‘या’ ६ कारणांमुळे बहुतेक लग्नं हिवाळ्यात होतात :
१. छान वातावरण असतं आणि दगदग कमी होते –
कितीही नाही म्हटलं तरी जर तुमच्या घरचं लग्नकार्य असेल तर ते प्रचंड थकवणारं असतं. त्यात लग्नं जर उन्हाळ्यातली किंवा पावसाळ्यातली असतील तर बघायलाच नको. पावसाळ्यातल्या चिखलामुळे, पावसाने विस्कळीत केलेल्या दिवसाच्या वेळापत्रकामुळे आणि उन्हाळ्यातल्या प्रचंड उष्म्यामुळे, सतत लागणाऱ्या घामाच्या धारांमुळे लग्नांना जाणाऱ्यांसाठीही या दोन ऋतूंमध्ये लग्नांना जाणं हा थकवणारा अनुभव असतो.
तहान लागली की जिथे पाणी ठेवलंय तिथे १० वेळा सारखं सारखं उठून जावं लागतं. वधूवरांसकट सगळ्यांचीच थोडीफार चिडचिड होत असते.
हिवाळ्यातल्या लग्नांमध्ये उन्हापावसामुळे होणारी ही वाढीव दगदग होत नाही. त्यामुळे हिवाळ्यात घरचं लग्नकार्य असणं आणि इतरांच्या लग्नांना जाणं तुलनेने अधिक सुखावह असतं.
२. हॉल शोधायला कमी त्रास होतो –
लग्नाचा हॉल निवडणं हे अनेक महत्त्वाच्या कामांपैकी एक महत्त्वाचं काम. भर पावसात किंवा कडक उन्हात लग्नासाठी हॉल शोधायला जाणं आणि हॉलचं बुकिंग करणं कंटाळवाणं, थकवणारं आणि मनावर अधिक ताण आणणार काम होऊन जातं.
हिवाळ्यात या सगळ्यापासून आपली सुटका होऊ शकते. शिवाय हिवाळ्यात आपल्याला ‘एसी हॉल’चं बुकिंगही करावं लागत नाही.
३. अधिक छान डेकोरेशन्स –
हिवाळ्यात ताजी, टवटवीत फुलं अगदी सहज उपलब्ब्ध असतात. त्यामुळे वेडिंग प्लॅनर्स आणि वेंडर्सना हॉलचं अगदी दिमाखदार डेकोरेशन करता येतं. आपण या सगळ्यावर खूप खर्च केलेला असतो. उत्तम डेकोरेशन्स पाहून आपणही अगदी समाधानी होतो.
हिवाळ्यात लग्नाच्या हॉलमध्ये ज्या फुलांनी सजावट केलीये ती सगळी फुलं सजावट केल्यानंतरही छान टवटवीत राहतात. बाकीही सजावट जशी असते तशीच छान राहते.
–
- विकी-कॅट प्रमाणे तुम्हीसुद्धा डेस्टिनेशन वेडिंगसाठी या ६ जागांचा विचार करताय का?
- या लोकप्रिय १८ सेलिब्रिटींच्या लग्नाचे फोटो तुम्हाला नक्की आवडतील!
–
हिवाळ्यात वेगवेगळ्या सेलिब्रेशन्सच्या निमित्ताने अशीही हॉल्सची सजावट केलेली असतेच. ही आधीपासून केलेली सजावट लग्नासाठी केलेल्या सजावटीत अधिक भरच घालते.
४. फोटो छान येतात –
आपला लग्नाचा अल्बम आपण कायम जपणार असतो. त्यामुळे लग्नातल्या आपल्या सुंदर क्षणांचे फोटोज् आपल्याला छानच हवे असतात. कितीही मेकअप केलेला असला तरी वधूवरांसकट लग्नाला आलेल्या सगळ्या पाहुण्यांच्या चेहऱ्यावर उन्हाळ्यातल्या आणि पावसाळ्यातल्या लग्नांमध्ये मरगळ आलेली असते, घामाच्या धारा लागलेल्या असतात. कॅमेऱ्यातूनही ते लपत नाही.
हिवाळ्यातल्या लग्नांमध्ये मात्र वधूवरांसकट लग्नाला गेलेल्या आपल्या सगळ्यांचाच मेकअप बराच काळ जसाच्या तसा राहतो. त्यामुळे ‘फोटोज छान येणे’ हाही हिवाळ्यात लग्न होण्याचा आणि लग्नांना जाण्याचा एक फायदा आहे.
५. भरजरी कपडे आणि भारी वजनाच्या दागिन्यांमुळे होणारी दगदग कमी –
लग्न म्हटलं की भरजरी कपडे आणि भारी वजनांचे दागिने हे ओघाने आलेच. आपल्या हौसेपोटी वधू आणि पाहुणेमंडळींमधले अनेक जणही असे भरजरी कपडे आणि जडजड दागिने घालून येतात.
त्यामुळे थकायला होतं आणि चिडचिड होते. पण बिचाऱ्या वधूसमोर ती चिडचिड तशीच आत दडवून सतत हसरा चेहरा ठेवण्याखेरीज पर्याय नसतो.
हिवाळ्यातल्या लग्नांमध्ये ही चिडचिड इतर दोन्ही ऋतूंपेक्षा कमी होऊ शकते. वधूसकट सगळ्यांसाठीच त्यामुळे सोहळा अधिक आनंददायी होऊ शकतो.
शिवाय, फार घाम येणार नाही याची खात्री असल्यामुळे हौशी पुरुषमंडळी आणि तरुण मुलं सुटबुट, ब्लॅक टाय घालून हिवाळ्यातल्या लग्नांमध्ये मिरवू शकतात.
६. लग्नाच्या हॉलसाठीचा आणि प्रवासाचा खर्च कमी –
उन्हाळ्याच्या मानाने हिवाळ्यात लग्नाच्या हॉल्सचे दर कमी असतात. उन्हाळ्यात लहान मुलांच्या सुट्ट्या असल्यामुळे फिरायला जाण्यासाठी आधीच मोठ्या प्रमाणावर बुकिंग्ज करून ठेवलेली असतात. त्यामुळे उन्हाळ्यातल्या प्रवासाचे दर बरेच जास्त असतात.
हिवाळ्यात अशी परिस्थिती नसते. तुमच्या घरच्या लग्नासाठी किंवा तुमच्या इतर आप्तेष्टांच्या लग्नांना जाण्यासाठी जर तुम्हाला प्रवास करावा लागणार असेल तर हिवाळ्यात हा प्रवास निश्चितपणे कमी खर्चात होतो.
ऋतू कुठलाही असो, कुणाचंही लग्न ही गोष्टच मुळात आनंददायी असते. पण जर आपलीच दगदग तुलनेने कमी झाली आणि उत्तम वातावरणाची जोड मिळाली, आपण छान दिसत असू तर ज्यांच्या घरी लग्नकार्य आहे आणि जे लग्नांना गेले आहेत अशा सगळ्यांसाठीच हा आनंद द्विगुणित होतो.
हिवाळ्यातले लग्नसोहळे यामुळे कदाचित अधिक सुखद अनुभव देणारे ठरतात.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.