आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
अल्बर्ट आइनस्टाइनच्या मते, अवकाश आणि वेळ एकत्र विणलेले आहेत, जे एक गुळगुळीत चार-आयामी फॅब्रिक तयार करतात ज्याला “स्पेसटाइम” म्हणतात.
NASA ने नुकत्याच केलेल्या अभ्यासात हे सिद्ध झाले आहे, की आइन्स्टाईन केवळ बरोबरच नव्हता, तर त्याच्या मतानुसार पृथ्वीच्या फिरत्या गतीमुळे पृथ्वीभोवतीचा स्पेसटाइम व्हर्टेक्स विकृत झाला आहे. काही फ्रिंज सिद्धांतकारांच्या मते या फॅब्रिकमध्ये फूट पडली आहे, ज्यामुळे जगभरातील विशिष्ट भागात लहान पोर्टल उघडले गेले आहेत.
तथापि, आजपर्यंत अशा फाटाफुटीचा कोणताही पुरावा मिळालेला नाही आणि हे पोर्टल कोठे उघडले गेले आणि या विशिष्ट ठिकाणी ते का तयार केले गेले या प्रश्नांची उत्तरे कधीही मिळाली नाहीत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
हे जरी सर्वसामान्य लोकांच्या समजण्यापलीकडचे असले, तरी इतके नक्की आहे की पृथ्वीवर काही गूढ जागा आहेत ज्या धोकादायक आहेत. काही वर्षांपूर्वी ‘बर्म्युडा ट्रँगल’ नावाच्या एका अशाच गूढ जागेने सगळीकडे हाहाकार माजवला होता. समुद्रात असणार्या या त्रिकोणीय जागेवरून उडणारी विमाने अथवा जवळून जाणारी जहाजे गायब होत असत.
सांगायचा मुद्दा हा की आणखी अशीच एक गूढ आणि धोकादायक जागा आहे, जी पश्चिमी अमेरिकेच्या फ्रेस्नो, लास वेगास आणि रेनो शहरांनी वेढलेली आहे आणि सिएरा नेवाडा पर्वतराजीच्या उंच शिखरांनी व्यापलेली आहे. Yosemite, Kings Canyon आणि Sequoia National Park या शिखरांच्या पायथ्याशी आहे, गूढतेची जाणीव वाढवणारे, ‘Area 51’ म्हणून ओळखले जाणारे अति-गुप्त सरकारी प्रतिबंधित क्षेत्र देखील तिथेच आहे.
नेवाडा त्रिकोण म्हणून ओळखल्या जाणार्या २५००० चौरस मैल परिसरात अंदाजे २००० विमाने गायब झाली आहेत. अशा रहस्यमय पद्धतीने इतक्या संख्येत विमाने गायब होण्यामागे काय कारण असावे बरे? काही घातपात की एखादे ओपेन सीक्रेट ? जाणून घेऊया, रहस्यामागचे रहस्य नेवाडा त्रिकोणासह!!
नेवाडा आणि कॅलिफोर्नियामधील ‘सिएरा नेवाडा’ पर्वताच्या प्रदेशात, गेल्या ६० वर्षांत सुमारे २००० विमाने गमावली गेली आहेत. २५००० मैल पेक्षा जास्त पर्वतीय वाळवंटाच्या या दुर्गम लोकसंख्येच्या क्षेत्रात, अनेक क्रॅश साइट्स आहेत ज्या सहजासहजी कधीही सापडत नाहीत.
नेवाडा त्रिकोणाच्या जागेची व्याख्या सामान्यत: लास वेगास, नेवाडा ते आग्नेयेला फ्रेस्नो, पश्चिमेला कॅलिफोर्निया आणि शीर्षस्थानी रेनो, नेवाडा अशी केली जाते. या खडबडीत वाळवंटात गूढ, टॉप-सिक्रेट ‘एरिया ५१’ आहे. ज्यात यूएफओ आणि हवाई दलाच्या तळाच्या आसपासच्या गोष्टींचा समावेश आहे, इथे महिन्यातून अंदाजे तीन विमाने बेपत्ता होतात.
यात बळी गेलेल्यानपैकी सर्वात प्रसिद्ध बळी म्हणजे साहसी पायलट आणि उद्योजक असलेले ‘स्टीव्ह फॉसेट’. 3 सप्टेंबर 2007 रोजी सकाळी, फॉसेटने त्याच्या ‘सुपर डेकॅथलॉन सोबत’ नेवाडा येथील एका छोट्या हवाई पट्टीवरून उड्डाण केले आणि तो त्याच्या विमानासकट हवेतल्या हवेत गायब झाल्याचे दिसते.
अंदाजे $७०००० खर्चून शोध-आणि-बचाव कार्ये पुढे अनेक आठवडे चालू राहिले, तरीही फॉसेट एका वर्षानंतरही सापडला नाही, नंतर एका प्रवाशाने त्याच्या ओळखपत्रांवरून त्याला ओळखले होते. NTSB ला विमानात कोणतीही यांत्रिक समस्या आढळली नाही, मग त्या दुर्दैवी फॉसेटचे काय झाले? आणि त्याच परिसरात इतकी इतर विमाने का गायब झाली आहेत, जी कधीच सापडली नाहीत?
सिएरा नेवाडाच्या उंच, सुंदर शिखरांवरून उड्डाण करणे हा एक पायलट म्हणून निश्चितच एक थरारक अनुभव आहे, परंतु त्यामधून सुरक्षितपणे नेव्हिगेट करणे अवघड असू शकते. वैविध्यपूर्ण भूप्रदेश, पॉप-अप वादळ प्रणाली आणि बर्याचदा वातावरणातील भारी अशांतता ही सर्व आव्हाने आहेत ज्यांचा विचार करणे आवश्यक आहे.
कमीत कमी काही काळ हरवलेले वैमानिक, विशेषत: ज्यांना माउंटन फ्लाईंगचा अनुभव नाही, ते या भयंकर परिणामांमुळे भारावून गेले किंवा दिशाहीन झाले असे मानणे वावगे ठरणार नाही.
पायलटला असलेल्या अनुभवांमधली त्रुटी हे क्रॅशचे प्रमुख कारण असू शकते. तसेच जवळच्या पॅसिफिक महासागरातून वेगाने जाणारे वारे वारंवार उंच डोंगराच्या बाजूने वाहतात, ज्यामुळे ‘पर्वत लाटा’ म्हणून ओळखली जाणारी घटना निर्माण होते.
—
- आजतागायत विज्ञानालादेखील “ही” ६ आव्हाने उलगडता आलेली नाहीत…
- “नासाच्या” एका वैज्ञानिकाने केलाय गौप्यस्फोट – चंद्रावर ‘कुणीतरी’ आहे! वाचा
—
या घटनेचा सामना करणारा पायलट सरळ आणि उंच स्तरावरील उड्डाणापासून अपरिहार्यपणे अदृश्यरित्या वर-खाली (किंवा फक्त खाली) रोलर कोस्टरवर जाऊ शकतो. पर्वतीय लाटांमुळे निर्माण होणारे ‘डाउनड्राफ्ट’ हे वारंवार, मजबूत आणि जबरदस्त असतात, ज्यामुळे वैमानिकांना अत्यंत धोका निर्माण होतो.
शेकडो फूट पटकन हरवले जाऊ शकतात आणि काही पर्वतीय लाटा आणि ली वारे हलक्या विमानाच्या, खाली असलेल्या भूप्रदेशात जाण्यापासूनच्या क्षमतेवर मात करू शकतात. यामुळे, डाउनड्राफ्ट्सचा सामना करताना बफर प्रदान करण्यासाठी वैमानिकांना भूभागापासून पुरेशी उच्च उंची राखण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. ज्यामुळे विमाने क्रॅश होतात किंवा गायब होतात.
नेवाडा त्रिकोणाचे रहस्य हे काही कोणते सरकारी षड्यंत्र किंवा एलियन लोकांचे रहस्य अथवा स्पेस टाइमपोर्टल नाही, तर या गायब होणाऱ्या बहुतांश घटनांचे श्रेय वैमानिकाच्या अनुभवातील त्रुटी, आव्हानात्मक भूप्रदेश आणि अनपेक्षित, जलद-बदलत्या हवामानाच्या घटना कारणीभूत आहे.
फॉसेटच्या बाबतीत, एनटीएसबीने असा निष्कर्ष काढला की त्याला ~४०० mph च्या लक्षणीय डाउनड्राफ्टचा सामना करावा लागला, जो त्याच्या डेकॅथलॉनच्या क्षमतेवर मात करण्यासाठी पुरेसा होता.
फोसेटचा शोध घेताना आठ नवीन क्रॅश साइट्स शोध कर्त्यांना सापडल्या ज्या हे दाखवत होत्या, की हवामानातील सतत होणारे बदल आणि पर्वतीय वातावरणातील अनिश्चितता हेच कारण असावे विमाने गायब होण्यामागे, जे नेवाडा ट्रँगलला अधिकाधिक गूढ बनवते..
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.