आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
झुक – झुक गाडी म्हणुन लहानपणीच आपल्याला रेल्वेची ओळख करून दिली जाते.
मग धुरांच्या रेषा, तिची लांबी, तिचा वेग ही माहिती रेल्वेबद्दलच्या आकर्षणात भर घालते.
रेल्वे बघुन टाळ्या पिटणाऱ्या, तिला टाटा करणाऱ्या प्रत्येक लहानग्याला रेल्वेमध्ये सफर करायची असते. मोठी माणसे सुद्धा रेल्वेप्रवासाला प्राधान्य देतात.
रेल्वेतुन अनुभवता येणारे निसर्गसौंदर्य आणि आरामदायी प्रवासामुळे रेल्वेचा प्रवास सुखकारक वाटतो.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
पण जर सर्वांना आकर्षण असणार हा प्रवास धडकी भरवणारा असेल तर? रेल्वेत बसुन आपण संकटात सापडलो की काय असे वाटत असेल तर?
जगात असे कितीतरी रेल्वे मार्ग आहेत,जे खूपच धोकादायक आहेत.
यातील काही मार्ग डोंगरातून जातात तर काही बोगद्यातून जातात. आज आपण जाणून घेऊ अशाच १० धोकादायक रेल्वे मार्गांची माहिती.
१. कुरांडा सीनिक रेल्वे, ऑस्ट्रेलिया
आजपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनात कित्येकदा रेल्वेने प्रवास केला असेल.
खूप वेळा तुम्हाला तुमच्या प्रवासात रोमांचकारी अनुभव आला असेल, पण तुम्ही आतापर्यंत अश्या रेल्वेने प्रवास केला आहे का, ज्याने तुम्हाला मृत्यूच्या जवळ नेऊन जीवनाचे महत्त्व पटवून दिले आहे?
कदाचित तुमचे उत्तर नकारार्थी असेल.
परंतु जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या या रेल्वे मार्गावर तुम्ही प्रवास कराल तेव्हा नक्कीच तुम्हाला भीती वाटेल.
या मार्गाच्या जवळ एक विशाल धबधबा आहे. जेव्हा रेल्वे या मार्गावरून जाते तेव्हा धबधब्याचे पाणी लोकांना अगदी ओलचिंब करून टाकते आणि हा अनुभव हृदयात धडकी भरवणारा असतो.
२. आर्गेा गेडे ट्रेन रेल्वेरोड, इंडोनेशिया
हा रेल्वे मार्ग इंडोनेशियाची राजधानी जकार्ता मध्ये आहे.
हा मार्ग घाटामधून आणि नदीमधून जातो. याच मार्गावर २००२ साली भयानक अपघात देखील झाला होता.
३. एसो मिनामी मार्ग, जपान
–
- “रेल्वे-रुळांच्या” आवाजातील बदलावरून संभाव्य अपघात टाळणाऱ्या अवलियाची कहाणी!
- रेल्वे चुकली? आरक्षणाचे पैसे परत मिळवण्याची ‘स्टेप बाय स्टेप’ प्रक्रिया…
–
हा रेल्वे मार्ग जपानमध्ये मिनामिआसो शहरात बनवला आहे.
१७.७ किलोमीटर लांब या रेल्वे मार्गाचे निर्माण सन १९२८ मध्ये केले गेले होते. या रेल्वे मार्गावर एकूण ९ स्थानके आहेत.
दोन डोंगरांमध्ये जो पूल बनवला गेला आहे तो खूप जुना आहे.
४. चेन्नई – रामेश्वरम रेल्वे मार्ग
भारतात सुद्धा या प्रकारचे धोकादायक रेल्वे मार्ग आहेत.
असाच एक रेल्वेमार्ग चेन्नई पासून रामेश्वरम पर्यंत जातो. हा रेल्वेमार्ग समुद्र तळावर बनवला गेला आहे.
समुद्राचे पाणी वाढल्यावर या मार्गावर रेल्वे कितीतरी वेळा पाण्याला चिरत पुढे जाते.
५. कंबर्स आणि टोलटेक रेल्वेमार्ग, न्यू मेक्सिको
न्यू मेक्सिको मधील हा रेल्वे मार्ग खूप जुना आहे.
सन १८८० च्या नंतर रेल्वेसाठी हा मार्ग प्रवासात काटे पसरवल्यासारखा आहे. रुळांची उंची जास्त आहे आणि आकारपण वेगळ्या प्रकारचा आहे.
६. जार्जटाऊन लूप रेल्वेमार्ग, कोलोराडो
अमेरिकेतील कोलोराडो मध्ये हा रेल्वेमार्ग बनवला गेला आहे.
ह्या रेल्वेमार्गाला दोन डोंगरांना जोडण्यासाठी बनवले गेले आहे. खाली हजार फूट खोल दरी आणि वर धूर सोडणारी रेल्वे सर्वाना रोमांचीत करते.
७. आउटेनिक्वा रेल्वेमार्ग, दक्षिण अफ्रीका
हा रेल्वे मार्ग दक्षिण अफ्रीका मध्ये आहे आणि हा मार्ग तुम्हाला ऑटेनिक्वा ट्रान्सपोर्ट म्यूझीयम पर्यंत प्रवास करवतो.
खाली वाहणारी नदी आणि वरती धावणारी रेल्वे कितीतरी धोकादायक मार्गांवरून प्रवास करते. लोकांना या रेल्वेमधून प्रवास करताना भीती वाटली नाही तरच नवल.
८. द डेथ रेल्वे, थाइलंड
नावावरूनच या रेल्वे प्रवासाची भयानकता लक्षात येते.
ह्या मार्गाला बर्मा रेल्वे नावानेही ओळखले जाते. सन १९४७ मध्ये या मार्गाला बंद करण्यात आले होते. पण १९५७ मध्ये या मार्गाला तात्काळ चालू करण्यात आले.
–
- रेल्वेचं “कन्फर्म बुकिंग” मिळवण्याचे सोपे उपाय
- “यात्रीगण कृपया ध्यान दे…”, रेल्वे platform वर ऐकू येणारा हा आवाज कुणाचा आहे?
–
९. ट्रीन ए लास न्यूब्स, अर्जेंटीना
ट्रीन ए लास न्यूब्स हा सुंदर रेल्वेमार्ग अर्जेंटीना मध्ये आहे.
तुम्हाला आश्चर्य वाटेल की, हा मार्ग एकूण २१ बोगद्यांनी आणि १३ पुलांवरून जातो. कितीतरी वेळा एवढी वळणे येतात की रेल्वे एखाद्या सापाप्रमाणे रुळांवर फिरल्यासारखी वाटते.
१०. व्हाइट पास आणि यूकॉन मार्ग, अलास्का
हा रेल्वेमार्ग अमेरिका प्रांतातील अलास्का मध्ये बनवला गेला आहे. या मार्गाचा विशेष भाग हा आहे की हा मार्ग बर्फाच्या प्रदेशातून जातो.
कधी संधी मिळाली तर या रोमांचकारी सफरींचा अनुभव घ्यायला विसरू नका!
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.