Site icon InMarathi

एका मराठी माणसाने सांभाळले होते RBI चे गव्हर्नर पद, जाणून घ्या RBI बद्दल अश्याच काही रंजक गोष्टी!

RBI-marathipizza00

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

 

भारतीय रिजर्व बँक (आरबीआई) देशाच्या बँकिंग प्रणालीला हाताळते. सामान्यत: रिजर्व बँकतर्फे केलेल्या रेपो रेट बदलाच्या आधारावरच व्यावसायिक बँक सर्व प्रकारच्या कर्जाचे व्याजदर ठरवते. चलन प्रणाली सुद्धा आरबीआई अंतर्गत येते. याव्यतिरिक्त आरबीआई बँकिंगशी जोडलेल्या इतर कामाचे व्यवस्थापन करते. हेच कारण आहे की रिजर्व बँकेला ‘बँकांची बँक’ म्हटले जाते.

examveda.com

 

१. डबल मोहर वरून घेतला आहे आरबीआईचा लोगो

रिजर्व बँक ऑफ इंडियाचा जो लोगो आहे, तो ईस्ट इंडिया कंपनीच्या डबल मोहर सारखा बनवण्यात आला आहे, ज्यामध्ये थोडासाच बदल केला आहे.

quora.com

 

२. पूर्वी होती एक खाजगी संस्था,आता सरकारी

रिजर्व बँक पहिल्यांदा एक खाजगी संस्था म्हणून १ एप्रिल १९३५ ला स्थापन करण्यात आली होती, परंतु आता ही सरकारी संस्था आहे. ह्या केंद्रीय बँकेचे राष्ट्रीयकरण १९४९ सालापर्यंत नव्हते झाले होते.

 

३. आर्थिक वर्ष १ जुलै ते ३० जून

भारताचे आर्थिक वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च पर्यंत असते, पण रिजर्व बँक ऑफ इंडियाचे आर्थिक वर्ष १ जुलै पासून सुरु होऊन ३० जूनला संपते.

 

४. फक्त चलनातील नोटा छापतात

रिजर्व बँक ऑफ इंडिया फक्त चलनातील नोटांची छपाई करते आणि नाणी बनवण्याचे काम भारत सरकार कडून केले जाते.

 

५. उडेशी होत्या पहिल्या महिला डेप्यूटी गव्हर्नर

केजे उडेशी रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला डेपुटी गव्हर्नर बनल्या. त्यांना २००३ सालामध्ये ह्या पदासाठी निवडण्यात आले.

economictimes.indiatimes.com

 

६. ५ आणि १० हजाराच्या नोटा देखील छापल्या होत्या

रिजर्व बँकेने ५००० आणि १०००० रुपये किमतीच्या नोटा १९३८ सालामध्ये छापल्या होत्या. त्यानंतर १९५४ आणि १९७८ मध्येही ह्या नोटांची छपाई करण्यात आली होती.

 

७. पाकिस्तान आणि म्यानमार यांची सेंट्रल बँक म्हणून काम पाहिले होते

भारत व्यतिरिक्त रिजर्व बँकने अजून दोन देश पकिस्तान आणि म्यानमारच्या सेंट्रल बँकेची भूमिका बजावली आहे. आरबीआई ने जुलै १९४८ पर्यंत पाकिस्तानच्या आणि एप्रिल १९४७ पर्यंत म्यानमारच्या सेंट्रल बँकेची भूमिका बजावली होती.

 

८. हिल्टन यंग कमिशनच्या आधारावर झाली स्थापना

भारतामध्ये केंद्रीय बँक म्हणजेच रिजर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना हिल्टन यंग कमिशन अहवालाच्या आधारावर केली गेली होती.

tapmiquizclub.wordpress.com

 

९. आरबीआई मध्ये २ नंबरच्या श्रेणीचे कर्मचारी नाहीत

रिजर्व बँक ऑफ इंडिया मध्ये दुसऱ्या श्रेणीचे कर्मचारी नाहीत. यामध्ये १७ हजार श्रेणी-१, श्रेणी-३, श्रेणी-४ चे कर्मचारी आहेत.

 

१०. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह गव्हर्नर होते

मनमोहन सिंह एकमात्र असे पंतप्रधान होऊन गेले, ज्यांनी रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नर पदाचा कार्यभार सांभाळला होता.

 

११. देशमुख आरबीआईचे पहिले भारतीय गव्हर्नर

सीडी देशमुख पहिले असे भारतीय होते, ज्यांनी आरबीआईच्या गव्हर्नर पदाचा भार सांभाळला होता आणि ते रिजर्व बँक ऑफ इंडियाचे तिसरे गव्हर्नर बनले. ह्या व्यतिरिक्त १९५१-५२ सालात अंतरिम बजेट मध्ये ते भारताचे वित्त मंत्री होते. देशमुख बँकेचे राष्ट्रीयकरण करण्याच्या विरोधात होते.

thebetterindia.com

 

१२. आरबीआई मुख्यालयात मॉनिटरी म्युझीयम

रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या मुंबई मध्ये असलेल्या मुख्यालयात मॉनिटरी म्युझीयम (मौद्रिक संग्रहालय) आहे.

 

१३. देशभरात आरबीआईच्या एकूण २९ शाखा आहेत

रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या देशभरात एकूण २९ शाखा आहेत. यामधील बहुतांश शाखा या प्रत्येक राज्यांच्या राजधानीत आहेत.

livemint.com

अश्या या RBI बद्दलच्या रंजक गोष्टी तुम्ही तर जाणून घेतल्यात, आता त्या इतरांनाही कळू द्या, यासाठी हा लेख जास्तीत जास्त शेअर करा!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Exit mobile version