आणि दिल्लीतील त्या तरुणीने सलमानच्या कानशिलात लगावली…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
प्रसिद्धीचं वलय मागे असलेला प्रत्येक माणूस काही विनम्र नसतो. किंबहुना, असे फार लोकप्रिय असलेले चेहरे बऱ्याचदा त्यांचा अहंकार, राग यांसारख्या स्वभावदोषांमुळेही लोकांना माहीत असतात. त्यांच्यावर वेड्यासारखं प्रेम करणारा एक मोठा चाहतावर्ग त्यांना लाभलेला असल्यामुळे त्यांचे हे दोष, वादग्रस्त आयुष्य नजरेआड करून लोक त्यांच्यावर आधीइतकंच प्रेम करत राहतात.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खान त्याच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमुळे आणि वर्षानुवर्षांच्या स्टारडममुळे जसा लोकप्रिय आहे तसाच त्याच्या काळवीट शिकार प्रकरण, हिट अँड रन प्रकरण यासारख्या कॉंट्रोव्हर्सीज आणि त्याच्या रागीट स्वभावामुळेही लोकांना माहीत आहे. पण, कधीकधी आपल्या मनात एखाद्या माणसाची, विशेषतः एखाद्या सेलिब्रिटीची जी एक प्रतिमा तयारी झालेली असते त्यापेक्षा काहीसं वेगळं ती व्यक्ती वागली तर नक्कीच आश्चर्य वाटतं.
मानवी स्वभाव हा गुंतागुंतीचा, चमत्कारिक आणि तरीही गंमतीशीर आहे. अगदी शांत शांत दिसणारी व्यक्ती एखाद्या क्षणी, एखाद्या प्रसंगी विश्वास बसणार नाही इतकी मनावरचा ताबा सोडून वागू शकते तर एखादा फारच रागीट म्हणून माहीत असलेला मनुष्य एखाद्या अतिशय परीक्षा पाहणाऱ्या प्रसंगी प्रचंड संयम दाखवून आजूबाजूच्या माणसांना चकीत करतो. सलमान खानच्या बाबतीतही हे असेच काहीसे झाले होते.
–
- प्रेमभंग झाल्यावर सलमानने चक्क ऐश्वर्याच्या डुप्लिकेटलाच सिनेमात घेऊन तिचं करिअर घडवलं
- कतरीनाला मिळाला नकार ,आणि मग ती सलमान जवळ जाऊन ढसाढसा रडली….
–
नेमकं काय घडलं?
२००९ सालची ही घटना आहे. दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये संजना जोन यांनी एक फॅशन शो आयोजित केला होता. त्या फॅशन शो नंतर तिथे एक खाजगी पार्टी सुरू होती. त्यावेळी त्या पार्टीत सलमान खान, सोहेल खान, सुश्मिता सेन, तिचा भाऊ राजीव, राईमा आणि रिया सेन, अमान आणि अयान अली खान, शिबानी कश्यप, विजेंदर सिंग आणि आणखी काही बॉलिवूडचे तारे तारका उपस्थित होते.
दिल्लीतल्या एका बिल्डरची मुलगी मोनिका दारू पिऊन नशेत असताना तिच्या एका मित्राबरोबर जबरदस्तीने त्या पार्टीच्या स्थळी पोचली. स्वतःवरचा ताबा पूर्णपणे सुटून ती बेभान झाली होती, शिवीगाळ करत होती. सोहेल खानने त्यावेळी तिथल्या सुरक्षा रक्षकांना तिला आत येऊ देऊ नका असे सांगितले. चाललेला सगळा गोंधळ ऐकून मोनिका जिथे हा सगळा तमाशा करत होती तिथे सलमान येऊन पोचला.
मोनिकाने सुश्मिता सेनला शिवीगाळ करायला सुरुवात केली. सुश्मिता सेन खेरीज सलमानचा भाऊ सोहेल खान, शिबानी कश्यप, विजेंदर सिंग यांनाही तिने तिच्या तशा अतिशय घृणास्पद वागणुकीने नाहक त्रास दिला. हा सगळाच प्रकार अतिशय कल्पनेच्या पलीकडचा आणि निंदनीय होता. या अचानक घडलेल्या प्रकारातही सलमान खान शांत राहिला.
अतिशय संयम ठेवत त्याने शांतपणे त्या मुलीला बाहेर जायला सांगितलं. हे सगळं होऊनही आतातरी तिने ताळ्यावर येऊन चुपचाप तिथून काढता पाय घ्यायला हवा होता. पण इतकं होऊनही तिची शिरजोरी काही कमी झाली नाही आणि तिने सलमानच्याच कानशिलात लगावली.
आश्चर्याची बाब ही की एरव्ही ‘अँग्री यंग मॅन’ अशी जनमानसात प्रतिमा असणारा सलमान तिने त्याला कानाखाली खेचल्यावरही शांतच होता. त्याने सुरक्षा रक्षकांना तिला बाहेर घेऊन जायला सांगितले.
या सगळ्या तमाशामुळे तिथे लोकांची प्रचंड गर्दी जमली होती. भर पार्टीत हे असे काहीतरी घडणे धक्कादायक होते. माणसं अशी कशी काय वागतात, एखाद्याच्या अतिशय चुकीच्या वर्तनाची हद्द कुठपर्यंत जाऊ शकते या सगळ्याचा विचार करून करून बुचकळ्यात पाडायला टाकणारे हे सगळे होतेच. पण, त्याहूनही अधिक चकित करणारे आणि सलमानच्या चाहत्यांना सुखद धक्का देणारे होते इतक्या वाईट परिस्थितीतही त्याने स्वतःचा भावनिक उद्रेक होऊ न देता अतिशय प्रगल्भपणे सगळी परिस्थिती हाताळणे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.