Site icon InMarathi

बच्चे कंपनीचा लाडका सांताक्लॉज फक्त लाल रंगाचेच कपडे का घालतो?

santa final inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आज मानवी आयुष्यात रोजच्या जगण्यातील गोष्टींना महत्व असते, त्यातीलच एक गोष्ट म्हणजे रंग, अगदी कपड्यांच्या रंगांपासून ते घरच्या रंगांपर्यंत माणूस या बाबतीत खूपच चोखंदळ असतो. कोणता रंग कोणता मूड दर्शवतो त्यापध्दतीची प्रकाश योजना या गोष्टी आपल्याला  इंटीरियर डिझायनर मंडळींकडून ऐकायला मिळतात.

रंगांचं सर्वात महत्व जाणतो तो चित्रकार आणि रंगारी जे आपल्या घरांना रंगवून आपले आयुष्य कलरफुल करून टाकतात. चित्रकार आपल्या शैलीतून कॅनवासवर रंगांची जादू निर्माण करतात तर अभिनेते मानवी स्वभावातील रंगांचे चित्रण आपल्या अभिनयातून दाखवतात.

 

 

रंगाचं महत्व जाणारे सर्वात जास्त कोण असतील तर मोठमोठाले ब्रँड असणाऱ्या कंपन्या, आज प्रत्येक ब्रँडचा असा एक स्वतःचा विशिष्ट रंग असतो. नुसतं डॉमिनोज म्हंटल की आपल्यासमोर पिझ्झा ऐवजी सर्वात प्रथम गोष्ट  येते ती म्हणजे निळ्या आणि लाल रंगांची रंगसंगती असलेला  त्यांचा लोगो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

प्रत्येक ब्रँडने आपापल्या प्रॉडक्टनुसार रंग दिलेआहेत. अगदी आपल्या सणांनादेखील रंगांचे महत्व आहे, आज ख्रिसमस असल्याने अनेक ख्रिश्चन घरांमध्ये उत्साहाचे वातावरण असतात. घरात छानशी सजावट, केक्सचे वेगवेगळे प्रकार, गिफ्ट्स यांनी पूर्ण घर भरून जाते.

ख्रिसमसमध्ये बच्चे कंपनीची आवडती गोष्ट म्हणजे सांताक्लॉज, बच्चे कंपनीला ख्रिसमसच्या आधी भरपूरसारी गिफ्ट्स देणारा हा सांता कायम लाल रंगात का असतो? असा प्रश्न अनेकांना पडत असेल तर आज आपण जाणून घेणार आहोत यामागचे कारण…

 

 

सांताक्लॉज लाल कपड्यात का असतो?

सांताक्लॉज म्हंटल की लाला रंगाचे कपडे घातलेला पंडहरी दाढी असलेला असा वयोवृद्ध माणूस साधारण अशीच एक प्रतिमा  निर्माण झाली आहे, मात्र ही प्रतिमा निर्माण केली असेल? तर ही संकल्पना जगात सर्वप्रथम आणली ती कोका कोला कंपनीने, बसला ना आश्चर्यचा धक्का?

ही गोष्ट जवळपास ९० वर्ष जुनी आहे म्हणजे १९३० सालातील जेव्हा कोकाकोला ब्रँड आपले प्रस्थ निर्माण करत होता. आज जे दिग्गज ब्रँड बनले आहेत ते साधारण याचकाळात उदयास आले आहेत. तर ख्रिसमस हा सण येतो डिसेंबर महिन्यात, आज आपण भारतात राहत असल्याने आपल्याकडे थंडीचे प्रमाण इतर देशांच्या मानाने कमी असते.

 

 

यूरोप, अमेरिका, रशिया सारख्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फ़वृष्टी होत असल्याने साहजिकच तिकडची लोक थंड पेय सोडून गरम गरम सूप्स सारख्या पदार्थांचे सेवन करणार, या दिवसांमध्ये आपले उत्पादन कमी होणार परिणामी धंदा कमी त्यामुळे कोका कोलाने यावर शक्कल लढवली.

कोका कोला कंपनीनें एका कार्टूनिस्टला हायर करून त्याच्याकडून सांताक्लॉजचे चित्र काढून घेतले आणि ते आपल्या जाहिरातीत वापरले आणि त्यात आपल्या कंपनीचा रंग लाल असल्याने या सांताला सुद्धा लाल रंगातच ठेवेले, हा सगळं खटाटोप करण्यामागे एकच उद्दिष्ट होते ते म्हणजे लोकांनी थंडीच्या दिवसात सणांमध्ये कोकचा आस्वाद घ्यावा. त्यांची ही खेळी प्रचंड हिट ठरली. 

 

LawStreet Journal

१९३१ च्या आधी सांता बद्दलची प्रतिमा फार वेगळी होती, काही ठिकाणी एक उंच माणूस तर काही ठिकाणी गडद रंगातील माणूस तर काहीजणांच्या मते सांताचा रंग हिरवा होता. मात्र गेली जवळजवळ अनेक वर्ष कोका कोलामुळे आपल्या मनात सांताबद्दलची प्रतिमा इतकी फिट बसली आहे की आता वेगळ्या रंगातील सांता आपण पटकन स्वीकारणार नाही.

निसर्गाच्या अनेक चमत्कारांपैकी एक म्हणजे रंग, हे रंग जर आपल्या आयुष्यात नसते तर आपलं आयुष्य बेरंग बनून गेलं असतं. आपला आयुष्य रंगीत करणाऱ्या या रंगांना मात्र आपण धर्माच्या बंधनात अडकून ठेवले आहे. हा रंग अमुक अमुक एका जातीचा धर्माचा असे वर्गीकरण केले आहे, असे न करता सगळ्या रंगांना आपण आपल्या आयुष्यात स्थान दिले पाहिजे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version