Site icon InMarathi

तुम्हीही तुमच्या स्वप्नाला गवसणी घालणार का? फक्त कॉफी विकून उभं झालंय अवाढव्य साम्राज्य!

coffee story Feature Inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

व्यवसायात चढ उतार येतच असतात.

पण एक वेळ अशी येते की त्यावेळी तुम्ही जो निर्णय घ्याल तो निर्णय तुमचं आयुष्य बदलून टाकतो. याला आपण कधी कधी “नशीबाने दार ठोठावणे” असेही म्हणतो.

कधी कधी नशीब पण एखाद्याला भरभरून द्यायला येतं, पण त्याच्याकडे घ्यायला काहीच नसतं.

तर दुसरीकडे तुम्ही एक वडापावची अपेक्षा करावी आणि नशिबाने प्रसन्न होऊन ८-१० गुलाबजामून फेकून मारावे अशी अवस्था असते.

आज तुम्हाला एका सत्य घटनेवर आधारीत अशीच एक स्टोरी सांगतो. कॉफीचा कप घेऊन आरामखुर्चीत किंवा गॅलरीमध्ये बसून ह्या स्टोरीचा आस्वाद घ्या!

 

forbes

 

ही स्टोरी आहे एका यशस्वी व्यावसायिकाची.

व्यवसायामध्ये दोन प्रकारचे लोक असतात, एक प्रकार असतो तो म्हणजे ‘जे आहे त्यात समाधान मानून जगायचं, जास्तीची अपेक्षा करायची नाही. (थोडक्यात रीस्क घ्यायची नाही)’

दुसरा प्रकार असतो तो म्हणजे ‘सतत नवीन काहीतरी करायचं, वेगळ्या वाटा धुंडाळत रहायचं, धडपडायचं. (थोडक्यात रिस्क घेणारे)’.

ह्या स्टोरीची अशी

हावर्ड शुल्ज़ आणि गार्डन बॉकर, जेरी बोल्डवीन, आणि जेव सीग यांची. ही स्टोरी आहे स्टारबक्सच्या उत्पत्तीची आणि कॉफी साम्राज्याची.

१९५३ मध्ये हावर्ड शुल्ज़ हा न्यूयॉर्क मधील ब्रूकलीन भागात एका गरीब ज्यू कुटुबांत जन्माला आला. घरची परस्थिती गरिबीची असल्याने लहान वयातच तो पेपर टाकणे, हॉटेलमध्ये काम करणे अशी छोटी मोठी कामे करत असे.

तो फूटबॉल चांगले खेळायचा, स्पोर्ट्समुळे स्कॉलरशीप मिळाली आणि त्याच्यासाठी उच्च शिक्षणाचे दरवाजे उघडे झाले. घराण्याच्या इतिहासातील एकमेव ग्रेजुएट असा हा हावर्ड शुल्ज़ १९७५ मध्ये “झेरॉक्स ” ह्या कंपनीत कामाला लागला.

 

 

या कंपनीत सेल्स आणि मार्केटिंगचे त्याने ४ वर्ष काम केले. याच दरम्यान त्याचं शौरी नावाच्या मुलीशी लग्नही झालं होतं.

त्यानंतर हावर्ड झेरॉक्स कंपनी सोडून “हैमरप्लास्ट” ह्या स्वीडिश कंपनीत जॉबला लागला होता. ही कंपनी स्वयंपाक घरातील उपकरणे बनवत असत. इथं मेहनतीने नोकरी करत तो अल्प कालावधीत अमेरिका प्रभाग प्रमुख झाला.

मस्त अशी मोठी नोकरी, रग्गड पैसा, प्रेमळ पत्नी आणि एक सुखी आयुष्य याशिवाय एखाद्याला आणि काय हवं असतं?

पण हावर्डची यशोगाथा इथंच थांबली नाही. आता तर त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळणाऱ्या वळणावर तो येऊन पोहचला होता.

सीएटल स्थित एक छोटी “स्टारबक्स कॉफी, टी अँड स्पाइस कंपनी” ही हैमारप्लास्ट कंपनीकडून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कोन फिल्टर्स विकत घेतं असत.

ही कंपनी नक्की एवढ्या फिल्टर्सचं करते तरी काय हे बघायला तो एकदा स्टारबक्स ह्या कंपनीत उत्सुकतेपोटी सीएटल गेला.

१९७१ ला सुरु झालेली स्टारबक्स ही दहा वर्षाची छोटी कंपनी होती. ही फक्त सीएटल राज्यात आपला व्यवसाय करत असत.

तीन मित्र म्हणजे लेखक गार्डन बॉकर, इंग्रजी शिक्षक जेरी बोल्डवीन, आणि इतिहास शिक्षक जेव सीगी यांनी ह्या स्टारबक्सची स्थापना केली होती. त्यावेळी ही कंपनी फक्त कॉफीच्या बी(Bean’s) विकायची .

 

business insider

 

हावर्डला ही कंपनी बघताक्षणी आवडली. काही दिवसात संस्थापकांसोबत ओळखी झाल्यानंतर हावर्डने स्टारबक्स मध्ये नोकरी करण्याची इच्छा बोलून दाखवली. स्टारबक्सचे संस्थापक सुद्धा नोकरी देण्याकरीता राजी झाले.

अश्याप्रकारे हावर्ड स्टारबक्सचा रिटेलचा डायरेक्टर झाला. हावर्डने स्टारबक्स मध्ये जबरदस्त अशी कामगिरी सुरु केली.

१९८३ मध्ये कंपनीच्या कामानिमित्त हावर्ड मिलान (इटली) येथे गेला होता. तिथे त्याने पहिल्यांदा “कॉफी बार” पहिला. तो व्यवसाय पाहून त्याने स्टारबक्समध्ये सुद्धा अशी कॉफी ड्रिंक देता येणं शक्य आहे का याची पडताळणी सुरु केली.

असे कॅफेबार फक्त कॉफी पिण्याचे ठिकाण नसून लोक एकत्र येऊन गप्पा मारतात, एकमेकांना भेटतात. अमेरिकेमध्ये अश्या पद्धतीचा कॅफेबार चेन व्यवसाय कोणाचाच नव्हता. हार्वडला ह्या मध्ये मोठा व्यवसाय दिसत होता.

स्टारबक्स आतापर्यंत केवळ कॉफी बी विकत होती, त्यातच जर छोटासा कॉफी बार सुरु केला तर कंपनी मोठी कामगिरी करेल अशी त्याची मनीषा होती.

अमेरिकेला पोहचताच त्याने कॉफी बार काढण्याची कल्पना संस्थापकांना सांगितली. ह्या कल्पनेवर संस्थापक एवढे खुश नव्हते, त्यांचं म्हणणं होतं की स्टारबक्स एक कॉफी बी विकणारी कंपनीचं राहू द्यावी.

पण हावर्डच्या प्रबळ इच्छेपुढे त्यांनी एका शॉपमध्ये कॉफी ड्रिंक बार सुरु करण्याची परवानगी दिली. हळू हळू स्टारबक्सची कॉफी लोकांना आवडू लागली, काही दिवसातच शेकडो लोक कॉफीसाठी स्टारबक्सला भेट देऊ लागले.

हावर्डच्या अपेक्षेनुसार त्याला ह्या व्यवसायात मोठी बाजारपेठ दिसू लागली.

पण एवढं होऊनही स्टारबक्सच्या संस्थापकांचं हेच म्हणणं होतं की,

स्टारबक्स ही एक कॉफी बी विकणारी कंपनी राहू द्यावी. उगाच मोठी कंपनी करून डोक्याला ताप करून घायला नको, आहे तो व्यवसाय ठीक आहे. कॉफी ड्रिंक्स बंद करायला हवं.

 

bluesky.chicagotribune.com

 

हावर्डला कॉफी ड्रिंक बारचा व्यवसाय खुणावत होता. त्याने लागलीच स्टारबक्सला राजीनामा दिला आणि स्वतःची “टू गिओरनॅल ” अशी कॉफी ड्रिंकची चेन बार सुरु केली. हा कॉफी बार खूपच लोकप्रिय झाला.

पुढे १९८७ मध्ये स्टारबक्सचे संस्थापक त्यांची कंपनी विकत आहेत अशी खबर हावर्डला मिळाली, मग त्यानेच पुढे चक्रे फिरवली आणि स्टारबक्स विकत घेतली.

ह्या काळात स्टारबक्सची ११ स्टोअर्स होती आणि हावर्डची स्वतःची ६ स्टोअर्स अशी एकूण १७ कॉफी स्टोअर्स त्याच्याकडे होती.

हावर्ड म्हणायचा की,

आम्ही फक्त कॉफी विकत नाही, आम्ही अनुभव विकतो, असा अनुभव की लोक स्टारबक्समध्ये सारखे सारखे येतील.

 

computer world

 

लोकांना आरामदायी कित्येक तास बसून तिथे कॉफी घेत गप्पा गोष्टी करता याव्यात म्हणून कॅफेची रचनाही त्याने तशी बनवली होती.

लोकांच्या समक्ष कॉफी बी रोस्ट करून कॉफी बनवून देऊ लागला, कॉफी बनवण्याची पद्धत एकसारखी ठेऊ लागला ज्यामुळे लोकांना नेहमी त्यांची मनपसंत कॉफी मिळू लागली.

स्टारबक्स मधील कर्मचाऱ्यांना तो पार्टनर्स बोलायचा.

त्याने सर्व कर्मचाऱ्यांचे हेल्थ इन्शुरन्स काढून दिले होते. स्टारबक्स दरवर्षी जवळपास ३० करोड डॉलर्स हे फक्त कर्मचाऱ्यांच्या हेल्थ इन्शुरन्सवर खर्च करते. हा खर्च त्यांच्या मुख्य रॉ मटेरियल कॉफी बी वर केले गेलेल्या खर्चापेक्षा कित्येक जास्ती आहे.

१९९२ मध्ये स्टारबक्सचा IPO आणला गेला आणि ही अपनी पब्लिक लिमिटेड कंपनी झाली. तिथून ह्या कंपनीने मागे वळून पाहिले नाही.

 

change.org

 

पुढच्या ८ वर्षात त्यांनी शेकडो कॅफे सुरु केले, दर वर्षी नवीन मार्केट, नवीन देशात त्यांनी आपला व्यापार वाढवला.

१९९२ मध्ये स्टारबक्सचे १६५ कॅफे होते, तेच १९९९ मध्ये कॅफेची संख्या २४९८ झाली होती. यावरून तुम्ही कंपनीचा विस्तार कसा झपाट्याने होत गेला याचा अंदाज बांधू शकता.

२००० साली जेव्हा कंपनीचे ३५०० कॅफे झाले, तेव्हा हावर्डने रिटायर्ड होण्याचा निर्णय घेतला आणि “ओरिम स्मिथ” याला कंपनीचा सीईओ बनवून सगळी जबाबदारी त्याच्याकडे सोपवून स्वतः चेअरमन झाला. इथेच त्याने चूक केली.

हावर्ड बाजूला झाला तसा कंपनी आपल्या मुख्य उद्दिष्टापासून दूर जाऊ लागली. शेअर मार्केटमध्ये अग्रेसर होण्याच्या दृष्टीने दरवर्षी कॅफेची संख्या तर वाढू लागली पण कॉफीची गुणवत्ता आणि ग्राहकांची सेवेची गुणवत्ता ढासळू लागली.

नुकसान होण्याची कल्पना असून सुद्धा नवीन कॅफे उघडण्यात आले. कंपनीने कॉफी सोबतच खाद्य पदार्थाच्या सेगमेन्टमध्ये शिरकाव केला. सोबत म्यूजिक सीडी सेगमेन्टही सुरु केला जो की त्यांच्या व्यवसायाच्या पूर्णतः वेगळा व्यवसाय होता.


यामुळे कंपनीच लक्ष मुख्य उद्दीष्टापासून दूर होत गेलं. याच काळात टेक्नॉलॉजी वाढली, सोशल मीडिया झपाट्याने वाढला, प्रतिस्पर्धी वाढत गेले त्यामुळे कंपनीचा व्यवसाय मार्जिन कमी होत गेला.

२००७ मध्ये स्टारबक्स कंपनीचे १५००० कॅफे असून सुद्धा या कंपनीचे आर्थिक आकडे गडगडायला लागले आणि असे वाटू लागले की आता ही कंपनी बुडीत निघणार, बंद पडणार.

तेव्हा हावर्डने क्रांतिकारक निर्णय घेतला आणि २००८ मध्ये कंपनीच्या CEO पदावर पुनरागमन केलं. पदभार स्वीकारल्या बरोबरच त्याने झटपट निर्णय घ्यायला सुरुवात केली.

सर्वात आधी त्याने १०,००० स्टोअर्स मॅनेजर लोकांना एका ठिकाणी मीटिंगला बोलावून ग्राहकांना उत्कृष्ट सेवा कशी द्यायची याचे प्रशिक्षण दिले.

त्याने स्टारबक्सचे उद्धिष्ट, उच्च गुणवत्तेची कॉफी, आणि ग्राहकांची सेवा यावर लक्ष्य केंद्रित करण्यावर भर देण्यास सांगून त्यांना आत्मविश्वास दिला.

 

entrepreneur

 

त्यानंतर हावर्डने तोट्यात चालणारे ६०० कॅफे लगेचच बंद करून टाकले. सोबत इतर कॅफेत नवीन लॅपटॉपस्, अद्यावत उपकरणे लावून घेतली.

एवढेच नाही तर त्याने जगभरातील स्टारबक्सच्या सर्व कर्मचाऱ्यांना एकत्रित तीन तास कॅफे बंद ठेऊन, परफेक्ट कॉफी कशी बनवायची याचे प्रशिक्षण दिले. हे खूपच अद्भुत होतं.

कारण एवढा वेळ कॅफे बंद करणे म्हणजे ३ तास लेबर कॉस्ट कमी होणे, जे की कित्येक लाख डॉलरचं नुकसान होतं. हावर्डने कॉफीचे काही नवीन फ्लेवर्स आणून मार्केटवर आपली पकड मजबूत केली.

अश्याप्रकारे जी कंपनी बुडत होती तिला त्याने पुन्हा जिवंत आणि यशस्वी करून दाखवली.

आज जवळपास ७२ देशात, २ लाख, ३८ हजार कर्मचारी आणि २४ हजार कॅफे सोबत हावर्डच्या नेतृत्वात ही कंपनी यशस्वीरीत्या सुरु आहे. कंपनीचं रेव्हेन्यू तब्बल २ हजार करोडच्या आसपास आहे.

भारतात टाटा समूहासोबत स्टारबक्स कंपनीने करार करून भागीदारीमध्ये स्टारबक्स कॅफे देशभर सुरु केले आहेत. काळासोबत कंपनीने स्वतःमध्ये बरेचसे बदल केलेले आहेत.

 

money.cnn.com

 

इथं सांगायचा मुद्दा हा आहे की जर तुम्ही व्यवसायाबद्दल passionate असाल आणि संधी ओळखून योग्य वेळी योग्य निर्णय घेतले तर तुम्हाला यशस्वी होण्यावाचून कोणीही अडवू शकत नाही, स्वतःही नाही.

मग तो व्यवसाय कॉफीचा असो, मसाल्याचा असो किंवा कोणताही छोटा मोठा असो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version