' ओमिक्रॉनचे पहिले लक्षण ताप किंवा खोकला नाही; प्रत्येकाच्या मनातील काळजीचं थेट उत्तर – InMarathi

ओमिक्रॉनचे पहिले लक्षण ताप किंवा खोकला नाही; प्रत्येकाच्या मनातील काळजीचं थेट उत्तर

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जगभरात कोरोनाने कहर केला आहे. नवीन वर्षाची पहाट उजाडायला आता काहीच दिवस बाकी आहेत. परंतु नाताळ सण आणि न्यू ईयर सेलिब्रेशन यावर भीतीचं सावट आहे. नवा व्हेरिएंट म्हणजेच ओमिक्रॉनमुळे ही दहशत पसरली आहे. पण काळजीचं कारण नाही, कारण ओमिक्रॉनबाबत आता नवीन माहिती समोर आली आहे.

ओमिक्रॉनची सुरुवातीची लक्षणं काय आहेत? कोणाला ओमिक्रॉनचा धोका सर्वात जास्त आहे? घरातील एका सदस्याला हा आजार झाला तर लगेच दुसऱ्याला होऊ शकतो का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं डॉक्टरांनी दिली आहेत.

 

omicron featured inmarathi

 

दक्षिण आफ्रिकेत जेव्हा हा व्हेरिएंट सापडला तेव्हात WHO ने याबाबत चिंता व्यक्त केली होती. भारतातही नाताळ आणि सुट्ट्यांच्या पार्श्वभुमीवर काही नियम आणि निर्बंध घालण्याचा विचार चालू आहे. तर आपण आपली काळजी कशाप्रकारे घेऊ शकतो ते डॉक्टरांनी सांगितले आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

डॉ एंजेलिक कोएत्जी ‘ओमिक्रॉन’ संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. एंजेलिक कोएत्जी यांनी १० महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. हे प्रश्न लोकांच्या मनात गेल्या अनेक दिवसांपासून आहेत.

 

news click

 

कुटुंबात एकाला कोरोना झाला तर इतर सदस्यांना किती धोका?

-कुटुंबातील व्यक्ती एकमेकांच्या अधिक वेळ संपर्कात येत असतात त्यामुळे कुटुंबाला संसर्ग होण्याचा धोका सर्वात जास्त आहे. उदाहरण म्हणून पाहिलं तर ७ जणांचं कुटुंब असेल त्यापैकी एकाला ओमिक्रॉन झाला तर इतर सदस्यांनाही ओमिक्रॉनच्या संसर्गाचा धोका अधिक आहे.

 

 

rti-activist-family InMarathi

 

सौम्य लक्षण असणाऱ्यांनी रुग्णालयात ॲडमिट व्हावं का?

– सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांनाही उपचाराची आवश्यकता आहे. डॉ एंजेलिक कोएत्जी यांनी याबाबत अधिक अभ्यास करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. शिवाय या रुग्णांनी तातडीनं उपचार घ्यायला हवेत.

 

govt hospital
the day after

 

ओमिक्रॉनचा सर्वाधिक धोका कुणाला?

– तुमचं वजन जास्त असेल आणि तुम्ही दोन्ही लसीचे डोस घेतले नसतील तर धोका जास्त आहे. लस घेतलेल्या स्थूल लोकांनाही ओमिक्रॉनचा धोका आहे.

 

weight gain inmarathi

 

ओमिक्रॉनची लक्षणं काय आहे?

– स्नायुंमध्ये दुखापत हे देखील ओमिक्रॉचं लक्षण आहे. कोविड १९ मध्ये ताप, सर्दी, खोकला ही प्रथम लक्षणं होती. परंतु स्नायूमध्ये वाढत जाणारं दुखणं हे ओमिक्रॉनचं पहिलं लक्षण आहे. रात्री पाठीच्या खाली कंबरे दुखणं हे देखील एक लक्षण आहे. डोकं दुखी, अंगदुखी आणि थकवा ही देखील प्रमुख लक्षणं आहेत.

 

joint pain inmarathi

बाहेर जाणं किती कठीण आहे?

-ओमिक्रॉनमुळे आपल्या फुफ्फुसांवर परिणाम होतो. लस हे त्यापासून संरक्षण देणारं कवच आहे. या नव्या व्हेरिएंटपासून वाचण्याचा पुरेपूर प्रयत्न करणं आवश्यक आहे. जर अचानक या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण वाढले तर कठोर नियमांची अंमलबजावणी पुन्हा करावी लागू शकते.

 

lungs-inmarathi
airphysio.com

 

कोरोना आणि न्युमोनिया यामध्ये काही संबंध आहे का?

-ओमिक्रॉन तुम्हा फुफ्फुसांवर हल्ला करतो. त्यामुळे श्वसनावर परिणाम होतो. अर्थात त्यामुळे न्युमोनिया होण्याचा धोका अधिक असतो. मात्र सध्या तरी याची सौम्य लक्षणं पाहायला मिळाली आहेत.

 

corona crisis inmarathi
foreign policy research institute

 

बुस्टर डोस घ्यावा का?

– हो. कोरोनाचा बुस्टर डोस घ्यावा असं सांगितलं आहे. भारताला तर बुस्टर डोस द्यावा असंही डॉ एंजेलिक कोएत्जी यांनी म्हटलं आहे.

 

vaccination inmarathi

 

लॉकडाऊन केल्याने कोरोनाचा धोका कमी होतो?

-लॉकडाऊन केल्यानं संसर्ग अटोक्यात येईल असं म्हणणं थोडं कठीण आहे. याचं कारण व्हायरस सगळीकडे आहे. त्यामुळे काळजी घेणं हाच एकमेव उपाय आहे. सण-उत्सवात अनेक लोक एकमेकांच्या संपर्कात येतात त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका जास्त आहे.

 

lockdown inmarathi

 

कठोर पावलं उचलण्याची खरी गरज केव्हा?

 

holi-festival-photos-inmarathi
festivalsherpa.com

 

-जेव्हा रुग्णालयातील रुग्णांची संख्या वाढायला सुरुवात होईल तेव्हा कठोर पावलं उचलण्याची गरज आहे.

-दक्षिण आफ्रिकेत सीरो पॉझिटिव्हीटी दर सर्वाधिक आहे. भारतात कोणत्याही क्षणी ओमिक्रॉनची लाट येऊ शकते अशी चिंताही व्यक्त केली आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?