Site icon InMarathi

मॉडेल्स आपली त्वचा नितळ कशी ठेवतात? वाचा, ही ९ सिक्रेट्स

models 1 im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपण कसे दिसतो हा भाग अनुवांशिक असला तरी सुंदर दिसणं प्रत्येकालाच आवडतं. पण आपल्या रोजच्या सामान्य आयुष्यात सुंदर दिसावंसं, छान रहावसं वाटणं आणि अत्यंत गांभीर्याने आपलं दिसणं, बांधेसूद असणं, व्यक्तिमत्त्व आकर्षक ठेवणं या गोष्टी नित्यनेमाने करणाऱ्या मॉडेल्सच्या आयुष्यात, रोजच्या जीवनशैलीत आणि आपल्या आयुष्यात आणि रोजच्या जीवनशैलीत जमीनअस्मानाचा फरक असतो.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

केवळ सुंदर दिसायला आवडतं म्हणून तसं राहायचा प्रयत्न करणाऱ्या आपल्यासारख्या माणसांना सतत सुंदर दिसण्याचा ताण मनावर वागवावा लागणाऱ्या मॉडेल्सच्या सुंदर दिसण्यामागच्या मेहनतीची माहितीही नसते. वेगवेगळे महागडे प्रॉडक्ट्स वापरायला लागणाऱ्या प्रचंड खर्चाची, फॅशन शोज साठी नेहमी कराव्या लागणाऱ्या प्रवासाची थोडक्यात त्यांच्या अत्यंत धकाधकीच्या जीवनशैलीची कल्पनाही करता येणार नाही.

इतकी सगळी काळजी घेऊनही त्यांनाही दिसण्याबाबतच्या समस्यांना फार वेळ न दवडता तोंड द्यावं लागतं. आपल्याला अशा मॉडेल्सच्या दिसण्याचं, नितळ त्वचेचं, त्याच्या स्वतःला छान कॅरी करण्याचं कुतूहल वाटतं. पण केवळ दिसण्यावर इतका खर्च करायची आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांची ऐपत नसते आणि केवळ दिसण्यावर इतकी मेहनत घ्यायची जिद्द आपल्यात नसते.

 

 

अगदी महागडे प्रॉडक्ट्स वापरले नाहीत आणि त्वचाविकारतज्ज्ञाकडे आपल्या त्वचेची काळजी घ्यायला खेटे घातले नाहीत तरी याच मॉडेल्स त्वचा नितळ रहावी म्हणून ज्या काही घरच्याघरी करू शकण्यासारख्या सोप्या गोष्टी करतात त्या करणं आपल्याला नक्कीच शक्य आहे.

आपल्याला काही रॅम्प वॉक करायचा नाही. पण या छोट्या घरगुती गोष्टी करून रोज सहज वावरताना, लोकांमध्ये मिसळताना आपल्याला स्वतःविषयी अधिक छान वाटेल. आपली त्वचा नितळ ठेवण्यासाठी मॉडेल्स करत असलेल्या उपायांमधून कळलेली ही खास ९ सिक्रेट्स

१. मॉइश्चराईझरचा वापर करणे 

आपण मेकअप लावला असल्यास बाहेरून आल्यावर लगेचच आपण तो मेकअप उतरवला पाहिजे. दिवसभर मेकअप केल्याने त्वचा कोरडी पडते.

 

 

त्वचेसाठी आवश्यक असलेला पाण्याचा अंश त्वचेला मिळाला पाहिजे. त्वचा हायड्रेटेड राहिली पाहिजे. अगदी आपली त्वचा तेलकट असेल तरीसुद्धा. दिवसभरात भरपूर पाणी प्यायलंच पाहिजे पण मेकअप काढल्यानंतर न विसरता चेहऱ्याला मॉइश्चराईझर लावणेही गरजेचे आहे.

२. साखर, तेल आणि लिंबाच्या रसाचा घरगुती स्क्रब 

‘बायोडर्मा’ हे प्रॉडक्ट वापरून चेहरा स्वच्छ केल्यावर ‘ग्रेस माहारी’ ही मॉडेल साखर, तेल आणि लिंबाच्या रसाच्या मिश्रणाचा स्क्रब आठवड्यातून एकदा चेहऱ्याला लावते.

 

 

 

तो धुतल्यानंतर ‘कोकोनट ऑइल’ मॉइश्चराईझर म्हणून चेहऱ्याला लावते. आपल्यालाही हा सोपा घरगुती उपाय करणं अगदीच शक्य आहे.

३. कोरफडीचा गर 

चक्क मॉडेल्ससुद्धा आयत्या वेळी त्यांच्या नेहमीच्या वापरातली प्रॉडक्ट्स समोर नसतील तर कोरफडीचा गर चेहऱ्याला लावतात. सनबर्नवरचा उपाय म्हणून त्या कोरफडीचा गर चेहऱ्याला लावतात.

 

 

आपल्यापैकी बहुतेकांना हा उपाय माहीत असेलच. आता मॉडेल्सही हा उपाय करतात हे कळल्यावर नैसर्गिकपणे त्वचा चांगली ठेवण्याच्या या उपायाकडे आपण दूर्लक्ष करायला नको.

४. ‘टी ट्री ऑइल’चा वापर 

चेहऱ्यावर डाग आले असतील तर ‘टी ट्री ऑइल’ लावून आपण डागांपासून आपली सुटका करून घेऊ शकतो.

 

 

‘टी ट्री ऑइल’ ‘अँटी बॅक्टेरियल’ आहे. ते त्या डागांच्या आतपर्यंत जाऊन त्वचेची रंध्रं स्वच्छ करतं आणि चेहऱ्यावरचे डाग नाहीसे करायला मदत करतं.

चिनी स्त्रियांची त्वचा इतकी सुंदर आणि नितळ कशी काय? जाणून घ्या…

त्वचारोगाने आई गेली, तिने सुरू केलेला ऑरगॅनिक ब्रॅंड देतोय १५ कोटींची कमाई

५. वाफ घेणे 

प्रचंड प्रवास करून आल्यानंतर मेकअप उतरवून अगदी मॉडेल्स सुद्धा चेहरा स्वच्छ करायला वाफ घेतात. प्रवासात नकोनकोसे बरेच त्वचेच्या दृष्टीने चांगले नसलेले घटक आत रंध्रांपर्यंत जाऊन पोहोचतात. अशा वेळी आपली रंध्रं मोकळी करून चेहरा पूर्णतः स्वच्छ करण्यासाठी मॉडेल्सनाही पाण्याची वाफ घ्यायचा उपाय फायदेशीर वाटतो.

 

organic authority

 

एका भांड्यात गरम पाणी घेऊन,त्यात ‘मिंट टी’ घालून, चेहऱ्यावर वाफ येईल अशा प्रकारे चेहरा भांड्याजवळ नेऊन आणि डोक्यावरून टॉवेल घेऊन आपणही आपल्या चेहऱ्याची रंध्रं मोकळी करून चेहरा स्वच्छ करू शकतो.

६. पिंपलवर टूथपेस्ट लावणे 

आपल्यातल्या बहुतेकांना हे वाचून आश्चर्य वाटेल पण थोडीशी टूथपेस्ट हातावर घेऊन ती जिथे पिंपल आलाय त्यावर लावायची हाही एक पिंपल पासून सुटका मिळवण्याचा मॉडेल्स करत असलेला झटपट उपाय आहे.

 

 

पण टूथपेस्टमुळे आपली त्वचा कोरडी पडू शकते आणि त्वचेला इरिटेशनही होऊ शकतं त्यामुळे फार प्रमाणात टूथपेस्ट लावणं टाळलं पाहिजे.

७. मध आणि अवोकॅडोचा मास्क 

कितीही किमती आणि उत्तम प्रॉडक्ट्स वापरली तरी काही अंशी त्याने त्वचेचं नुकसान होतंच. ते नुकसान भरून काढायला अशावेळी मॉडेल्सनाही घरगुती उपायांकडे वळावं लागतं. मध आणि अवोकॅडोचा मास्क चेहऱ्याला लावणे हा असाच एक उपाय आहे.

 

 

शो संपल्यानंतर ‘जय रिट’ ही मॉडेल हा मास्क तयार करून चेहऱ्याला लावते. त्यामुळे त्वचा मॉइश्चराईज्ड आणि तजेलदार रहायला मदत होते.

८. वेगवेगळ्या तेलांचे उपयोग

‘ग्रेस माहारी’ ही मॉडेल लीप बाम म्हणून कोकोनट ऑइल लावते. ती कोकोनट किंवा व्हॅनिला लीप बामही लावते. आपण थकलो असू तर कितीही मेकअप केला तरी थोडाफारतरी तो थकवा चेहऱ्यावर जाणवतो. त्यामुळे केवळ चेहरा आणि केसांनाच तेल न लावता खूप प्रवासानंतर मॉडेल्स कोकोनट ऑइल, ऑलिव्ह ऑइल ही तेलं पायांना चोळतात.

 

 

आपण थकलेले असू आणि आपणही हा साधासोपा उपाय केला तर फ्रेश दिसायला आपल्यालाही अधिक मदत होईल.

९. फडक्यात गुंडाळून बर्फ चेहऱ्याला लावणे 

आपली त्वचा खाली ओघळायला नको म्हणून रात्री झोपण्यापूर्वी एका फडक्यात गुंडाळून बर्फ चेहऱ्याला लावणे हादेखील मॉडेल्स करत असलेला एक सोपा घरगुती उपाय आहे.

अशा प्रकारे बर्फ चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्याचे रक्ताभिसरणही पटकन व्हायला मदत होते. चेहऱ्यावर आलेली सूज उतरवायची असेल तर अशा प्रकारे बर्फ लावणे किंवा थंड पाण्याचा शिडकावा चेहऱ्यावर करणे हा चांगला उपाय आहे.

 

 

मॉडेल्स वापरत असलेले प्रॉडक्ट्स आणि ही अशी सगळी काळजी घेऊनही सामान्य माणसाला दिसण्याबाबत जसे न्यूनगंड असतात तसे ते मॉडेल्सनाही असू शकतात. या सततच्या मेकअपमुळे, मेकअप ज्या ब्रशेस ने लावला जातोय ते ब्रशेस जर स्वच्छ नसतील तर त्याच्या वाढीव दुष्परिणामांना मॉडेल्सना सामोरं जावं लागतं.

सुदैवाने आपल्यासारख्या सामान्य माणसांचं तसं नाही. त्यामुळे माफक प्रमाणात आपल्यापुरती स्वतःच्या दिसण्याची, त्वचेची काळजी घ्यायला, त्वचा नितळ ठेवायला या वरच्या सिक्रेट्सचा विचार करायला हरकत नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version