Site icon InMarathi

“रवी शास्त्रीने मला बळीचा बकरा बनवले”, रविचंद्रन अश्विनचा खुलासा…

ravi shastri inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाने १-० ने विजय मिळवला. या मालिकेत भारतीय संघासाठी अनेक सकारात्मक बाबी घडल्या. यातीलच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रविचंद्रन अश्विन याचं दमदार पुनरागमन!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कधीकाळी भारतीय गोलंदाजीचा हुकुमी एक्का मानला जाणारा अश्विन अचानक संघाबाहेर गेला. त्याला संघात स्थान मिळणं इतकं कठीण वाटू लागलं होतं, की त्याची कारकीर्द आता संपली अशा चर्चा नाक्यावरच्या, कट्ट्यावरच्या आणि ऑफिसमधल्या क्रिकेट एक्सर्टसमध्ये घडू लागल्या.

मागील दोन वर्षांचा काळ त्याच्यासाठी फारच खडतर होता आणि त्यालासुद्धा कारकीर्द संपल्याची भावना मनात आली होती, असं अश्विनने स्वतःदेखील काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं.

याच अश्विनने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत अप्रतिम गोलंदाजी करत स्वतःचं कर्तृत्व पुन्हा सिद्ध केलं. यादरम्यान हरभजनच्या कसोटी बळींचा आकडा मागे टाकत, अश्विनने या यादीत उसळी मारली. लवकरच कपिल देव यांचा ४३४ कसोटी बळींचा आकडा सुद्धा तो मागे टाकेल अशी चिन्हं सध्या दिसत आहेत. चांगली फलंदाजी सुद्धा करू शकणारा हा खेळाडू भारतीय संघासाठी एक महत्त्वाचा अष्टपैलू ठरतो.

 

 

अशा खेळाडूविषयी उलटसुलट चर्चा घडणं, त्याला दुर्लक्षित केलं जाणं या गोष्टी खेळाडूचा आत्मविश्वास कमी करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. अशाच गोष्टी जर टीम मॅनेजमेंटकडून, विशेषतः मुख्या प्रशिक्षकांकडून होत असतील, तर ती बाब अधिकच क्लेशदायक ठरते.

भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडून अशीच वाईट वागणूक मिळायचा अनुभव रवी अश्विनने सध्या शेअर केला आहे.

अश्विन सध्या दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघासोबत असून, बॉक्सिंग डे अर्थात, २६ डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याची तयारी करत आहे.

संघाला गरज आहे, तर…

एक गुणी अष्टपैलू असणारा अश्विन संघाला गरज पडते त्यावेळी मैदानावर चमत्कार करून दाखवण्यात माहीर आहे असं म्हणायला हवं. मुळात ऑफस्पिनर असणाऱ्या अश्विनने प्रसंगी हाती बॅट घेऊन सुद्धा संघाची मदत केली असल्याची अनेक उदाहरणं आहेत. हनुमा विहारीसह खेळपट्टीवर नांगर टाकून उभं राहत त्याने केलेल्या फलंदाजीची चर्चा तर आजही होताना दिसते.

वेळप्रसंगी दुखापतींकडे दुर्लक्ष करून आपल्या संघाचा विचार करणारा एक चांगला खेळाडू म्हणूनही अश्विन याला नावाजलं जातं. याच अश्विनला रवी शास्त्री यांच्याकडून मात्र दुय्यम वागणूक मिळाली असल्याची आठवण एका मुलाखतीत त्याने सांगितली आहे.

त्या कसोटी सामन्याच्या वेळी काय घडलं?

 

 

संघाच्या भल्यासाठी आपल्याकडून शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करणारा अश्विन त्यादिवशी सिडनी कसोटीत स्वतःची दुखापत सुद्धा विसरला होता. २०१९ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात दुसऱ्या डावात अश्विनने ५० षटकांहून अधिक गोलंदाजी केली.

संघासाठी आपलं शंभर टक्के देण्याचा नेहमीच प्रयत्न करणाऱ्या अश्विनने आपली पोटाची गंभीर दुखापत याकाळात सहन केली. मात्र संघाला गरज असताना गोलंदाजी थांबवली नाही.

रवी शास्त्री यांनी मात्र अश्विनच्या जिद्दीकडे, संघप्रती असलेल्या निष्ठेकडे साफ दुर्लक्ष केलं असं म्हणता येईल. डावखुरा चायनामन कुलदीप यादव हा भारतीय संघासाठी भरातबाहेरील सामन्यांमध्ये सर्वोत्तम गोलंदाज असल्याचं त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं.

स्वतःची गंभीर दुखापत सुद्धा बाजूला ठेऊन संघासाठी मैदानावर झटणाऱ्या खेळाडूला आधी वागणूक मिळत असेल, तर त्याला दुःख वाटणं, राग येणं यात काहीही चुकीचं ठरतं असं म्हणता येणार नाही. ही गोष्ट फारच दुःख देणारी ठरली असं अश्विनने म्हटलं आहे.

त्याला असं वाटतं की…

 

 

याविषयी अश्विनचं म्हणणं असं आहे, की कुलदीपने केलेली कामगिरी, त्याचा अनेक संघसहकारी म्हणून त्याला खूपच आनंदी करणारी होती. ऑस्ट्रेलियामध्ये अनेकदा उत्तम गोलंदाजी करूनही, अश्विनला ५ गडी बाद करता आलेले नाहीत. कुलीने मात्र ही कामगिरी करून दाखवली. संघासाठी आणि त्याच्या शिरपेचात मनाचा तुरा म्हणून ही कामगिरी नक्कीच दर्जेदार होती.

असं असूनही, संघासहकाऱ्याचं हे यश अश्विन मनापासून साजरं करू शकला नाही. त्याच्या कामगिरीकडे शास्त्री गुरुजींनी केलेलं दुर्लक्ष हे याचं कारण असल्याचं अश्विन म्हणतो.

 

 

‘आपण चांगली कामगिरी करूनही आपल्याला दुर्लक्षित केलं जातंय, आपली कदर केली जात नाहीये, हे दिसत असताना आनंदी राहून संघासहकाऱ्याचं यश शंभर टक्के साजरं करणं एखाद्याला जमू शकेल, हे कठीण आहे.’ असंही याविषयी बोलताना अश्विन म्हणाला आहे.

“त्या एका क्षणात माझं अवसानच गळालं.” असं म्हणत अश्विनने त्या घटनेचं केलेलं वर्णन त्याचं दुःख दाखवून देण्यासाठी पुरेसं आहे असं म्हणायला हवं.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version