Site icon InMarathi

२०२२ मधील ‘ड्राय डे’ लिस्ट : पार्टी करण्यासाठी या दिवसांपुर्वीच तळीरामांना स्टॉक घेऊन ठेवावा लागेल…!

dry days IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नवीन वर्षाची सुरुवात झाली की प्रत्येकजण येणाऱ्या नवीन वर्षामधील सण, उत्सव आणि सुट्टीचे दिवस बघायला सुरुवात करतो. येणाऱ्या प्रत्येक नवीन वर्षानुसार सण-उत्सवाची तारीख देखील बदलत जाते आणि त्यामुळे सुट्टीचे दिवस ही बदलत जातात.

वर्ष बदलले की सण-उत्सव, आपले वाढदिवस कॅलेंडरमध्ये पाहिले जात असताना दारू पिणारे लोक येणाऱ्या नवीन वर्षात ड्राय डे कधी येणार याची लिस्ट शोधत बसतात.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

२०२०-२०२१ मध्ये कोरोनाच्या थैमानामुळे संपूर्ण जगभरात लॉकडाऊन लागले होते, अशावेळी या तळीरामांना दारू मिळवणे खुप कठीण झाले होते. त्यामुळे दारू पिणाऱ्या लोकांना सगळ्यात आधी जाणून घ्यायचे असते की, येणाऱ्या वर्षात किती आणि कोणत्या दिवशी ड्राय डे येणार आहे.

 

 

‘ड्राय डे’ म्हणजे एक असा दिवस ज्यादिवशी बार, क्लब, हॉटेल इत्यादी कुठल्याही जागेवर दारुची विक्री होत नाही. चला तर जाणून घेऊया की येणाऱ्या वर्षात कोण-कोणत्या दिवशी ड्राय डे येणार आहे.

जानेवारी

जानेवरी मध्ये एकूण ४ दिवस ड्राय डे आहे. ते म्हणजे १४ जानेवारी मकर संक्रांती, २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन तर ३० जानेवारी महात्मा गांधी पुण्यतिथी.

● फेब्रुवारी

फेब्रुवारी मध्ये एकूण ३ दिवस ड्राय डे असणार आहे, पहिला म्हणजे ५ फेब्रुवारी वसंत पंचमी, दूसरा १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि तिसरे म्हणजे २६ फेब्रुवारी स्वामी दयानंद सरस्वती जयंती.

● मार्च

मार्च मध्ये ड्राय डे हे महाशिवरात्री (१ मार्च) आणि होळी (१८ मार्च) या दोन दिवशी असणार आहे.

 

 

● एप्रिल

एप्रिल महिन्यामध्ये ड्राय डे चे एकूण ४ दिवस असतील. हे चार दिवस म्हणजे १० एप्रिल ला रामनवमी, १४ एप्रिलला भगवान महावीर आणि बौद्ध जयंती, १५ एप्रिल गुड फ्रायडे आणि १७ एप्रिलला ईस्टर डे.

● मे

मे महिन्यात देखील ३ दिवस ड्राय डे असतील. ते पुढीलप्रमाणे १ मे महाराष्ट्र दिवस फक्त महाराष्ट्रात, ३ मे ईद-उल-फितर आणि १६ मे बुद्ध पौर्णिमा.

● जून

हा महीना तळीरामांसाठी अत्यंत शुभ असा महीना आहे, या महिन्यात एकही ड्राय डे नाही. त्यामुळे दारू पिणाऱ्यांना या महिन्यात अजिबात काळजी करायची गरज नाही.

 

 

● जुलै

जुलै मध्ये २ दिवस ड्राय डे आहे ते म्हणजे आषाढी एकादशी (१० जुलै) आणि गुरु पौर्णिमा (१३ जुलै) रोजी असेल.

● ऑगस्ट

ऑगस्ट महिन्यात एकूण ५ दिवस ड्राय डे असणार. ते म्हणजे मोहरम (८ ऑगस्ट), स्वतंत्रता दिवस (१५ ऑगस्ट), कृष्णा जन्माष्टमी (१८-१९ ऑगस्ट) आणि गणेश चतुर्थी (३१ ऑगस्ट).

●  सप्टेंबर

सप्टेंबर मध्ये केवळ एकाच दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशी (९ सप्टेंबर) रोजी ड्राय डे असणार आहे.

● ऑक्टोबर

ऑक्टोबरमध्ये तब्बल ५ दिवस ड्राय डे आहे. गांधी जयंती (२ ऑक्टोंबर), दसरा (५ ऑक्टोंबर), निषेध सप्ताह (८ ऑक्टोंबर), ईद-ए-मिलाद/महर्षी वाल्मीकि जयंती (९ ऑक्टोंबर) आणि दिवाळी (२४ दिवाळी).

 

 

● नोव्हेंबर

नोहेंबरमध्ये फक्त २ दिवस ड्राय डे राहणार आहे. ते म्हणजे कार्तिकी एकादशी आणि गुरु नानक जयंती.

● डिसेंबर 

डिसेंबर महिन्यात फक्त ख्रिसमसला ड्राय डे असणार आहे.

तर आपल्याला दिसून येईल की ऑगस्ट आणि ऑक्टोंबर मध्ये सर्वाधिक ड्राय डे आहे. अर्थात याचा अर्थ व्यसनांनांचे समर्थन करणे असा होत नाही किंबहूना दारूसारख्या व्यवसानांमुळे प्रकृतीची हानी होते.

मात्र नव्या वर्षाचे कॅलेंडर उघडताना महत्वाच्या तारखा लिहून ठेवल्या जातात त्याचप्रमाणे कार्यक्रम, पार्ट्या, सेलिब्रेशन्स यांचे आयोजन करताना ‘ड्राय डे’ ची लिस्टही आवर्जून पाहिली जाते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version