Site icon InMarathi

श्रीलंकेच्या चराचरांत आजही रामायण वसलेलं आहे, वाचा महत्वाच्या गोष्टी!

srilanka inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सोशल मीडियामध्ये “जा पाकिस्तानात!” चा गजर घुमत असतो. वंदेमातरम म्हणायचं नाही? जा पाकिस्तानात! राष्ट्रगीताला उभं रहायचं नाही? पाठवा पाकिस्तानात!

अर्थात, हा काही प्रेमळ सल्ला नसतो. विविध कारणांनी “देशाशी गद्दारी” करणाऱ्या लोकांना शिक्षा म्हणून पाकिस्तानात पाठवायला पाहिजे असा, स्वयंघोषित देशभक्त न्यायाधीशांचा हा ऑनलाईन दम असतो. असो.

आपल्या हिंदू धर्मात दोन ग्रंथांना प्रचंड महत्व दिलं गेलं आहे, ते म्हणजे रामायण आणि महाभारत! रामायण म्हणजे आदर्शवाद आणि महाभारत म्हणजे वास्तववाद!

 

 

पण तात्पुरतं तरी या दोन्ही ग्रंथांबाबतच्या आख्यायिका किंवा त्यात सांगितलेले चमत्कार याकडे आपण दुर्लक्ष करायच जरी ठरवलं तरी यांची पाळं मुळं किती खोलवर गेली आहेत याचा आपल्याला अंदाज सुद्धा यायचा नाही!

रामायण किंवा महाभारत हे नुसते ग्रंथ नसून आपली संस्कृति आणि धर्म यांच प्रतीक आहे!

पण, खरंच असं वाटतं की रामायणावर विश्वास नसणाऱ्या लोकांनी एकदा श्रीलंकेत जाऊन यावंच. रामायणातील चमत्कार बाजूला ठेऊया क्षणभर.

परंतु “रामायण घडलंच नाही!” असं ठामपणे म्हणणाऱ्या लोकांनी रामायणातील विविध प्रसंगांचे श्रीलंकेत सापडणारे पुरावे आवर्जून बघायला हवेत.

 

 

रामायणामधील लंका म्हणजे आजची श्रीलंका. भारत आणि श्रीलंकेमधील भल्यामोठ्या समुद्राचं अंतर भगवान रामाने सेतू बांधून पार केल्याचं आपण ऐकत आलो आहोत. त्यानंतर प्रभूंनी श्रीलंकेत जाऊन रावणाशी युद्ध केले, विजयश्री मिळावली. पुढील इतिहास सर्वश्रुत आहे.

रावणाची लंका म्हणजे स्वर्गाहुनी सुंदर असे देखील म्हटले जाते. रामायणामध्ये लंकेचा अर्थात आजच्या श्रीलंकेचा थेट उल्लेख असल्यामुळेच आपल्याला या देशाबद्दल खूप अप्रूप ही वाटतं.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

अर्थात सध्याची श्रीलंका  सोन्याची नाही. पण तिथे आपल्याला रामायणामधील बरीचशी ठिकाणे आणि काही गोष्टी आजही अस्तित्वात असलेली पाहायला मिळतात.

अश्या काही ठिकाणांची माहिती घेऊ या.

मंदोदरी महाल

 

 

श्रीलंकेमध्ये मंदोदरी महाल पाहायला मिळतो. या महालाच्या चारी बाजूला धबधबे आणि घनदाट जंगल आहे. रावणाने माता सीतेचे हरण केल्यानंतर तिला याच मंदोदरी महालामध्ये ठेवले होते. याला स्थानिक भाषेत ‘सीता कोटुवा’ अर्थता सीतेचा किल्ला असे म्हटले जाते.

 

पुष्पक विमान स्थळ

 

 

याच सिंहाला शहरामध्ये वेरागनटोटा नावाचे ठिकाण आहे. ज्याचा अर्थ आहे ‘विमान उतरण्याचे ठिकाण’! असं म्हणतात की हीच जागा आहे जेथे रावण त्याचे पुष्पक विमान उतरवायचा.

 

अशोक वाटिका

 

 

रावणाने येथेच माता सीतेला कैद करून ठेवले होते. बाजूलाच पाण्याचा ओढा देखील आहे. म्हणतात की माता सीता याच ओढ्यामध्ये स्नान करायची. या ओढ्याच्या आसपासच्या दगडांवर भले मोठे पायांचे निशाण आढळून येतात.

हे निशाण हनुमानाचे असल्याचे सांगितले जाते. या ओढ्याच्या काठावर राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांचे मंदिर आहे.

 

सीता तलाव

 

 

श्रीलंकेमध्ये आजही तो दूरवर जाणारा रस्ता पहायला मिळतो ज्यावरून रावणाने माता सीतेचे हरण करून लंकेमध्ये प्रवेश केला होता. या रस्त्यावर कोणतेही झाड अथवा साधे रोपटे देखील नाही. याच मार्गावर हा सीता तलाव आहे.

असे म्हणतात की माता सीतेच्या अश्रूंनी या तलावाची निर्मिती झाली आहे. दुष्काळ पडला की आसपासच्या मोठ्या नद्या कोरड्या पडतात पण हा तलाव मात्र कधीही आटत नाही हे विशेष!

या सीता तलावाच्या आजूबाजूला सीता फुल आढळतात. या फुलांची खासियत ही आहे की या फुलांना अगदी जवळून पाहिल्यास कोणीतरी व्यक्ती हातात धनुष्य घेऊन उभा असल्याचा भास होतो.

स्थानिकांच्या मते माता सीता या फुलांच्या माध्यमातून प्रभू रामाचे दर्शन घ्यायची. हे फुल पृथ्वीतलावर केवळ याच जागेत आढळते.

जेथे रावणाने सीता मातेला लपवून ठेवले होते :

 

 

श्रीलंकेमध्ये रावणगोडा नावाचे एक ठिकाण आहे. म्हणतात की जेव्हा हनुमानाने आपल्या शेपटीने संपूर्ण लंका उध्वस्त केली तेव्हा याच जागी रावणाने मात सीतेला लपवून ठेवले होते.

या जागी अनेक गुहा आणि भुयारे आहेत. ही भुयारे थेट रावणाच्या शहराला जोडतात. मुख्य म्हणजे ही भुयारे नैसर्गिक नसून तयार करण्यात आलेली आहेत.

ज्या ठिकाणी हनुमानाने रावणाचे विमान जाळले होते तेथे आजही जळाल्याचे डाग आहेत आणि तेथील माती करड्या रंगाची आहे.

श्रीलंकेच्या अनेक पर्वतांवर आजही संजीवनी वनस्पती आढळते.

 

 

ही सगळी फार मोजकीच उदाहरणं आहेत. तुम्हाला श्रीलंकेमध्ये अशी इतर अनेक ठिकाणे आढळतील ज्यांचा उल्लेख रामायणामध्ये आला आहे, किंवा रामायणातील विविध घटनांचा संदर्भ आहे.

म्हणूनच म्हटलं ना – रामायणावर विश्वास नसणाऱ्यांना एकदा श्रीलंकेत पाठवायला हवं!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version