Site icon InMarathi

नोटांवर आडव्या रेषा का असतात? यामागचं अगदी खास कारण जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘अपना सपना मनी मनी’ या वाक्याप्रमाणे प्रत्येकाला आयुष्यात भरपूर पैसा कमवायचा आहे, पण हेच पैसे कमवण्याच्या नादात आपण एवढे बिझी असतो की कधी आपण या नोटा निरखून सुद्धा पाहत नाही. खरंतर नेहमीच्या वापरातल्या अशा खूप गोष्टी असतात ज्यांच्याकडे आपण नीट लक्ष देऊन पाहतच नाही. चलनी नोटा सुद्धा ह्याला अपवाद नाहीत.

म्हणजे असं की, नोटांच्या रंगावरून आणि त्यावरच्या आकड्यावरून नोट किती किंमतीची आहे ते तर कळतं, पण त्यावर आणखी काही माहिती असते.

 

 

तुम्ही जर बारकाईने बघितलं असेल तर 100, 200, 500, 2000 च्या नोटांवर आडव्या रेषा असतात. तसेच वेगवेगळ्या नोटांवर मागे वेगवेगळी चित्रे असतात. तर आज आम्ही तुम्हाला नोटांवर असलेल्या रेषांचा अर्थ सांगणार आहोत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

नोटांवर ज्या आडव्या रेषा असतात त्याला ‘ब्लीड मार्क्स’ म्हणतात. नेत्रहीन व्यक्तींना स्पर्शाने नोटेची किंमत कळावी यासाठी हे ब्लीड मार्क्स असतात. जेवढ्या आडव्या रेषा जास्त तेवढी नोटेची किंमत जास्त असं साधारण समीकरण असतं. त्यामुळे नोटेला स्पर्श करून नेत्रहीन व्यक्तीला 100, 200, 500 आणि 2000 ह्या नोटांमधील फरक कळतो.

आपण नीट पाहिलंत तर 100 च्या नोटांवर दोन्ही बाजूला दोन – दोन आडव्या रेषा असतात, तर 200 च्या नोटेवर चार रेषांसोबत दोन झिरो असतात. तसेच 500 च्या नोटेवर प्रत्येकी 5 तर 2000 च्या नोटवर दोन्ही बाजू सात – सात रेषा असतात.

 

 

2000 रुपयांच्या नोटेच्या मागील बाजूस मंगलयानचा फोटो छापलेला आहे. हा फोटो भारताच्या मंगळयान मोहिमेचा एक भाग आहे. इस्रोने केलेली मंगळयान मोहीम ही सर्वात यशस्वी मानली जाते. कमी खर्चात आणि कमी वेळात ही मोहीम यशस्वी झाल्याने जगभरात भारताची मान उंचावली होती.

 

 

तसेच 500 रुपयांच्या नोटेच्या मागील बाजूस लाल किल्ल्याचे चित्र आहे, तर 200 रुपयांच्या नोटेमागे छापलेला सांची स्तूप मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यात आहे. ही वास्तू भारतातील सर्वात जुन्या वास्तू पैकी एक असून ती महान सम्राट अशोकाच्या काळात बांधली गेली होती.

याचप्रमाणे 100 रुपयांच्या नोटेच्या मागील बाजूस ‘ राणी की वाव’ चे चित्र छापण्यात आले आहे. गुजरातच्या पाटण जिल्ह्यातली ही भव्य पायरी विहीर विलक्षण आहे. सोलंकी राजघराण्याची राणी उदयमती यांनी त्यांचा पती भीमदेव प्रथम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही वास्तू बांधली होती. २०१४ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा यादीत त्याचा समावेश केला आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version